Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बदल दिसतो, पण त्यासाठी…
    अवांतर

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरJuly 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भारद्वाज पक्षाचे दर्शन, बदल स्वत:पासून आवश्यक, प्रत्येक नागरिकाकडून शिस्तपालन, रस्ताक्रॉसिंगचे नियम, पाळीव प्राण्यांचा त्रास, पाळीव प्राण्यांच्या सवयी
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार, असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.

    मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते की, रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात, कचरा पडलेला असतो, कागदाची खोकी  पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात, स्कूटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले की कागद, प्लास्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला  दिसत नव्हता!

    का? ते मात्र माहीत नाही.

    सिटी प्राइडच्या रस्त्यावर आलो की, तिथे कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांचं मलमूत्र विसर्जन सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आजही कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्याने घाण केली आणि मालकाने लगेच ग्लोव्हज घालून प्लास्टिकच्या पिशवीत ती गोळा केली आणि आश्चर्य म्हणजे कुत्री फिरवणाऱ्या  सगळ्यांच्याच  हातात आज प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या.

    हा बदल कशामुळे घडला?  ते मात्र समजत नव्हते.

    पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. रस्ता ओलांडणारे  जीव मुठीत घेऊन झेब्रा क्रॉसिंगवर धावत असतात. काहीजण विरुद्ध दिशेने वेगाने गाडी घेऊन येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात.

    हेही वाचा – अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरू होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंगवरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या 20-30च्या वेगाने जात-येत होत्या. विरुद्ध दिशेने येणारी किंवा फुटपाथवरून जाणारे एकही टु-व्हीलर दिसले नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साइड इंडिकेटर देत होती.

    हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे माझी तंद्री मोडली आणि मी पुढे निघालो.

    ट्रॅफिकमध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते मात्र काही समजत नव्हते!

    पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरांकरिता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथवर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते.

    हा बदल कशामुळे? हे मात्र समजत नव्हते.

    हेही वाचा –  पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    थोडं पुढे गेलं की मृत्युंजयेश्वर मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो. आज मात्र मी दर्शन घेण्याकरिता चक्क मंदिराच्या आत गेलो.

    माझ्यामध्ये हा बदल कशामुळे झाला याचे उत्तर मात्र नक्कीच माझ्याकडे होते. एक म्हणजे, इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल मला देवाचे आभार मानायचे होते आणि नंबर दोन म्हणजे असाच बदल कायम ठेव, अशी मला देवाकडे प्रार्थना करायची होती. एकूणच बदल दिसतो, पण त्यासाठी स्वत:पासून सुरुवात हवी.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    बेबी स्वामीचरणी रुजू झाली…

    June 29, 2026 अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    बेबी स्वामीचरणी रुजू झाली…

    By हर्षा गुप्तेJune 29, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात आलेली ही ‘बेबी’, म्हणजे…

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    July 1, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु 

    July 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जुलै 2026

    July 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 345
    • अवांतर 193
    • आरोग्य 125
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 473
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 229
    • मैत्रीण 23
    • ललित 750
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.