Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: रविंद्र परांजपे
लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774
मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. श्वसन अभ्यास दैनंदिन योगाभ्यासात श्वसन अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वास्तविक, दैनंदिन योगाभ्यास करताना ओंकार आणि गुरुवंदना झाल्यानंतर श्वसनमार्गशुद्धी केली जाते. यामुळे आपला योगाभ्यास सहज, सुकर आणि अधिक लाभदायक होतो. आता आपण श्वसन म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. श्वसन म्हणजे काय? सोप्या भाषेत श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजेच श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया होय. योगाच्या भाषेत या क्रियांना अनुक्रमे पूरक आणि रेचक असे म्हणतात. श्वसन क्रिया अगदी सहज आणि नैसर्गिक असून…
मागील लेखात आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील प्रार्थना दैनंदिन योगाभ्यासात पुढील प्रार्थनांचा समावेश केला जातो : प्रार्थना म्हणण्यापूर्वी शरीर-मनाची तयारी आवश्यक आहे. प्रार्थनेची पूर्वतयारी पद्मासन, अर्धपद्मासन अथवा सहजासनात बसावे. हातांची ज्ञानमुद्रा अथवा ध्यानमुद्रा करावी. डोळे अलगद मिटून पाठीचा कणा ताठ ठेवावा. संथ श्वसन करावे. आपण आता प्रार्थनेविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आरंभीची प्रार्थना योगाभ्यासातील आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो, हे आपण मागील लेखात पाहिले. त्रिवार ओंकार केल्यावर गुरुवंदना केली जाते. गुरुवंदना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः । गुरू साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे…
आरोग्य सदरातील विविध लेखांद्वारे आपण मनाचे आरोग्य आणि मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेतले. आपल्याला निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्य हवे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या मानसिकतेत आमूलाग्र बदल करायला हवेत, हे वास्तव देखील आपण जाणून घेतले. या लेखात तथा पुढील काही लेखांमधून आपण निरामय मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी विविध उपाययोजनांबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता, आपण निरामय आरोग्याच्या वाटचालीची सुरुवात निसर्गसुसंगत दिनचर्येबद्दल मागील लेखांमधून सविस्तर माहिती घेऊन अगोदरच केलेली आहे. आता आपण योगाभ्यासातून निरामय आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी सविस्तर माहिती घेऊयात. योगाचा अर्थ हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास योगाचा उद्देश अतिचंचल मनाला नियंत्रणाने एकाग्र करणे आणि…
आरोग्य सदरातील पहिल्या लेखात आपण निरामय आरोग्याची गरज या विषयावर थोडक्यात माहिती घेतली. या लेखात आपण स्वस्थ आरोग्य म्हणजे काय, हे उजळणी करून समजून घेणार आहोत आणि तद्नंतर आरोग्याच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत. स्वस्थ आरोग्य म्हणजे काय? आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांबरोबरच आता ‘स्वस्थ आरोग्य’ या वाढत्या गरजेची पडलेली भर अधोरेखित झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. आपले आरोग्य चांगलेच आहे, असे बर्याच जणांना वाटत असते. माझी कोणतीही शारीरिक तक्रार नाही, मला कसलाही आजार नाही, मला आत्तापर्यंत औषधाची गरज लागली नाही, अशी विधाने आपण नेहमीच ऐकत असतो… आणि यालाच बरेच जण आरोग्य समजतात. परंतु ही वस्तुस्थिती…
मागील दोन लेखांत आपण निरामय मानसिक आरोग्य आणि निरामय आरोग्यासाठी आहार-विहार या विषयांच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास या विषयातील समाविष्ट घटकांविषयी जाणून घेणार आहोत. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरामय ठेवायचे असेल तर योगाभ्यास हा एकमेव सर्वोत्कृष्ट प्रभावी मार्ग आहे. योग ही एक जीवनशैली असून त्यामध्ये शरीराबरोबर मनाचाही विचार केला आहे. योगाभ्यास करण्यासाठी मुख्यत्वेकरून खालील घटकांचा समावेश करता येईल. हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य 1. योगाभ्यासाचा परिचय योगाचा उद्देश आणि व्याप्ती, अष्टांग योग, व्यायाम आणि योगासने यातील फरक आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे. 2. योगाभ्यासाची पूर्वतयारी योगाभ्यास कोणी करावा? महिला आणि योगाभ्यास. योगाभ्यासाच्या…
मागील लेखात आपण निरामय मानसिक आरोग्य या विषयाच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय आरोग्यासाठी आहार-विहार या विषयाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत. निरामय आरोग्य कल्पवृक्ष आरोग्य संकल्प करून नियमित योगाभ्यास आणि योग्य आहार-विहार यातून शिस्तबद्ध संतुलित जीवनशैली, निरामय मानसिक आणि शारीरिक आरोग्य तसेच संकल्पसिद्धी अशी फलप्राप्ती. 1. आहार-विहार अभ्यास : पार्श्वभूमी आयुर्वेद आणि मानवी शरीर, पंचमहाभूते, शरीरातील त्रिदोष, सप्त धातू, सात ऊर्जाचक्रे, स्वस्थ आरोग्य, आरोग्य बिघडविण्याची कारणे आणि संतुलित जीवनशैली. हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य 2. सर्वसाधारण आहार मुद्दे शरीरातील पंचकोश, आहाराचे उद्देश, सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, आहारातील पाणी तेल मीठ, अनाहार/अपथ्याहार, विरुद्ध…
आरोग्य सदरातील सुरुवातीच्या काही लेखांमध्ये आपण मनाचे आरोग्य, मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता तसेच मानसिक ताणतणाव निवारणार्थ उपयुक्त उपाय या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे थोडक्यात समजून घेणार आहोत आणि तद्नंतर मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत. निरामय मानसिक आरोग्य म्हणजे मनाची निरोगी आरोग्यावस्था. निरामय मानसिक आरोग्याचे विविध पैलू निरामय मानसिक आरोग्य संकल्पनेशी संबंधित विविध संज्ञा मन आणि आयुर्वेद, पंचकोश, मनोमय कोश, मन आणि शरीर यांतील परस्पर संबंध. मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे, कारणे आणि दुष्परिणाम जसे शरीराचे आजार असतात, तसे मनाचे देखील आजार असतात. मनाचे आरोग्य कोणत्या कारणांमुळे बिघडते, मनाचे आरोग्य बिघडल्याचे…
मागील लेखांमधून आपण दिनचर्येतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ठराविक वेळेस करावयाच्या विविध बाबींबद्दल सविस्तररीत्या जाणून घेतले. या लेखात आपण दिनचर्येतील उर्वरित महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी जाणून घेणार आहोत. वैयक्तिक स्वच्छता स्वस्थ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता नितांत आवश्यक आहे. दिनचर्येत यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. या दृष्टीने खालील मुद्द्यांकडे आवर्जून लक्ष द्यावे. हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज चालणे, फिरायला जाणे चालणे हा उत्तम आरोग्यदायी विनाशुल्क व्यायाम आहे. सकाळी अथवा सायंकाळी सोयीनुसार चालावे. बाहेरची कामे सर्वांनीच दिवसातील काही वेळ बाहेरची कामे करण्यासाठी राखून ठेवावा. धार्मिक उपासना दिवसभरात धार्मिक उपासना करण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. यात सर्वसाधारणपणे देवपूजा, आरती, प्रार्थना, स्तोत्र, पोथी…
मागील लेखांमधून आपण रोज ठराविक वेळेस करावयाच्या दिनचर्येतील विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण दिनचर्येतील कामाचे नियोजन आणि पूर्तता या महत्त्वाच्या विषयासंबंधी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी, आपण कामाचे स्वरुपाबाबत माहिती घेऊयात. कामाचे स्वरुप व्यक्तीच्या कामाचे स्वरुप वयोमानानुसार वेगवेगळे असते. हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज कामाचे नियोजन व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार समर्पक नियोजन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सर्वसाधारणपणे कामाचे नियोजन खालील पद्धतीने करणे यथार्थ होईल. कामाचे नियोजन आणि पूर्ततेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे कामाचे नियोजन जर योग्य पद्धतीने केले तर कामाची पूर्तता देखील नक्कीच सुरळीत आणि व्यवस्थित होईल. हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी…
दररोज ठराविक वेळेस उठणे, शौच, आहार सेवन आणि झोपणे या दिनचर्येतील विविध क्रिया केल्यास मिळणारे आरोग्य लाभ याबाबत आपण मागील लेखांमधे सविस्तररीत्या जाणून घेतले. या लेखात आपण दिनचर्येतील नियमित योगाभ्यास या विषयासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. योगाभ्यासाविषयी थोडक्यात… भारतीय परंपरेत योगशास्त्र हे निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्यरक्षक तसेच आरोग्यसंवर्धक वरदान आहे. मनोकायिक व्याधी-विकारांचे नियंत्रण करून त्यातून मुक्ती मिळवणे आणि मनाची एकाग्रता तसेच शरीराची निरोगी अवस्था प्राप्त करणे, हा योगाभ्यासाचा उद्देश आहे. अष्टांगयोगातून योगाभ्यासाची विशाल व्याप्ती अधोरेखित होते. दैनंदिन योगाभ्यासात ओंकार गुरुवंदना, सूक्ष्म व्यायाम/ पूरक हालचाली, श्वसन तथा प्राणायाम अभ्यास आणि यथाशक्ती सूर्यनमस्कार आणि योगासने यांचा समावेश असावा. हेही…

