Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!
    ललित

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेApril 1, 20261 Comment3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, मी मराठी, अभिजात मराठी, एकांतवासाची गरज, संसारातून जंगलात जाणे, मानसिक शांततेची गरज, मानसिक शांतीची गरज, जीवाला सुकून महत्त्वाचा, जीवाचे समाधान, आंतरिक समाधान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “कंटाळले बाई मी! असं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी जंगलात निघून जावं…” आम्ही लहान असताना आई वैतागून अनेकदा हे वाक्य म्हणायची. तेव्हा आम्हीही निरागसपणे म्हणायचो, “आई, आम्ही पण येतो गं तुझ्यासोबत!” प्रत्यक्षात आई कधीच सगळं सोडून जंगलात गेली नाही; पण तेव्हा मात्र मला नवल वाटायचं की, हिला सारखं जंगलात का जायचं असतं? तिथे असं काय असेल?

    पुढे काळ पुढे सरकला, आणि जेव्हा मी स्वतः ‘आई’ या भूमिकेत शिरले, तेव्हा मधे मधे मलाही जंगलात निघून जावसं वाटू लागलं. संसाराच्या जबाबदाऱ्या, रोजची धावपळ आणि अपेक्षांचं ओझं अंगावर पडलं की, आईकडून ऐकलेले ते शब्द मनात पुन्हा जिवंत व्हायचे. पण तरीही कित्येक वर्षं मला खरं ‘जंगल’ काय असतं, हे उमजलं नव्हतं.

    नंतर बऱ्याचदा ‘जंगल सफारी’ करण्याचा योग आला, पण त्या सफारींनी माझ्या कल्पनेतल्या जंगलाला पूर्णपणे छेद दिला. हातात सँडविचचे पाकीट आणि कोल्ड्रिंकची बाटली, जिप्सीमध्ये बसलेले काही ओळखीचे – काही अनोळखी चेहरे आणि गळ्यात दुर्बिणी अडकवून व्याकुळतेने वाघाला शोधणारी पर्यटकांची गर्दी… हे सगळं बघितल्यावर जाणवलं की, इथे तर शहरातली गर्दी फक्त आपली जागा बदलून आली आहे.

    हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!

    खूप उशिरा मला कळलं की, जंगलात जाणं म्हणजे केवळ झाडाझुडपांत हरवणं नव्हे, तर तो एक ‘एकांतवास’ आहे. आपल्या इच्छा-आकांक्षेच्या या गजबजलेल्या बाजारात जेव्हा मनाला थकवा जाणवू लागतो. अशा वेळी वाटतं, या भरलेल्या बाजारातून लांब, खूप लांब निघून जावं. जिथे काही मिळवण्याची ओढ नसेल की, कुठे पोहोचण्याची घाई! रस्ते असे असावेत की, जे कुठे पोहोचवत नाहीत, तरीही आपण त्यात हरवून जाण्यातच धन्यता मानावी…

    ना नात्यांची ओढ ना कुणाची सोबत…

    अशा शांत वेळी, निळ्या आभाळाच्या कोऱ्या कागदावर मनातील भावनांची शाई सांडावी आणि मनात येईल तसे शब्द उमटत राहावेत. त्या शब्दांना काही अर्थ नसला तरी चालेल, पण त्या प्रक्रियेत एक कमालीची शांतता असावी.

    हा जो ‘एकांत’ आहे, तो कायमचा संन्यास नाही. जेव्हा जगाच्या अपेक्षांचं ओझं मनावर जड होतं, तेव्हा या कोलाहलापासून दूर घेतलेली ही एक ‘पॉवर नॅप’ आहे. ही विश्रांती आपल्याला पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा देते. स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आणि पुन्हा एकदा आयुष्याला सामोरं जाण्यासाठी हा ‘सुकून’ शोधणं गरजेचं आहे!

    हेही वाचा – ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!


    सुकून

    हसरतों के इस बाजार में
    थका हुआ सा दिल ये मेरा
    अब तो थैले का बोझ भी उठाना नहीं चाहता।

    वह बस निकल जाना चाहता है
    इस भरे बाजार से कहीं दूर
    जहाँ कुछ पाने की चाह न हो
    मंजिल तक जाने वाली कोई राह ना हो।

    यूं ही गुम हो जाए रास्तों में
    कहीं पहुँचने की परवाह न हो।
    ना सूरज उगे न रात हो
    बस सांज की धीमी रोशनी में
    कहीं दूर से आने वाली बाँसुरी की आवाज हो।

    जहां सूरज आँख मूँदें हो
    खिलखिलाती ओस की बूँदें हो।
    ना भूख लगे ना प्यास लगे
    ना कोई भी एहसास जगे
    ना कोई हमराही हो।

    बस खाली बादलों की स्याही हो
    और लिखते रहे आसमान के पन्नों पर
    मनचाहे लफ्ज बिना मतलब के बेवजह
    और सुकून ही सुकून हो हर जगह।

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026 ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    1 Comment

    1. Suchita Joshi on April 8, 2026 12:44 am

      Apratim, sakhol bhawna ani jiwant bhasha shaili .marathi sahityachi godi bhavishyat jivant rahil asa aatmvishwas ahe.
      Very nice.

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    By प्रणाली वैद्यApril 10, 2026

    भाग – 20 “आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली.…

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.