Author: रेवती निलेश पांडे

Avatar photo

विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

झालं! पुढच्या आठवड्यात नवरात्र येणार म्हणून मी आत्ताच नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या काढून ठेवल्या. एकेक साडी बाहेर काढताना अचानक मनात विचार आला, कधीपासून आपण नवरात्रीला नऊ रंगांच्या साड्या नेसायला लागलो? सुरुवातीला हे नऊ रंगांचं फॅड आलं, तेव्हा मी मनातल्या मनात वैतागले होते. काहीही नवीन आलं की, आपण लगेच त्याच्या मागे धावतो. कुणीतरी काहीतरी सुरू केलं आणि आपणही ते फॉलो करतो. पण आज नवरात्र जवळ आलं की, माझं डोकं आपोआप नऊ साड्यांचा विचार करू लागतं. ज्या गोष्टीला कधी ‘फॅड’ म्हटलं होतं, तीच आज अंगवळणी पडली आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते, इतरही ती करू लागतात आणि हळूहळू ती आपल्या…

Read More

“हमारी दो ज़िंदगियाँ होती हैं… एक जो हम हर दिन जीते हैं, दूसरी जो हम हर दिन जीना चाहते हैं…” दिव्य प्रकाश दुबे यांच्या ‘अक्टूबर जंक्शन’ या कादंबरीच्या सुरुवातीला वाचलेली ही वाक्यं मनात कुठेतरी रेंगाळत राहिली होती. नुकतीच त्यांच्याच ‘मुसाफिर कैफ़े’ या कादंबरीतील पात्रांवर आधारित नेटफ्लिक्सची ‘मुसाफिर कैफ़े’ ही मालिका पाहिली आणि अचानक ‘अक्टूबर जंक्शन’ची ही दोन आयुष्यं पुन्हा आठवली. कारण चंदरकडेही जणू ही दोन आयुष्यंच आहेत. एक — जे तो प्रीतीसोबत जगतो… आणि दुसरं — जे त्याला सुधासोबत जगावंसं वाटतं. सुधा त्याला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवते. त्याच्या आत दडलेली स्वप्नं जागी करते. आणि प्रीती? ती त्याच्या आयुष्यात राहून त्याच्या…

Read More

वर्नर हर्झॉग यांची Encounters at the End of the World ही जवळपास पावणे दोन तासांची डॉक्युमेंटरी आहे. पण त्यातला एक छोटासा प्रसंग जगभरात खूप व्हायरल झाला. त्या दृश्यात अनेक पेंग्विन्स अन्नाच्या शोधात समुद्राकडे चाललेले असतात. अचानक त्यांच्यातला एक पेंग्विन थांबतो… जणू काही क्षणभर विचार करतो… आणि मग बाकी सगळ्यांच्या विरुद्ध दिशेने— एका निर्जन पर्वताच्या दिशेने चालायला लागतो. हा प्रसंग पाहून वर्नर हर्झॉग यांनी पेंग्विन्सवर वीस वर्षे संशोधन केलेल्या शास्त्रज्ञ डेव्हिड एन्ली यांना विचारले — “तो असं का करतो?” त्यावर डेव्हिड एन्ली यांनी सांगितले की, कधी कधी काही पेंग्विन दिशाहीन होतात. त्यांच्या दिशाज्ञानाच्या यंत्रणेत बिघाड होतो. अशा पेंग्विनला उचलून पुन्हा कॉलनीत…

Read More

आज ताटात गरमागरम पोळी वाढून घेताना मला अचानक आईच्या ताटाची आठवण आली. ती संध्याकाळी सकाळची पोळी घ्यायची आणि सकाळी आदल्या रात्रीची. अगदी रोजच नाही, पण बऱ्याचदा हे असंच व्हायचं. बरं, सासूबाईंचंही तसंच. एकदा सकाळच्या जेवणाच्या वेळी मी त्यांना विचारलंच, “काय लॉजिक आहे हे? ताटात कालची शिळी पोळी घेतली आहे. त्यामुळे या ताज्या पोळ्यांमधून तुमची जी उरणार आहे, तीच तुम्ही रात्री खाणार. त्यापेक्षा ती आत्ताच घ्या ना — गरम, मऊ आणि ताजी!” मी त्यांना माझं ‘शिळी-ताजी, ताजी-शिळी’ हे संपूर्ण चक्र अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. अर्थात, या सगळ्यात काटकसर, अन्नाची नासाडी किंवा घर चालवण्याचं शहाणपण…

Read More

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक विषय फार गाजत होता — राधा ही ऐतिहासिक व्यक्ती होती की नव्हती?  एक गट ब्रह्मवैवर्त पुराण आणि इतर संदर्भ देत राधेचे अस्तित्व मान्य करत होता, तर दुसरा गट महाभारतात राधेचा स्पष्ट उल्लेख नाही, तसेच श्रीमद्भागवतात केवळ एका विशेष गोपीचा उल्लेख आढळतो, ती कदाचित राधा असावी असे म्हणत होता. हे सर्व वाचताना मला कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायचे नव्हते. कारण मला त्या वादापेक्षा एक वेगळाच प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागला. रुक्मिणीचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवत, हरिवंश आणि इतर अनेक ग्रंथांत आढळतो. सत्यभामाही कृष्णाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तरीसुद्धा संतांच्या अभंगांत, गवळणच्या गोडव्यात, कवींच्या कवितांत आणि लेखकांच्या शब्दांत राधाच…

Read More

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर सहज एक रील बघितली. त्या रीलमध्ये एक अतिशय छोटी मुलगी होती. नीट बोलताही येत नव्हतं तिला अजून. पण ती तिच्या आईशी अगदी रागाने भांडत होती. तिचे शब्द स्पष्ट नव्हते, पण तिचा तोतरा राग, तिचे हावभाव, तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड… सारंच इतकं निरागस आणि गोड होतं की, नकळत हसू आलं. तिची आईसुद्धा मुद्दाम नाटकीपणे तिला उत्तर देत होती. त्या दोघींमधला तो क्षण खूप जिवंत वाटला. पण मग सहज म्हणून खाली कमेंट्स वाचल्या… आणि खरं सांगायचं तर थोडं अस्वस्थ वाटायला लागलं… “आत्ता गोड वाटतंय, मोठेपणी डोक्यावर बसेल.” “आमचं मूल असतं तर, थोबाड फोडलं असतं.” “संस्कार दिसतायत.” हे वाचून क्षणभर खरंच…

Read More

10 मे — कवी ग्रेस यांचा जन्मदिवस. दरवर्षी या दिवशी त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटतं. पण मग हात थबकतात. ज्यांच्या कवितेला आपण पूर्णपणे समजून घेऊ शकलो नाही, त्यांच्याबद्दल नेमकं लिहायचं तरी काय? कधी कधी ग्रेस यांच्या कविता मला हम्पीच्या भग्न देवळांसारख्या वाटतात. हम्पीला लोक फक्त देव पाहायला जात नाहीत. ते तिथे जातात त्या जागेचं शांत सौंदर्य अनुभवायला, त्या मोडकळीस आलेल्या दगडांच्या शांततेत हरवून जायला, त्या जागेच्या नि:शब्द इतिहासात आणि वेदनेत काहीतरी शोधायला. ग्रेस यांच्या कवितांचंही तसंच आहे. त्यांच्या कवितेचा अर्थ पहिल्याच वाचनात उमगत नाही. कधी कधी तर कविता पूर्ण समजलीच नाही, असं वाटतं. पण तरीही आपण त्या कवितांमध्ये रमतो. कारण तिथे केवळ…

Read More

तुझं असं आवेगाने येणं नेहमीचचं आहे. वाट बघण्यासाठी जे धैर्य लागतं ते नाही तुझ्यात, माहिती आहे मला. अरे किती वर्षांची मैत्री आहे आपली. अगदी लहानपणापासून ओळखते मी तुला… तेव्हा आपण दोघंही किती निष्पाप होतो रे… तू यायचास, आणि मी सगळं सोडून धावत बाहेर यायचे. तुझ्याबरोबर नाचायचे काय, उड्या मारायचे काय, आणि अभ्यासाच्या वहीचे पानं फाडून आपण सोबत केलेल्या होड्या, त्या वेडेपणातही किती मजा होती ना? हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश! हळूहळू वय वाढलं… आणि आपलं नातंही बदललं. त्या निरागस धडपडीतला खट्याळपणा कमी झाला. आता तू यायचास आणि मी कधी अंगणात तर कधी गच्चीवर फक्त शांतपणे उभी राहायचे. तुला अनुभवायचे. तुझ्या येण्याने…

Read More

कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या अगदी वेळेवर अभ्यास करून पास होणारा आमचा ग्रुप होता. मग काय, परीक्षेच्या दोन-चार दिवस आधीपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, असं आम्हा सर्व मैत्रिणींचं रुटीन होतं. ग्रुपमधली आमची एक मैत्रीण शीतल नेहमी सांगायची, “रात्री जेव्हा मी अभ्यास करते ना, तेव्हा माझे बाबा स्वतः बारा-एक वाजता उठून मला कॉफी करून आणून देतात. त्या कॉफीवर मग पुढचे दोन तास छान अभ्यास होतो.” आम्हाला या गोष्टीचं फार अप्रूप वाटायचं. एक तर तिला रात्री बारा वाजता कॉफी मिळायची आणि तीही स्वतः वडिलांनी करून दिलेली! आमच्या ग्रुपमध्ये त्या मैत्रिणीचे वडील सोडले, तर बाकी कोणाचेच वडील कधी किचनमध्ये ओट्याजवळ उभे राहिलेले कोणाला आठवत नसावेत.…

Read More

आपण सध्या अशा जगात राहतोय जिथे नाती ही ‘सोय’ झाली आहेत. जिथे एकमेकांमध्ये मनापासून गुंतण्यापेक्षा व्यवहार महत्त्वाचा झालाय. प्रत्येक गोष्टीचा तोल सांभाळून आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवूनच इथे पावलं टाकली जातात. एखादं नातं ‘वर्क’ होत नसेल, तर लगेच ‘मूव्ह ऑन’ करून दुसऱ्या नात्यात गुंतणं आजच्या पिढीला फारसं कठीण वाटत नाही. पण या व्यावहारिक जगाच्या समांतर अजून एक जग चालतं — पुस्तकांच्या पानांमधलं जग. कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा हे पुस्तकाचं जग विलक्षण वाटतं, कारण ज्या जाणीवा आपण उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या जगात अनुभवू शकत नाहीत, त्या ही पुस्तकं आपल्याला अनुभवायला लावतात. गीत चतुर्वेदी यांची ‘सिमसिम’ ही हिंदी कादंबरी वाचताना नेमकी अशीच अनुभूती येते.…

Read More