Author: सुधीर करंदीकर

Avatar photo

मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

आपल्याला मदत करणाऱ्यांना ‘अभिवादन’ करण्यात किंवा त्यांना ‘धन्यवाद’ देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा करत असतो, कदाचित त्यात स्वतःचा आपण कमीपणा समजतो. आपण ऑटो रिक्षाने प्रवास करतो, उतरल्यावर मीटर बघून पैसे देतो, आणि व्यवहार पूर्ण करून चालायला लागतो. आपण थोडासा पॉज घेतला आणि विचार केला, तर लक्षात येईल की, काहीतरी मिसिंग आहे. वेड्यावाकड्या ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हरने आपला प्रवास आरामदायी होईल अशी रिक्षा चालवली, आपल्याला त्यांनी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहचवले, त्याबद्दल मनापासून  त्यांना धन्यवाद द्यायला काय हरकत आहे? थोडं कौतुक करायला काय हरकत आहे? पुढच्या वेळेस असं करा आणि ड्रॉयव्हरच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघा. आपण रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर  शहाळ्याचं पाणी पितो,…

Read More

आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार, असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो. मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते की, रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात, कचरा पडलेला असतो, कागदाची खोकी  पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात, स्कूटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले की कागद, प्लास्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला  दिसत नव्हता! का? ते मात्र माहीत नाही. सिटी प्राइडच्या रस्त्यावर आलो की, तिथे कुत्री घेऊन…

Read More

माझा रोजचा कार्यक्रम म्हणजे सकाळी सात वाजता चहा घेत घेत पेपरचं वाचन सुरू करायचं. नऊ वाजता बायको गरमागरम चविष्ट ब्रेकफास्ट समोर सादर करते, तेव्हाच पेपर बाजूला करायचा… आज असाच पेपर वाचत होतो आणि नऊ वाजता बायकोनी डिशमध्ये चुरमुरे माझ्यापुढे ठेवले. मी विचारलं की, “ही स्टार्टर डिश आहे का?” बायको म्हणाली, “आजपासून हीच मेन कोर्सची ब्रेकफास्ट डिश राहणार आहे… काल फेसबुकवर एक डाएटिशियनची ऑनलाइन कन्सल्टेशनची जाहिरात होती. फक्त पाचशे रुपये चार्ज होता! मी पाचशे रुपये भरले आणि त्यांना मी फोन करून विचारलं – जो माणूस दिवसभर पेपरमध्ये आणि मोबाइलमध्ये असतो… फिरणे शून्य, व्यायाम शून्य… त्याचे डाएट काय असावं उत्तम तब्येती करता?…

Read More

बऱ्याच दिवसांत एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं, म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला – “हॅलो, कोण बोलतायं आपण…” मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का? तिकडून : नाही, ते घरीच आहेत, पण सध्या ते  फेसबुकवर आहेत. मी : म्हणजे!  मग फोन तुम्ही कसा काय घेतला? तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की, ते दोन तास फेसबुकवर असतात आणि त्यावेळेत  कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंगकरिता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून कॉल माझ्या फोनवर येतो… ते फेसबुकवरून उठले की, तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.…

Read More

अलीकडचीच गोष्ट आहे. घरी एकटाच होतो. संध्याकाळचं चहा आणि खाणं झालं होतं. विचार केला आपणच लिहिलेल्या म्हैस पुस्तकामधला एखादा लेख वाचावा. पुस्तक उघडलं आणि समोर लेख आला – ‘मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा’. पहिल्यांदाच लेख वाचतो आहे, असे समजून लेख वाचला आणि मजा आली. लेखांमधल्या आठवणींबद्दल विचार करत होतो आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजली. सोलापूरहून वाचक मैत्रिण सुनीता यांचा फोन होता. मी : नमस्कार, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा सुनीता : तुम्हाला कसं समजलं की, तुमच्याच पुस्तकातला ‘मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा’, हाच लेख मी वाचत होते म्हणून! मी : कारण मी पण आत्ताच तोच लेख वाचत होतो आणि का ते माहीत नाही, पण असं…

Read More

तीन (3) हा अंक बऱ्याच जणांना अशुभ वाटतो. “तीन तिगाडा काम बिगाडा” अशी आपल्याकडे म्हण पण प्रचलित आहे. पण आता जमाना बदलतो आहे आणि आता 3 हा अंक शुभ मानणाऱ्यांची संख्या जोमाने वाढते आहे. कुणाची जन्म तारीख 3 असते, कुणाचा जन्म महिना 3 असतो, काहींच्या जन्म तारखेच्या सगळ्या अंकांची बेरीज 3 होते, म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात! बरेचजण येन-केन प्रकारे 3 अंकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात… जसे गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची बेरीज 3 झाली पाहिजे, मोबाइल नंबरच्या अंकांची बेरीज 3 झाली पाहिजे…. यावरून मला एक जुनी घटना आठवली – नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो.  बायको सकाळी योगा क्लासला जाते, त्यामुळे मी नेहमी…

Read More

पूर्वी बहुतांश घरात पानाची पेटी पाहायला मिळायची. त्यांच्याकडे पानाची चंची देखील असायची. कुठे बाहेर प्रवासाला निघाले की, त्यात पान, सुपारी, कात, चुन्याची डबी, लवंग, अडकित्ता वगैरे सर्व सरंजाम त्या चंचीत असायचा. यासाठी पानाच्या गाद्यांना आता हे सर्व जवळपास लुप्त झालं आहे. वस्तुत: विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाल्ल्याने तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो, ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच, दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतडी निरोगी राहते. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते. प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा…

Read More

आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की, पार्किंगला जागा मिळेल का? हा प्रश्न प्रत्येकाच्याच समोर असतो, आणि त्याच्या जोडीला हाही प्रश्न असतो की, पार्किंगला जागा मिळाली, तर नंतर गाडी बाहेर काढता येईल का? आपला टु-व्हीलरवाल्यांचा पार्किंगचा अनुभव साधारण असा असतो – आपण गाडी घेऊन बॅंकेजवळ, दुकानाजवळ किंवा हॉटेलजवळ थांबतो. गाडी लावायला कुठेच जागा नसते. पुढे जावे का? असा विचार करीत असतो आणि कुणीतरी त्याची गाडी काढताना दिसतो. आपण लगेच आपली गाडी आत घुसवतो आणि कामाला जातो. कधी कधी जागाच मिळत नाही, मग लांब कुठेतरी गल्लीबोळात जाऊन गाडी लावावी लागते. काम झाल्यावर आपण गाडीजवळ येतो आणि आपली गाडी आजूबाजूच्या गाड्यांमध्ये अशी पॅक…

Read More

यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार होत आहेत, त्रास होत आहेत. ऑटो करून बाहेर पडलो तरी उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाचा त्रास हा होतोच होतो. ऊन मी म्हणतयं म्हणजे ऊन कमी व्हायला तयार नाही. अशा वेळेस आपण पण मी म्हणायचं, म्हणजे मी पण उन्हापासून बचावाकरता काहीतरी मार्ग काढीनच! सर्व जाणकार आणि तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत की, सध्या तरी 25 मेपर्यंत दुपारी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडूच नका. ज्यांचा व्यवसायच बाहेर फिरून काम करणे आहे, त्यांना तर पर्यायच नाही; पण इतर मंडळी मात्र दुपारी बाहेर जाणे नक्कीच टाळू शकतात. ऑफिसच्या…

Read More

ही गोष्ट आहे परदेशातली… गावाबाहेरचा मोकळा रस्ता आहे. एक आलिशान कार एक मॅडम चालवत आहेत. गाडी सुसाट वेगाने पळते आहे… गाणी ऐकणे सुरू आहे आणि मोबाइलवर मॅडमचे बोलणे – हसणे पण सुरू आहे. बोलण्याच्या नादात मॅडमकडून अचानक जोरदार करकचून ब्रेक लागतो आणि गाडी रस्त्याच्या एका साइडला जाऊन थांबते. रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या खेड्यामधल्या एकाला हलकीशी धडक बसते. नशिबाने त्या माणसाला अगदीच किरकोळ दुखापत होते आणि एवढ्यावरच अपघात थांबलेला असतो. कुठलाही अपघात झाल्यानंतर संबंधिताला नेहमीच आपली चूक कळलेली असते. पण चूक कबूल करणे, माफी मागणे, हे त्या देशामधल्यांच्या रक्तामध्येच नाही. लगेचच मारामारी सुरू होणे, शिवीगाळ करणे, गर्दी जमा होणे,  पोलीस येणे… हेच…

Read More