Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य, योगनिद्रा अभ्यासातून निरामय आरोग्य, योगनिद्रेतून आरोग्य लाभ, योगनिद्रा अभ्यासाचे महत्त्व,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य, याबाबत जाणून घेणार आहोत. योगनिद्रा ही खरोखरच सोपी आणि सर्वांनाच सहज जमेल, अशी बहुगुणी प्रक्रिया आहे. यामुळेच योगाभ्यासात योगनिद्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

    योगनिद्रा म्हणजे काय?

    योगाभ्यास करत असताना विश्रांतीसाठी शवासन अल्प कालावधीसाठी घेतले जाते. जेव्हा शवासन दीर्घ कालावधीसाठी काही विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी घेतले जाते आणि यासाठी काही विशेष प्रक्रियांचा समावेश करण्यात येतो, तेव्हा या योगाच्या अभ्यासाला योगनिद्रा असे म्हणतात.

    हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    योगनिद्रा अभ्यासातील विशिष्ट टप्पे – संक्षिप्त कृती

    योगनिद्रेचा अभ्यास एका मागोमाग एक पुढील टप्पे घेऊन केला जातो.

    1. आरंभ : ओंकार – गुरुवंदना करणे.
    2. पूर्वस्थिती : शवासन घेणे.
    3. संकल्प : उद्देशानुसार संकल्प करणे.
    4. शिथिलीकरण : संथ श्वसन करून शरीरातील सर्व अवयव आणि स्नायू शिथिल करणे.
    5. नियोजित कृतींची अनुभूती : संकल्पपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या नियोजित कृती प्रत्यक्ष करत असल्याची जाणीव करून घेणे.
    6. शरीरजागृती : योगनिद्रा अभ्यास झाल्यावर शरीरातील अवयवांची सावकाश हालचाल करून शरीर जागृत करणे.

    योगनिद्रा अभ्यासाचे मानसिक आरोग्य लाभ

    योगनिद्रेतील शिथिलीकरणाच्या माध्यमातून साधकास शारीरिक तसेच मानसिक पातळीवर निश्चितच लाभ प्राप्त होतात. योगनिद्रा अभ्यासातून मिळणारे विविध मानसिक आरोग्य लाभ पुढील प्रमाणे आहेत –

    • मन शांत आणि स्थिर होते.
    • मानसिक ताणतणाव कमी होतात.
    • मनाला आवश्यक विश्रांती मिळते.
    • व्यसनमुक्तीसाठी योगनिद्रेचा खचितच लाभ होतो.
    • योगनिद्रा निद्रानाशावर उपयुक्त उपाय आहे.

    योगनिद्रा अभ्यास आवश्यकतेनुसार वेळोवेळी करणे नक्कीच हितावह आहे. योगनिद्रा अभ्यास ध्वनीमंजुषा लावून करावा. परंतु सरावाने स्वतःलाच सूचना देऊन योगनिद्रा करता येते.

    हेही वाचा – आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    योगाभ्यासातील योगनिद्रा अभ्यासाची कृती आणि फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासातून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:

    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    April 24, 2026 आरोग्य

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026 आरोग्य

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    By वैद्य विष्णू देविदास सावंतApril 24, 2026

    नमस्कार! आज आपल्या ‘वासंतिक ऋतुचर्या’ सीरिजचा सातवा आणि शेवटचा भाग. या संपूर्ण आठवड्यात आपण वसंत…

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 एप्रिल 2026

    April 25, 2026

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    April 24, 2026

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 278
    • अवांतर 183
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 395
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 199
    • मैत्रीण 18
    • ललित 578
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.