Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!
    ललित

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेApril 22, 20262 Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमाची उत्कटता, व्यक्तीविशेषच्या पलीकडची प्रेमाची अनुभूती, बसरमलचं पहिलं प्रेम, फाळणीत गमावलेलं पहिलं प्रेम, हरवलेल्या प्रेमाचा पुस्तकात शोध, मंगण माँचे पुत्रप्रेम
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपण सध्या अशा जगात राहतोय जिथे नाती ही ‘सोय’ झाली आहेत. जिथे एकमेकांमध्ये मनापासून गुंतण्यापेक्षा व्यवहार महत्त्वाचा झालाय. प्रत्येक गोष्टीचा तोल सांभाळून आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवूनच इथे पावलं टाकली जातात. एखादं नातं ‘वर्क’ होत नसेल, तर लगेच ‘मूव्ह ऑन’ करून दुसऱ्या नात्यात गुंतणं आजच्या पिढीला फारसं कठीण वाटत नाही. पण या व्यावहारिक जगाच्या समांतर अजून एक जग चालतं — पुस्तकांच्या पानांमधलं जग. कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा हे पुस्तकाचं जग विलक्षण वाटतं, कारण ज्या जाणीवा आपण उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या जगात अनुभवू शकत नाहीत, त्या ही पुस्तकं आपल्याला अनुभवायला लावतात. गीत चतुर्वेदी यांची ‘सिमसिम’ ही हिंदी कादंबरी वाचताना नेमकी अशीच अनुभूती येते.

    सामान्यतः आपल्याला काय वाटतं की, प्रेम करण्यासाठी काय लागतं? समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे असावी, आपल्याला आवडेल तशी ती वागावी, दिसावी आणि तिच्यासोबत भविष्याची स्वप्नं पाहता यावीत. पण प्रेम करण्यासाठी खरंच समोर ती व्यक्ती असणं गरजेचं असतं का? ‘सिमसिम’ आपल्याला एका अशा उत्कट प्रेमाची कथा सांगते, जिथे प्रेम ही केवळ एक ‘भावना’ रहात नाही, तर ते जगण्याचं ‘साधन’ बनतं.

    हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!

    या कथेचा नायक आहे — बसरमल जेठाराम पुरस्वानी. फाळणीनंतरच्या त्या विस्थापनाच्या आणि सिंधमधून निर्वासित म्हणून भारतात येण्याच्या काळातील विदारक जखमा काळजात घेऊन आलेला तरुण बसरमल आज एका छोट्याशा लायब्ररीत आपले शेवटचे दिवस काढतोय. तो सध्या स्मृती आणि विस्मृतीच्या अशा सीमेवर उभा आहे, जिथे एखादी गोष्ट आठवली की, त्याला वाटतं— “हे खरंच घडलं होतं की, ही केवळ माझी कल्पना आहे?” विस्मृतीचा पगडा इतका जोरदार आहे की, त्याला त्याच्या पहिल्या प्रेमाचं नावही नीट आठवत नाहीये.

    त्याला तिचा चेहराही आता नीटसा आठवत नाही, पण त्याच्या आयुष्यात असलेलं तिचं अस्तित्व मात्र त्याला पावलोपावली जाणवतं. भविष्यात तिला भेटण्याची कोणतीही चिन्हं नाहीत, इतकंच काय तर ती जिवंत असल्याचेही काही संकेत नाहीत; पण तरीही ती त्याच्यासाठी संपलेली नाही. त्याला आठवतोय तो फक्त तिच्या हाताला येणारा पेरूचा तो गोड वास आणि म्हणूनच तो तिला ‘जाम’  असं संबोधतो.

    ही कहाणी मुळात एका असीम संघर्षाची आणि विस्थापनाच्या आघातांची आहे. फाळणीच्या त्या काळात मानवी नाती विखुरली गेली, रक्ताची माणसं दुरावली आणि हक्काच्या घरापासून कायमचं वेगळं होण्याचं मरणप्राय दुःख लोकांनी सोसलं. या विरहाच्या छटा, स्थलांतराचा तो काळ आणि सर्वस्व गमावल्याची ती वेदना… इतके सगळे गडद रंग या कादंबरीत असतानाही, बसरमलची एक अतिशय धूसर आणि अस्पष्ट वाटणारी प्रेमसंवेदना इथे प्रकर्षाने हायलाइट होते. जगण्याचं ओझं वाहत असतानाही एका कोपऱ्यात जपलेली ही नाजूक आठवण, या संघर्षमयी कथेला एक वेगळीच उंची देते.

    बसरमलच्या शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा आयुष्यातला संघर्ष त्याला नकोसा होतो, तेव्हा तो याच कल्पना विश्वात ‘जाम’सोबत आपले क्षण घालवतो. इथे कोणतीही तक्रार नाही, कशाची अपेक्षा नाही की, काही मिळवण्याची जिद्दही नाही. ज्या व्यक्तीवर त्याने जिवापाड प्रेम केलं, ती आज या जगात नाही, याचा शोकही त्याला नाही. त्याचं प्रेम मिळवण्याच्या पलीकडे गेलं आहे.

    हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…

    कादंबरीत एक सुंदर प्रसंग आता येतो, जिथे पुस्तकातलं एक पात्र बसरमलला म्हणतं, “तू जे काही गमावलं आहेस, ते तुला पुस्तकांमध्ये सापडेल.” या एका वाक्याने बसरमलचं आयुष्य बदलतं. तो पुस्तकांवर जिवापाड प्रेम करू लागतो, जणू त्या शब्दांच्या अरण्यात तो आपली हरवलेली ‘जाम’ शोधत असतो.

    या पुस्तकातली दुसरी हळवी व्यक्तिरेखा म्हणजे बसरमलची पत्नी— मंगण माँ. तिचं प्रेम तर अथांग आहे. जो मुलगा कधी जन्मालाच आला नाही, त्याच्या प्रेमात ती वेडी झाली आहे. एका साध्या बाहुल्याला ती आपला मुलगा मानते आणि त्याला जीवापाड जपते. तिचं हे वेड वाचताना जाणवतं की, प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधलं नातं नसतं, ते एका न पाहिलेल्या अस्तित्वावरही किती उत्कट असू शकतं.

    कधी कधी बसरमलकडे पाहताना वाटतं की, तो भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकलेला एक पक्षी आहे, जो या व्यावहारिक वर्तमानात स्वच्छंद उडू शकत नाही. पण काही भावना अशा असतात ज्या कुठल्याही नफा-तोट्याच्या पलीकडे असतात. बसरमलसाठी त्याचं न मिळालेलं प्रेम हे दुःख नाही, तर त्याचं जगण्याचं बळ आहे. ‘सिमसिम’ हे पुस्तक प्रेमाच्या प्राप्तीपेक्षा ‘प्रतीक्षेचा उत्सव’ साजरा करणारं पुस्तक वाटतं.

    कितीही काळ लोटला तरी खऱ्या प्रेमाला विस्मृती कधीच मारू शकत नाही. वेळ आणि काळ यापैकी कशातच प्रेमाला संपवण्याची ताकद नसते. त्या प्रेमाच्या खुणा उरल्या असोत वा नसोत, त्या प्रेमाची गाथा कुठे लिहिली गेली असो वा नसो; मनाच्या कोपऱ्यात जपलेलं असं निस्सिम प्रेम हे नेहमी अमरच राहतं.


    सच्चा प्रेम

    “याद है, एक बार तुमने कहा था
    ‘ये पुराने प्रेम में रंगे काग़ज़ जल भी जाएँ तो क्या?
    कथाओं का अंत ही तो नई कहानियों का आरंभ होता है।’
    मगर मैं कैसे कहूँ तुमसे…
    कि सच्चे प्रेम की प्रकृति,
    फिनिक्स जैसी होती है
    जो अपनी ही राख से पुनः जीवित होता है।
    इनकी गाथाएँ न समय की मोहताज होती हैं, न लेखनी की।“

     

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026 ललित

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026 ललित

    2 Comments

    1. Rashmi सावरकरणेहमीप्रमा on April 23, 2026 7:18 am

      नेहमीप्रमाणेच छान लिहिलं आहेस 👌👌

      Reply
      • Pande revati on April 23, 2026 12:02 pm

        मनःपूर्वक धन्यवाद 😊

        Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    By दीपक तांबोळीApril 22, 2026

    पूर्वार्ध “मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फॉरेन टूर…

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026
    Most Popular

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.