Author: सुरेखा मोंडकर

Avatar photo

लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

खूप दिवसांनी ललिता घरी आली आणि आमच्या गप्पांना ऊत आला. आज शनिवार तिच्या मुलाला आणि सुनेला सुट्टी. त्यांना मोकळेपणा मिळावा म्हणून आली असणार. ललिताचं आणि अनूचं अगदी मेतकूट, गूळपीठ म्हणतात तसे संबंध! दोघींचं छान जमतं. एकतर ललिताला मुलगी नाह, त्यामुळे कन्याप्रेमाचा सगळा वर्षाव सुनेवर होतो, हे तर खरं आहेच! पण मुलगी ती मुलगी आणि सून ती सून! ती मुलीसारखी असते, पण मुलगी  नसते. ती खरी मुलगी तर तिच्या आईबाबांची असते! एकाच वेळेला दोन-दोन आईबाबांची मुलगी ती कशी होऊ शकणार? मनातल्या मनात ती दोघांमध्ये पहिला, दुसरा नंबर लावेलच ना! तरीपण ललिता आणि अनूचं नातं अगदी आमरस पुरीसारखं आहे. तिच्या यशाचं रहस्य…

Read More

भाग – 3 तयार मूर्तीला बॉडी कलर देऊन झाल्यानंतर, गणरायाला सजवायला बाप्पाला खूप आवडायचं. उत्तम रंगसंगती साधून शेला, कद तो नयनरम्य करायचा. मुकुट, कंठी, गळ्यातले इतर दागिने, दंडावरचे, हातातले दागिने, सोंडेवरचं नक्षीकाम, कोरीव प्रभावळ – महिरप; सगळं बाप्पा मनापासून करायचा. लाल, हिरवे, डाळिंबी, हिऱ्यासारखे चमकदार खडे वापरून तो  गणपती बाप्पाचं सौंदर्य चमकवून टाकायचा. मधल्याकाळात पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागल्याने पीओपीच्या मूर्तीविरुद्ध जनजागृती व्हायला लागली. पर्यावरणस्नेही मूर्तींची गरज आणि मागणी वाढली. पण पर्यावरण ऱ्हासाने सगळ्यांचाच घास घेतला होता. गणपतीसाठी लागणारी शाडूची माती दुर्मीळ व्हायला लागली. ही मूर्ती बनवायला खास कारागीर, कलाकार लागतो. साचा वापरून पीओपीची मूर्ती कोणीही, साधारण कसब असणारा बनवू शकतो.…

Read More

भाग – 2 बाप्पाच्या आजोबांची थेट खाडीपर्यंत पोहोचलेली भलीमोठी जमीन होती. आजोबांचा उदार, सर्वांना मदत करण्याचा स्वभाव आणि बदलत्या काळाचा न आलेला अंदाज; यामुळे त्या जमिनीवर त्यांच्या अनेक नातेवाईकांची, सोयऱ्याधायऱ्यांची, मित्रपरिवाराची घरं झाली आणि ती ती जमीन, त्या त्या घरमालकाच्या घशात गेली. बाप्पाचे बाबा माळकरी; व्यवहार त्यांच्याही ध्यानात आला नाही आणि आता त्यांच्या कुटुंबाकडे ते राहात असलेली एक लांबलचक चाळ आणि त्याच्यापुढचं आटोपशीर अंगण एवढंच राहिलं. आजोबांपासून त्यांचा गणपतीचा कारखाना होता. भल्यामोठ्या बंदिस्त जागेत जवळ जवळ वर्षभर, नावाला काही महिन्यांची विश्रांती घेऊन कारखाना सुरूच असायचा. भाद्रपदात, गणेश चतुर्थीला सगळा कारखाना रिकामा व्हायचा. पण पूर्ण रिकामा नाही. भयाण, एकाकी वाटू नये…

Read More

भाग – 1 सकाळी लवकर येऊन बाप्पाने कंपनीच्या स्टोअररूमच्या समोर टेम्पो लावला. आज सामानाची  डिलिव्हरी होती. आज चतुर्थी होती. बाप्पाचा कडकडीत उपास असतो. पण त्याच्या उपासाचा त्याच्या कामावर कधीच परिणाम होत नाही. व्यवस्थित पॅक केलेली खोकी त्याने क्रमवार लावून घेतली. सगळ्यात शेवटी असणारी, लांबच्या डिलिव्हरीची खोकी आधी रचून, त्याच्यापुढे एकेक खोकं रचत, त्याने चटाचट काम उरकलं. सर्व व्यवस्थित आहे ना? याची त्याने एका नजरेत खात्री करून घेतली. योग्य ती कागदपत्रं घेतली. एखादा कलाकार जसा रंगभूमीला वंदन करून त्यावर पाय ठेवतो, त्याप्रमाणे गाडीत चढण्याच्या आधी त्याने गाडीला नमस्कार करून, उजवा पाय प्रथम आत टाकला. डॅश बोर्डवर चिकटवलेल्या गणपतीच्या छोट्या संगमरवरी मूर्तीला,…

Read More

आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय  नव्हती. शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो. शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती. गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे; बाहेर येणारे ठसेच  नसायचे, तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा! खूप वर्षं गावाकडची याद सतावत होती. आज शेवटी आलोच गावी. सगळं बदललंय. माझं गाव मलाच ओळखता येत नाहीये. खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता. जाताना खूप दूरपर्यंत त्याने माझी सोबत केली होती; पण ती खाडीच आता दिसत नव्हती. गडप झाली होती. खाडी, तळी, विहिरी सगळंच बुजवलं होतं. तिवरांची जंगलं, वाड्या, आमराया सगळं सफाचट झालं होतं. या गगनाला भिडणाऱ्या…

Read More

कूकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली… चटकन उठायचं, पटकन धावायचं, झटकन वळायचं, लगबग करायची… हे माझ्या अंगातच. मुद्दाम नाही करत. आपोआपच होतं. आई तर म्हणायचीच, “अगं अगं आपटशील!” आणि खरोखरच घरातील कधीही न हालणाऱ्या वर्षोनुवर्ष एकाच जागी स्थिर असणाऱ्या भिंती, कपाट अशांवर मी आदळायची… हळूहळू माझं वय वाढलं. ओरडायला आई पण राहिली नाही. एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते. फोनची रिंग वाजली, तेव्हा लॅण्डलाइन फोन होते, मी ताडकन उठले, फोनकडे धावले आणि गुडघ्यातून कट्टकन आवाज झाला. एक पाऊल टाकता येईना. हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं. घरात अडकले. हालचालींवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणामुळे! ज्याची काहीच गरज नव्हती.…

Read More

आजूबाजूला गुलमोहराचे, सोनमोहराचे घनदाट वृक्ष! त्यावर मधुमालती आणि विविध रंगाच्या बोगनव्हिलाच्या फुलांची दाटी. मध्यभागी सळसळ करणारा अजानवृक्ष; तिथेच ताजा टवटवीत हिरवागार रंग दिलेले लाकडी बाक. बागेच्या त्या एका बाजूच्या कोपऱ्याची मोठ्या रसिकतेने रचना केलेली. बायकांच्या त्या ग्रुपची ती ठरलेली जागा होती. नेमकं काहीही ठरवलेलं नसायचं. जी ती आपापल्या सोयीने यायची. माझाही हळूच एकदा त्या ग्रुपमध्ये समावेश झाला. खूप मजा यायची. दिवसभराचा सगळा ताण, घरच्या कटकटी, ऑफिसमधली खेचाखेची सगळं सगळं काही तिथे आल्यावर विसरायला व्हायचं. कसली बांधिलकी नाही, जबाबदारी नाही, वर्गणी नाही; हवं तिने यावं, हवं तेवढा वेळ बसावं, हवं तेव्हा जावं! ग्रुपच्या अलिखित नियमाप्रमाणे कोणीही खासगी माहिती, बोचरे शब्द, नकोसे…

Read More

मैत्रिणीच्या घरी सर्वांना मांसाहार आवडतो; पण ती घरी करत नाही. कारणं ना, तशी बरीच आहेत. हं… आलं माझ्या लक्षात! तुम्ही मला बोलण्यात गुंतवता आहात ना! तर, तिच्याकडे  माशांचे प्रकार केले जात नाहीत; हॉटेलमध्ये गेल्यावर खातात; पण घरी बनवलेला पदार्थ म्हणजे, त्याला वेगळीच चव… म्हणून जेव्हा ही काहीतरी खास करते; तेव्हा आवर्जून मैत्रिणीला पाठवते. आज हिने चिम्बोऱ्यांचं कालवण केलं होतं. मैत्रिणीच्या छोट्याला चिम्बोऱ्या खूप आवडतात ते हिला माहिती होतं. एका डब्यात हिने कालवण भरलं; आपण नेऊन द्यावं की, तिच्या घरचं कोणी इकडे येऊ शकतंय ते पहावं, म्हणजे फेरी वाचेल; या हेतूने, विचारण्यासाठी तिने मैत्रिणीला फोन लावला… फोन उचलल्याबरोबर मैत्रीण आनंदाने चीतकारली,…

Read More

परिचितांपैकी एकाने त्यांचं यश साजरं करण्यासाठी ग्रँड पार्टी दिली होती. सर्व यजमानांच्या प्रतिष्ठेला साजेसेच होते. आम्ही पण निमंत्रितांपैकी एक होतो. परफ्युम्सचा घमघमाट, ऊंची कपड्यांची सळसळ, रंगवलेल्या ओठांच्या कमानी विस्कटणार नाहीत याची कसरत करत करत चालेलं खानपान! अदबशीर बोलणं नखरेल वागणं…! असं म्हणतात की, हास्यमुख ठेवायला चेहऱ्यावरच्या कमीत कमी स्नायूंचा उपयोग होतो… खोटं आहे ते! थोड्याच वेळात माझी जिवणी आणि चेहऱ्यावरचे यच्ययावत स्नायू दुखायला  लागले. पुरातन काळी भाल्याच्या टोकावर शिकार रोवून ती फिरवली जायची, त्याप्रमाणे टूथपिकला टोचलेला, पेपर नॅपकीनने लपेटलेला कोणतातरी एक पदार्थ घेऊन मी हळूहळू हॉलच्या सुरक्षित कोपऱ्याकडे सरकायला लागले. इतक्यात माझं लक्ष दोन वयस्क स्त्रियांकडे गेलं. प्रत्येक घोळक्यात जाऊन…

Read More

22 सप्टेंबर 1965 रोजी रंगमंचावर आलेल्या ‘अदरक के पंजे’ या एकपात्री कार्यक्रमाची सांगता 11 फेब्रुवारी 2011 ला झाली. त्या दिवशी पडलेला पडदा प्रचंड लोकप्रियता आणि रसिकांची मागणी असूनही पुन्हा वर उचलला गेला नाही. त्याचा कर्ताकरविता बब्बन खान आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अदरक के पंजे  आणि  बब्बन खान  यांची  इस्टोरी  पुरी  फिल्मी  वाटावी अशी आहे. बब्बन खान तेव्हा ऐन विशीत होते. हातात पदवी होती, पण नोकरी नव्हती. घरात चारी  विश्व दारिद्र्य होतं. हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील होतं. बब्बन खानचे तीन भाऊ आणि चार बहिणी कुपोषणामुळे निरनिराळ्या वयाला मरण पावले होते. हे धाकटे मुल जगले होते. गरिबीत कसेबसे वाढत होते. नोकरीसाठी, काही…

Read More