Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माणूस नावाचं रसायन!
    ललित

    माणूस नावाचं रसायन!

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरAugust 4, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, हसरी वृंदा, माणूस नावाचं रसायन, वृंदाचा नवरा, वृंदाचा दारुडा नवरा, सुगरण वृंदा, वृंदा पतीवर नाराज, पतीचे वृंदावर प्रेम, वृंदाचा हळवा पती,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आजूबाजूला गुलमोहराचे, सोनमोहराचे घनदाट वृक्ष! त्यावर मधुमालती आणि विविध रंगाच्या बोगनव्हिलाच्या फुलांची दाटी. मध्यभागी सळसळ करणारा अजानवृक्ष; तिथेच ताजा टवटवीत हिरवागार रंग दिलेले लाकडी बाक. बागेच्या त्या एका बाजूच्या कोपऱ्याची मोठ्या रसिकतेने रचना केलेली. बायकांच्या त्या ग्रुपची ती ठरलेली जागा होती. नेमकं काहीही ठरवलेलं नसायचं. जी ती आपापल्या सोयीने यायची. माझाही हळूच एकदा त्या ग्रुपमध्ये समावेश झाला.

    खूप मजा यायची. दिवसभराचा सगळा ताण, घरच्या कटकटी, ऑफिसमधली खेचाखेची सगळं सगळं काही तिथे आल्यावर विसरायला व्हायचं. कसली बांधिलकी नाही, जबाबदारी नाही, वर्गणी नाही; हवं तिने यावं, हवं तेवढा वेळ बसावं, हवं तेव्हा जावं!

    ग्रुपच्या अलिखित नियमाप्रमाणे कोणीही खासगी माहिती, बोचरे शब्द, नकोसे प्रश्न विचारायचे नाहीत! नेहमीच्या बैठकीमुळे आपोआप संभाषणातून कळेल तितकंच! त्यामुळे तिथे कायम हास्याची खळखळ असायची. वृंदा सगळ्यात पहिली हजर होणारी आणि सगळ्यात शेवटची जागा सोडणारी होती. ग्रुपमध्ये जान आणणारी, सदा प्रसन्न, बडबडी वृंदा सगळ्यांनाच हवीशी वाटायची. रोज तिच्या घरी काहीतरी तळण असायचंच… वडे, समोसे, भजी!

    “वृंदा, रोज रोज डीप फ्राय? अग चांगलं नाही तब्येतीला…”

    “मी बनवते, पण खात नाही! नवऱ्याला लागतं असं चटकमटक… रोज!”

    कशी कोण जाणे तिची आणि माझी जवळीक जरा जास्तच दाट झाली. तिच्या काही उद्गारातून, शब्दातून, वाक्यातून मला तिचं आयुष्य समजायला लागलं आणि मग तिच्या विनोदी गप्पांतून, हसतमुखातून माझ्या मनातील विषादच दाटून यायला लागला. हसऱ्या चेहऱ्याआड तिने लपवलेल्या वेदना मला कळू लागल्या.

    हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…

    वृंदा स्वतः पीएचडी… प्रोफेसर. नवरा केमिकल इंजिनिअर. पण बेवडा म्हणावा इतका पिअक्कड. तो घरातच जांभळाची, काजूच्या बोंडाची, फणसाच्या गऱ्याची, नाना फळांची वाइन बनवायचा. अशी त्याच्याबद्दलची आवई होती. माणूसघाणा, आपल्याच विश्वात रमणारा! तिला फिरायची आवड, तर तो घरकोंबडा! ती त्याचा एक पैसा पण वापरायची नाही. स्वतःच्या पैशाने जगभर फिरायची… एकटी! नवरा जायचा नाही आणि तिला पण त्याला नेणं आवडायचं नाही. असा विकृत, दारुडा नवरा कुणाला आवडणार ना! म्हणजे आमची ही सगळी मतं, ती सांगायची त्यावरून बनली होती.

    एक दिवस आम्ही दोघीच असताना मला म्हणाली, “लवकर मरेल तो! इतकं नकोनको ते त्याला खाऊ घालतेय मी, की खाऊन खाऊनच मरेल…” मी नखशिखांत थरथरले. मला वाटतं त्या दिवसापासून मी तिच्यापासून दुरावायला लागले.कितीही वाईट असला तरी, नवऱ्याच्या मरणाची वाट पाहणारी बायको, ही संकल्पना मला पचण्यासारखी नव्हती!

    त्यावर्षी ती ऑस्ट्रेलियाला जाणार होती. “ही माझी आठवी फॉरेन ट्रिप बरं का! मी 80 वर्षांची होईपर्यंत फिरणार आहे. पन्नास ट्रिपचं टार्गेट पूर्ण करूनच मी मरणार बरं का!”

    आम्ही सर्वांनी तिला ‘तथास्तु’ म्हटलं. नंतर, सहा महिने मी लेकीच्या मदतीला गेले. परत आल्यानंतर कळलं, हार्ट अटॅक येऊन वृंदा अचानक गेली… तिची ट्रिप झालीच नाही!

    तिच्यानंतर हळूहळू आमचा ग्रुप पण गळू लागला. नंतर तर तिथे सगळ्याच नव्या बायका दिसू लागल्या. माझा पण रस संपला. जवळ जवळ दहा-बारा वर्षे झाली या गोष्टीला! आज सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही दोघे चालायला गेलो होतो. समोर वृंदाचा नवरा! माझ्या नवऱ्याचा परिचित! मला मुळीच बोलायचं नव्हतं त्याच्याशी… पण हा गोष्टीवेल्हाळ ना! थांबलाच बोलायला. नाईलाजाने जिवणी रूंद करून मला थांबावंच लागलं. बोलताना अर्थातच वृंदाचा विषय निघालाच! त्याचे डोळे डबडबले! खूप कौतुक करत होता तिचं. “मी घरी यायच्या आधी माझी बाटली आणि ग्लास… सगळा सरंजाम तय्यार असायचा! खूप लाड केलेन माझे! रोज तऱ्हेतऱ्हेचा, ताजा ताजा चकणा… भजी, चकली, समोसे… जे काय म्हणेन ते. तंदुरी, चॉप्स, झिंगे… सगळं काही स्वतः बनवायची…”

    माझ्या नवऱ्याला कुठे काय बोलावं, ते कळतच नाही. “च्यायला रे! तरी तब्येत छान ठेवलीयेस… उलट बायको गेल्यानंतर आणखीनच फिट दिसातोयस! पंच्याहत्तर झाले ना तुझे? साठीतला दिसातोहेस!”

    हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…

    तोही खळखळून हसत म्हणाला, “अरे, ती होती तेव्हा रोजची क्वार्टर लागायची मला. आता अगदी मोजून दोन पेग आणि चकणा म्हणजे सलाड आणि फळं! कोणत्याही परिस्थितीत रोज सकाळी पाच किलोमीटर आणि संध्याकाळी तीन किलोमीटर चालतोच! जेवण फक्त पोळी भाजी! अरे आता खाण्यापिण्याचे लाड करायला वृंदा नाही ना!खूप हौस होती तिला… रोज नवे पदार्थ करून मला खाऊ घालायची. मरेपर्यंत जगायचं आणि ते देखील चांगलं आनंदाने जगायचं… जीवन उपभोगायचं!” बोलता बोलता तो गहिवरून आला.

    कधीतरी आम्ही त्याचा निरोप घेतला. मी गोंधळून गेले होते. माझी वृंदाच्या नवऱ्याबद्दल काही वेगळीच कल्पना होती… वृंदाने करून दिलेली! हा तर चांगला हसरा, जिंदादिल, शिस्तशीर, आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणारा, वृंदावर प्रेम करणारा होता… वृंदा पण हसरी, खेळकर वृत्तीची होती. दोन चांगली माणसं एकत्र येतात, तेव्हा चांगलं घडेलच अशी शाश्वती नसते का? एका माणसामध्ये किती विविध माणसं लपलेली असतात. असतं तरी कसं हे अजब, माणूस नावाचं रसायन!!

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    जेन झी

    August 15, 2026 ललित

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026 ललित

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जेन झी

    By प्रदीप केळुस्करAugust 15, 2026

    आईचा साठावा वाढदिवस म्हणून समीराने आठ दिवसांची रजा घेतली आणि पुढील आठ दिवस आईसोबत घालवायचे…

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.