दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 मे 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 25 वैशाख शके 1948; तिथि : त्रयोदशी 08:31, चतुर्दशी 29:11; नक्षत्र : अश्विनी 20:15;
- योग : आयुष्मान 14:21; करण : विष्टि 18:55;
- सूर्य : मेष; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:04;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
शिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
श्रेष्ठ मराठी समीक्षक रा. श्री. जोग
टीम अवांतर
श्रेष्ठ मराठी समीक्षक रामचंद्र श्रीपाद म्हणजेच रा. श्री. जोग यांचा जन्म 15 मे 1903 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन ते बीए आणि एमए झाले. 1926-63 या काळात नाशिक येथील हं. प्रा. ठा. कॉलेज, सांगलीचे विलिंग्डन कॉलेज, तसेच पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज येथे संस्कृत आणि मराठी या विषयांचे प्राध्यापक होते.
‘निशिगंध’ या टोपण नावाने कवी म्हणून त्यांचा साहित्यक्षेत्रात प्रवेश झाला. ‘ज्योत्स्नागीत’ तसेच ‘निशागीत’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. सरल भावाविष्कार हे त्यातील कवितांचे वैशिष्ट्य. नंतर मात्र त्यांनी साहित्यशास्त्र आणि काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले.
अभिनव काव्यप्रकाश या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याने पुढे महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये याचा समावेश झाला. या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांमध्ये त्यांनी संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वांशी पाश्चात्त्य वाङ्मयविचारांची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याशिवाय, त्यांचे सौंदर्यशोध आणि आनंदबोध तसेच काव्यविभ्रम हे ग्रंथ देखील वाचकप्रिय ठरले.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वा. म. जोशी व्याख्यानमालेत त्यांनी केशवसुतोत्तर आधुनिक मराठी कवितेतील प्रवृत्ती परंपरांचा जो आढावा घेतला, तो अर्वाचीन मराठी काव्य (केशवसुत आणि नंतर) या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला आहे. संस्कृत काव्यवाङ्मय या ग्रंथांत संस्कृत काव्याचा, केशवसुत (काव्यदर्शन) या ग्रंथात केशवसुतांच्या कवितेचा सविस्तर अभ्यास मांडला. पुणे विद्यापीठाच्या केळकर व्याख्यानमालेत त्यांनी ज्ञानेश्वर ते शाहीर या कालखंडातील बदलत्या अभिरुचीचे जे समालोचन केले होते. ते पुढे मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन या ग्रंथात समाविष्ट झाले आहे. याशिवाय त्यांच्या साहित्यविषयक स्फुट लेखांचे चर्वणा, विचक्षणा तसेच दक्षिणा हे संग्रह प्रसिद्ध झाले.
ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाच्या 42व्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निवृत्त प्राध्यापकांच्या योजनेतही त्यांची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच मराठी साहित्य महामंडळ यांच्या कार्याशी अनेक नात्यांनी त्यांचा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध होता. तपशीलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी आणि समतोल समीक्षक म्हणून लौकिक असणाऱ्या जोग यांचे 21 फेब्रुवारी 1977 रोजी निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसाय करणे कधीकधी आव्हानात्मक असू शकते, मात्र तुमची कृती प्रत्येक परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकते. योजनांमधील छोटे बदल मोठा नफा मिळवून देऊ शकतील. कुटुंबाचा सल्ला एखाद्या संजीवनी प्रमाणे काम करेल. कामात दिरंगाई करणे मात्र हानिकारक ठरू शकते. जीवनशैली सुधारण्यासाठी मोठा खर्च कराल.
वृषभ – आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. कामाच्या ठिकाणी, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन वरिष्ठांना प्रभावित करेल, त्यामुळे पदोन्नतीबद्दलच्या चर्चेला अधिक जोर मिळेल. वाहन दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागेल. ज्याचा तुमच्या बजेटवर थोडा परिणाम होऊ शकतो.
मिथुन – प्रवासादरम्यान किंवा सहलींमधून मिळालेली माहिती भविष्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देऊ शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटल्याने व्यवसायाला चालना मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची घाई केल्यास नुकसान होऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नवीन नोकरीची संधी मोहक वाटू शकते, मात्र सध्याच्या पदावर राहणे अधिक फायदेशीर ठरेल.
कर्क – तुमचे रखडलेले प्रकल्प आई-वडिलांच्या आशीर्वादाने वेगाने पूर्ण होतील. जोडीदारासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचाराने उत्साह वाढू शकतो. एखाद्या दीर्घकालीन आरोग्य समस्येसाठी तपासणी करून घेण्याची गरज भासू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि तुमची प्रतिमा सुधारेल.
सिंह – खर्च नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, अन्यथा बजेट बिघडू शकते. तुमच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात, त्यामुळे स्वभावात बदल करणे आवश्यक ठरेल. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळेल, पण जुने वादग्रस्त मुद्दे उपस्थित करणे टाळा. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
कन्या – आव्हाने अधिक मोठी वाटू शकतात, मात्र डगमगू नका. संयमाने राहा. मित्र आणि जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. जोडीदाराला नवीन नोकरीची संधी मिळाल्यास घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. संततीसोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल. कुटुंबीयांशी सुसंवाद ठेवा, आनंदाचे वातावरण राहील.
तुळ- समाजसेवा आणि चांगल्या कामांमुळे समाजातील तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढू शकतो. मोठा दानधर्म कराल ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मनमोकळ्या संभाषणाने जोडीदारासोबतचा सुरू असलेला वाद मिटू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना महत्त्वाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील वैयक्तिक बाबी अनोळखी लोकांना सांगणे टाळा.
वृश्चिक – उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या अधिक जवळ येऊ शकते. भावांचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही लाभही मिळू शकतात.
हेही वाचा – शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…
धनु – आजचा दिवस पूर्वीपेक्षा अधिक चांगला आणि आरामदायी असेल. आपल्यातील उणिवा ओळखून पुढे वाटचाल केली, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकते, पण सत्य तुमच्याच बाजूने असेल. त्यामुळे फार ताण घेऊ नका. पण सावध रहा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
मकर – नोकरीच्या ठिकाणी आनंद आणि जबाबदाऱ्या यांचा मिलाफ अनुभवायला मिळेल. संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, अभिमान वाटेल असे काम करतील. कामाच्या ताणामुळे घरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने वडीलधाऱ्यांची नाराज ओढावून घ्याल. बँकिंग किंवा वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – अनेक आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. कठीण परिस्थितीतही शांत राहणे हे तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरेल. एखाद्या शुभ कौटुंबिक कार्यक्रमाची तयारी केल्याने सुखद वातावरण निर्माण होऊ शकते. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय यशाकडे घेऊन जाईल. संततीच्या भावना आणि चिंता समजून घेणे आवश्यक आहे.
मीन – तुमच्या कामगिरीबाबत वरिष्ठ खूप प्रभावित होतील. तुमच्या सूचनांनाही महत्त्व दिले जाईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आजूबाजूचा परिसरात आणि समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते, परंतु मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत काळजी घ्या. प्रेम आणि संवादाच्या माध्यमातून कौटुंबिक कटुता दूर कराल.


