Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्वत:ला सांभाळूया…
    अवांतर

    स्वत:ला सांभाळूया…

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरAugust 11, 20262 Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, स्वत:ला सांभाळा, स्वत:ची काळजी घ्या, दुसऱ्यांवर भार टाकू नका, दुसऱ्यांचा विचार करा, स्वत: तब्येत सांभाळा, ShareThisPost, SharePost, ShareThis, ShareLikeFollow, shareyourstory, आणि
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कूकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली… चटकन उठायचं, पटकन धावायचं, झटकन वळायचं, लगबग करायची… हे माझ्या अंगातच. मुद्दाम नाही करत. आपोआपच होतं. आई तर म्हणायचीच, “अगं अगं आपटशील!”

    आणि खरोखरच घरातील कधीही न हालणाऱ्या वर्षोनुवर्ष एकाच जागी स्थिर असणाऱ्या भिंती, कपाट अशांवर मी आदळायची… हळूहळू माझं वय वाढलं. ओरडायला आई पण राहिली नाही.

    एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते. फोनची रिंग वाजली, तेव्हा लॅण्डलाइन फोन होते, मी ताडकन उठले, फोनकडे धावले आणि गुडघ्यातून कट्टकन आवाज झाला. एक पाऊल टाकता येईना. हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं. घरात अडकले. हालचालींवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणामुळे! ज्याची काहीच गरज नव्हती. मी हे सर्व संथपणे करू शकले असते.

    हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…

    आपला जॉब, मुलं-बाळं, सांसारिक जबाबदाऱ्या… धावपळीचं आयुष्य म्हणजे मल्टी-टास्किंग! त्यामुळे आपल्या शरीराला काही सवयी आपोआप पडलेल्या असतात, काही आपण प्रयत्नाने अंगी बाणवलेल्या असतात. वय वाढत गेल्यावर यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात, पण आपल्या सवयी मात्र त्याच राहिलेल्या असतात. त्या आपण जाणीवपूर्वक बदलायला हव्यात. कदाचित जबाबदाऱ्या कमी झाल्या नसतील किंवा आणखीन दुसऱ्या अंगावर पडल्या असतील… तरीही आपण बदलायला हवं. शीर सलामत तो पगडी पचास!  स्वहीत जपावे, परहीत जाणावे. अग्रक्रम आपल्या स्वास्थ्यालाच द्यायला हवा.

    आता मी पायऱ्या चढता उतरताना, रस्त्याच्या चढ उतारावर शांतपणे चालते. जिथे उपलब्ध असेल, तिथे कठड्याचा आधार घेणे. कोणी आधार देण्यासाठी हात पुढे केला तर, तो विनासंकोच स्वीकारणे… मग पुरुष आहे की स्त्री आहे, याचा विचार करीत न बसणे…

    माणसं खरंच चांगली असतात. आपणही हा विश्वास मनात बाळगायचा. एकदा मी रस्ता ओलांडायला बराच वेळ उभी होते. तिथे आणि पुढे बऱ्याच अंतरावर सिग्नल नाहीये. दोन पावलं पुढे… चार पावलं मागे… असं माझं चाललं होतं. इतक्यात एक तरुण मुलगा आला, म्हणाला, “काकू मी लांबून बघितलं तुम्हाला, भराभरा आलो. चला, मी नेतो तुम्हाला पलीकडे…” त्याने मला सुखरुप रस्ता ओलांडून दिला.

    वय वाढल्यावर आत्मविश्वास कमी होतो. अंतराचं, वेळेचं, आपल्या वेगाचं त्रैराशिक जुळत नाही. रिस्क घ्यायचीच नाही, सांभाळायचं स्वतःला! घरात स्लीपर्सऐवजी बंद बूट घालावेत. यावर एका ताईंनी म्हटलं होतं, “कितीही सांभाळा पडायचं असेल तर पडतोच!”

    हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    अगदी खरंय हे… तरीही स्वतःला सांभाळायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचाच. ‘होणारे न टळे ब्रह्मा येता जरी आडवा’ असं म्हणतातच. पण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असंही म्हणतात… मग काय आपण नोकरी-धंदा, भविष्याची बेगमी नाही करीत? करतो ना? की त्या हरीची वाट पाहात बसतो? नाही ना? मग या ब्रह्माला तरी का संधी द्यायची? आपल्याला शक्य आहे तेवढं करायचंच!

    माझी आई म्हणायची, “आपण सांभाळायचं आणि दुसऱ्यांना यश द्यायचं.”

    तेव्हा मला फक्त शब्दार्थ कळायचा. आता भावार्थ कळतो.

    आपल्याला काही झालं, तर आपल्याला काही करावं लागत नाही. आपण बेशुद्ध असतो किंवा वेदनांनी कण्हत, कुथत, कळवळत पडलेलो असतो. आपल्यासाठी धावपळ शुश्रूषा, आर्थिक तरतूद… सगळं आपल्या परिवाराला करावं लागतं. आपल्याला बरं वाटावं म्हणून ते इकडची दुनिया तिकडे करीत असतात! आपल्या तारुण्यातील कर्तबगारीचा वेळ ते आपल्यासाठी खर्च करीत असतात. आपल्या जीवलगांवरील आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही खूप मोठी संधी आपल्या हातात असते ती वापरूया… स्वत:ला सांभाळूया!

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026 अवांतर

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026 अवांतर

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026 अवांतर

    2 Comments

    1. सौ. स्नेहा लाडसावंगीकर on August 13, 2026 1:35 pm

      किती सुंदर लिहिलंस गं सुरेखा आणि अगदी खरंय,आपली तब्येत सांभाळणं आपल्याच हातात असतं. उगाचच जास्तीचं धाडस कशाला करायचं? जेवढं जमतं तेवढंच आरामात करायचं. अप्रतिम तसेच उद्बोधक लेखन.

      Reply
    2. Sadhna Khare on August 15, 2026 5:47 pm

      अगदी बरोबर आहे.आपणच आपलं संभाळून राहिलो कि दुसर्‍याना आपला त्रास नाही होत.

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    By तृप्ती देवAugust 20, 2026

    हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या…

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात महिलांना सुरक्षा कवच

    August 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 901
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.