Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माझं गाव अन् बालपणीचे मित्र
    ललित

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरAugust 18, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, चोरांची दुनिया, गावाची आठवण, गावातील बालपणीचे मित्र, रम्या आणि पम्या, रम्या पोलीस अधिकारी, पम्या चोर, पम्याचे ऐश्वर्य, पम्याचा महाल, गाडीची चोरी, दागिन्यांनी मढलेला पम्या, वाँटेड चोर नोकर
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय  नव्हती. शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो. शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती. गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे; बाहेर येणारे ठसेच  नसायचे, तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा!

    खूप वर्षं गावाकडची याद सतावत होती. आज शेवटी आलोच गावी. सगळं बदललंय. माझं गाव मलाच ओळखता येत नाहीये. खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता. जाताना खूप दूरपर्यंत त्याने माझी सोबत केली होती; पण ती खाडीच आता दिसत नव्हती. गडप झाली होती. खाडी, तळी, विहिरी सगळंच बुजवलं होतं. तिवरांची जंगलं, वाड्या, आमराया सगळं सफाचट झालं होतं. या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं, लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं. ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो, तो पाटलाचा वाडा शोधायचा होता. समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं. रम्याची आठवण आली. म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का! भेटला तर त्याच्याच संगतीनं गाव पालथा घालू. लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो, तसा याच पोलीस स्टेशनमध्ये तो होता.

    शिरलोच आतमध्ये कोणीतरी दखल घेईपर्यंत, भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो. शेवटी हात हालवत बाहेर पडलो. रम्या आता तिथे नव्हताच; पण पाटलाच्या वाड्याचा मात्र पत्ता मिळाला. पोहोचलो तिथे… आबाबाबाबाSS, वाडा कसला? बकिंगह्याम पॅलेसच होता तो! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता, इनामदाराचा होता. पम्यापण दोस्तच माझा! म्हटलं बघूया भेटतो का!

    गेटवरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला. जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळच्या खोऱ्यातला डाकू वाटत होता. या भल्यामोठ्या मिशा, त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते. चेहराभर नुसत्या मिशाच मिशा… कायम पम्या म्हणायची सवय… त्याचं नावच आठवेना! मनाचा हिय्या करून त्याला विचारलं… शेवटी ‘साहेब भेटतील का?’

    हेही वाचा – पित्याचा निर्णय!

    महालात फोन… नोंद वहीत संपूर्ण माहिती, मेटल डिटेक्टरमधून तपासणी, अंगाची चाचपणी… असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो. माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली.

    जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार. दहशत बसेल असे एकेक चेहरे! महालात मात्र दिवाणखान्यातच शाही थाटात पम्या बसला होता. मला पाहिल्याबरोबर दोन्ही हात पसरून उठला, मला गळामिठी मारली… मी खूश! इतक्या वर्षांनी देखील मला ओळखलं म्हणून… आणि अचंबितही! पाचवीतच शाळा सोडल्यानंतर याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली या कल्पनेने… बोलता बोलता कळलं त्याने अबराकाडबरा युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती.

    माझं आगतस्वागत तर जंगी झालं. सोन्याच्या ट्रोलीवर ठेवलेल्या सोन्याच्या टी-सेटमधून मला चहा देण्यात आला. मी प्यायलो  नाही, ओठ आणि जीभ भाजेल या भीतीने! बिस्किटं पण  होती. ती देखील मी खाल्ली  नाही. कोण जाणे, सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोजचा मुलामा दिलेला असायचा! एक म्हणता दोन व्हायचं! दाताचा तुकडाच पडायचा! ट्रोली घेऊनआलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लगडलेला होता. गळ्यात मनगटाएवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेन, मनगटात, दंडावर, कमरेभोवती, बोटात, सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं. एवढंच काय, त्याची स्लीपर देखील सोन्याची होती. हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता. एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळं उडत होती; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन, त्यात कोळी कोळिष्टके करीत होता.

    एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला… अरेच्या, या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर ‘वाँटेड’च्या यादीत पाहिले होते! या चहा देणाऱ्याचा फोटो गंठण आणि चेन खेचाणाऱ्यांच्या गुन्हेगारांत होता. मी बाहेर जाण्यासाठी धडपडत गांगरून उभा राहिलो. पम्या मात्र चाणाक्ष, अंतर्ज्ञानी! त्याने  माझा  जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला. माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला, “तुला वाटतंय ते खरं आहे. अरे, हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना ते सापडत नाहीयेत. मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत. आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे. माझ्याच घरात असल्यामुळे  मला ते सोपेही जाणार आहे. नाहीतर, कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी! मित्रा, एक लक्षात ठेव सज्जन – दुर्जन; सत्य – असत्य…” तो थोडा घुटमळला,

    “पुण्य… पाप; चांगले… वाईट…” मी म्हणालो.

    तो हसला! खळखळून, गडगडून आणि म्हणाला, “शाब्बास! तर मी काय म्हणत होतो,  या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन, सत्य, पुण्य, चांगले यांचाच विजय होत असतो. दोस्ता, अंतिम विजय आपलाच आहे,” मला त्याची तळमळ कळत होती. त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोहोचली होती.

    हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…

    मी  मुंडी  हलवली. पुन्हा पम्याने मला मिठी मारली. कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो. दरवानाने गेट उघडलं. मी माझ्या गाडीकडे वळलो आणि मटकन खालीच  बसलो. गाडीची चारी  चाकं, स्टीअरिंग व्हील, डेक सगळं चोरीला गेलं होतं. सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेटकडे वळलो. गेट बंद होतं, पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या.

    मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली. कोणीही माझी दखल घेतली नाही. कमांडोंची ट्रिगरवरची बोटं मला दिसली. मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो. आता काय  करावं बरं! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशनवर जावं  की, शहाण्यासारखं एखादं गॅरेज गाठावं? काहीही करायचं तर पैसे तर हवेत! मी खिशात हात घातला आणि…

    पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळलं. पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं. मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत, पाय फरफटवत, समजूतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली…

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    मनावरचा घाव

    August 18, 2026 ललित

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026 ललित

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मनावरचा घाव

    By दिलीप कजगांवकरAugust 18, 2026

    सदानंद आणि सावित्रीबाई पुण्याला राहात होते. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा चेन्नईत कामाला होता.…

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 400
    • अवांतर 205
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 540
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 859
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.