Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!
    ललित

    अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीMay 15, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, कथाविश्व, अल्लड हर्षा, हर्षाचा बालिशपणा, हर्षाचे बिन्धास्त जगणं, सुगरण हर्षा, उत्साही हर्षा, लहान मुलांच्यात रमणारी हर्षा, हर्षाचे आनंदाने जगणं, जीवनाचा आनंद घेणारी हर्षा, हर्षाच्या जगण्यातला जिवंतपणा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मैत्रिणी गेल्या तसं हर्षाला हायसं वाटलं. त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती. ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती. तिला त्याबद्दल खूप काही सांगायचं होतं, पण मैत्रिणींना त्यात काडीचाही रस नव्हता. सध्या ती खूप पुस्तकं वाचत होती. त्याबद्दलही तिला बोलायचं होतं. पण मुलं, नवरा, सासू या विषयांतून बाहेर निघायला मैत्रिणींना आवडत नव्हतं.

    संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली. मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं. झोक्यावरुन उतरताना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत, हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली.

    तीन दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली. दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रान्सहून परतला.

    उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या. शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यात क्रिकेट खेळायची. हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरू होतं. भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले. तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असताना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची. ती बॅटिंग आणि बॉलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टीममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची. हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.

    “ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”

    तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली.

    “काकू, हा लेडीज गेम नाहिये. तुम्हांला बॅट तरी हातात धरते का?” एक मुलगा चेष्टेने म्हणाला, तशी हर्षा उसळून म्हणाली,

    “तुम्ही सगळे बॅटिंग करा. तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बॅटिंग करेन. चालेल?”

    पोरं आनंदाने तयार झाली.

    बऱ्याच वर्षांनी बॉल हातात घेतल्यामुळे सुरुवातीला तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते. पोरं ती मस्त चोपत होती. पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला. सातही पोरांना आऊट करून तिने बॅटिंग करायला सुरुवात केली. चार-पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग फटके लगवायला सुरुवात केली. एक चेंडू तर तिने पार एका दोन मजली इमारतीवरून भिरकावून दिला. पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.

    “काकू, त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बॉल बसला. त्या बॉल देतच नाहीयेत. तुम्ही जाऊन घेऊन या ना!”

    हर्षा विचारात पडली. रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती. तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास लहान मुलांमध्ये खेळण्यावरून तिला नाही नाही ते बोलणार, हे नक्की होतं.

    “जाऊ द्या मुलांनो. मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बॉल घेऊन या,” मुलं खूश झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले. मुलं नवीन बॉल आणायला गेली. हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर, थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली. तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं. तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली…

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी

    “अगं, तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला? आता तरी सुधर. तू काही लहान नाही. दोन मुलांची आई आहे तू…” अशी ताकीद देऊन गेली. ती गेल्यावर हर्षाला रडू आलं. एक प्रकारची विचित्र उदासीनता तिला वाटू लागली.

    संध्याकाळी प्रणव घरी आला तर, घरात सामसुम होती. केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते. हर्षा बेडरूममध्ये पुस्तक वाचत पडली होती. पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं. दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.

    “काय गं केतकी, आज घरात इतकी शांतता का बरं?” प्रणवने विचारलं.

    “त्या मागच्या कॉलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खूप बोलून गेल्या. म्हणून आई रडतेय…”

    “आईला बोलून गेल्या? पण का?”

    केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला. प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो बेडरूममध्ये गेला. त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास, रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.

    “काय गं, असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”

    “नाही. काही नाही असंच!”

    “सांगितलं मला केतकीने सगळं. मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”

    हर्षा रडायला लागली. रडतारडता म्हणाली, “सगळेच मला म्हणतात की, तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला? आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या. माझी आई, वहिनी, माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात. आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर, मी काय करू? मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं.”

    प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले.

    “वेडाबाई कुठली! असं रडतात का? या मोठ्या माणसांना खरंतर कसं जगावं, हे माहीतच नसतं. म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो, त्याला ती नावं ठेवत असतात!”

    हर्षाला गोंधळली. तिला काही कळलं नाही.

    “म्हणजे?” तिनं विचारलं

    “तू लहान मुलांकडे बघितलंस? ती बघ कशी नेहमी आनंदी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो. एखादं खेळणं, पान, फुलं, पक्षी, चित्र, चॉकलेट बघून ती हूरळून जातात. आपलं रडणं विसरून ती लगेच हसायला लागतात. जवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना?”

    “हो”

    “तू तशीच आहेस हर्षू. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी. आपल्या लग्नाला दहा वर्षं झालीत… पण मी एवढ्या वर्षांत मी तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती. माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस, पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या  जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो. तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला. पण नाही जमलं. कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही. चॉकलेट खाताना किंवा कुल्फी, आइस्क्रीम खाताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो. तिथलं निसर्गसौंदर्य पाहून तू हरखून गेलीस, पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे हर्षू आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मुल तसंच जिवंत राहू दे. अगदी तू म्हातारी होईपर्यंत! कारण सांगू… तू मला तशीच आवडतेस अल्लड, अवखळ! तुला पाहिलं की, माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्याकुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो.”

    प्रणव क्षणभर थांबला.

    “आणि मला सांग. तू कामं तर मोठ्या माणसांसारखीच करतेस ना? तू स्वयंपाक उत्कृष्ट करतेस. घर छान सांभाळतेस. मुलांवर चांगले संस्कार करतेस. कंपनीत नोकरी करत असताना तू कंपनीची बेस्ट एम्प्लॉयी होतीस. तू कशातच कमी नाहीस. मात्र तुझ्यात आणि इतरांत हा फरक आहे की, तू हे सगळं आनंदाने करतेस; कारण तुझ्यातलं ते लहान उत्साही मुल तुला सतत सक्रीय, आनंदी ठेवतंय. खरंसांगू हर्षू, प्रत्येक माणसाने तुझ्यासारखंच असायला हवं, पण मोठेपणाचा आव आणून माणसं जगतात आणि जीवनातल्या आनंदाला पारखी होतात.”

    त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली. मग ती अवघडली. आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरुन टोमणेच मारले होते, पण तिचा धीरगंभीर, अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता. तिला कसं रिॲक्ट व्हावं ते कळेना.

    तेवढ्यात बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळला. त्या वासाने हर्षा वेडावून गेली. या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं.

    “आई पाऊस पडतोय. आम्ही पावसात खेळायला जाऊ?” बाहेरून केतकीने विचारलं.

    “हो.जा…” तिला उत्तर देतादेता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं, “मी जाऊ?”

    प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

    “कुठे?”

    “पावसात भिजायला?”

    प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणतेय ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला…

    “काय झालं हसायला?” तिने निरागसपणे त्याला विचारलं.

    तो न बोलता हसतच राहिला.

    “अं? सांगा ना का हसताय?”

    “काही नाही. तू जा…”

    हर्षा पटकन बाहेर आली.

    “चला रे मुलांनो. आपण पावसात खेळू या.”

    प्रणव बाहेर आला. आपली बायको आणि मुलांना पावसात नाचताना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला. का आपल्याला इतकं प्रौढत्वं यावं की, या छोट्या छोट्या क्षणांचा आपल्याला आनंद घेता येऊ नये, याचं त्याला वैषम्य वाटू लागलं.

    “बाबा या ना पावसात खेळायला…”

    केतकी ओरडली. पण प्रणवचं संकोची, प्रौढ झालेलं मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं. तेवढ्यात हर्षा पुढे आली, प्रणवचा हात धरून तिने त्याला अंगणात खेचलं. त्याचे दोन्ही हात धरून ती त्याला नाचवायचा प्रयत्न करू लागली. तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं, पण ती जशी नाचत होती, तसा तो नाचण्याचा प्रयत्न करू लागला. मग कसा कुणास ठाऊक त्याला तसं भिजण्यात आणि नाचण्यात खूप आनंद वाटू लागला.

    हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

    पावसाची सर आली, तशी निघून गेली. पण त्या पंधरा-वीस मिनिटांत सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली. हर्षा मुलांना घेऊन आत गेली. तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला.

    “मुलांनो बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या…”

    मुलं बाथरुममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टॉवेल घेऊन आली. ओलेत्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खूप गोड दिसत होती.

    “हे घ्या. डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या…” त्याच्या हातात टॉवेल देत ती म्हणाली. त्याने टॉवेल घेताना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं.

    “खूप मजा आली आज हर्षू पावसात भिजून. असंच मला शिकवत रहा आयुष्याचा आनंद घ्यायला. शिकवशील ना?”

    प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला,

    “माझी गोड गोड बायको. मला तू खूप आवडतेस.”

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    ते दोघे…

    July 1, 2026 ललित

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026 ललित

    बाई जात, भारी देवा

    June 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ते दोघे…

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 1, 2026

    सकाळची वेळ… ती बेडरूममधून उठून बाहेर आली आणि म्हणाली, “अहो, दुधाची पिशवी आत आणता का?…

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बाई जात, भारी देवा

    June 30, 2026

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    July 1, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु 

    July 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जुलै 2026

    July 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 345
    • अवांतर 193
    • आरोग्य 125
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 473
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 229
    • मैत्रीण 23
    • ललित 750
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.