Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 15, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पांडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥597॥ किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥598॥ एऱ्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥599॥ महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाचां ठायीं ॥600॥ कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥601॥ जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथेचि ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥602॥

    मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥10॥

    आणि मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटें नाहीं । ऐसा निश्चयोचि तिहीं । जयाचां केला ॥603॥ शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश । एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥604॥ किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज । तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥605॥ रिगतां वल्लभांपुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥606॥ मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें । मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥607॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    अर्थ

    अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी, एखादा ठेवलेला साक्षीदार, ती गोष्ट पाहूनही त्याविषयी, जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते. ॥597॥ फार काय सांगावे? राघू जसा पिंजर्‍यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो. ॥598॥ एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. ॥599॥ आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी प्रिय-अप्रिय गोष्टी सारख्या असतात ॥600॥ अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे अथवा दु:खाचे प्रसंग त्यांच्या अंगावर येऊन आदळले, तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दु:खी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही ॥601॥ कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे, असे तू समज. ॥602॥

    आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे (व अर्थात) जनांच्या समुदायांमध्ये (राहण्याची) खंती ॥10॥

    आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही, असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे ॥603॥ ज्याचे शरीर, वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्यावाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाहीत ॥604॥ फार काय सांगावे! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जखडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे). ॥605॥ पतीकडे जातांना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे ॥606॥ गंगेचे उदक समुद्रात मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही, जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात. ॥607॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026 अध्यात्म

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    By Team AvaantarAugust 14, 2026

    अध्याय तेरावा झाडिलीं कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरि…

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 396
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 533
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 851
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.