Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥575॥ म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागीं ? ॥576॥ म्हणोनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें । पंगु न होता जावें । तेथ जाय ॥577॥ दिठी जंव जाये । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥578॥ हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे । आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥579॥ तेव्हा ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥580॥ जैसे चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे ॥581॥ तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें । तें आतांचि आघवें । सवतें केले ॥582॥ आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । तेथ उपेक्षूनि जो रिगे । तो नागवला कीं ॥583॥ तैसें वृद्धाप्य होये । आलेपणें वायां जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥584॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    अर्थ

    असा (पुढे येणार्‍या) म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात विटतो ॥575॥ तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल! आपले हित साधण्यास काय उरणार आहे? ॥576॥ म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत; सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो; पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थाने, तीर्थे वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो ॥577॥ जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे, तोपर्यंत जितके पाहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. ॥578॥ हात लुळे होतील, ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते, आणि (म्हणून) तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो. ॥579॥ अशी अवस्था पुढे येईल, त्या वेळी मन वेडे होईल, तेव्हा त्याच्या आधीच शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. ॥580॥ जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील, म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोच झाकापाक करून ठेवावी, ॥581॥ त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे, ते आताच (तारुण्यातच) त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. ॥582॥ आता जिकडेतिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी, पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत असता आला व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला, तर तो नागवला जाईल काय? ॥583॥ तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण शंभर वर्षे आयुष्य आहे, (तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे (की नाही) हे कोणास ठाऊक? ॥584॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    रामरक्षेचे चिलखत

    By डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 13, 2026

    रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति। तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥ – गीताव्रत ज्यांचे चित्त रामनामाच्या…

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 394
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 531
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 847
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.