Author: प्रणाली मंगेश महाशब्दे

प्रणाली महाशब्दे

संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

काय म्हणता! कॅडबरीची जाहिरात पुन्हा समोर आली… अरे बापरे, या जाहिरातीने तर बाकीचे गोड पदार्थच मागे टाकले (कुछ मीठा हो जाए)… हो ना! पण काय करणार बाहेर पटकन उपलब्ध असणारे आणि परवडणारे तेच आहे… पण फक्त असे वाटते, यापेक्षा चांगले आणि सर्वच दृष्टीने परवडणारे अनेक पदार्थ आपल्याकडे आहेत. सगळीकडे एकादशीची तयारी, चातुर्मासाची तयारी सुरू झाली आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये वेगवेगळ्या सणांची धामधूम असते. त्यानिमित्त वेगवेगळे पदार्थ आपण करतो. खरंतर, असे म्हटले जाते की, ‘आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा’ यानुसार तर घरांमध्ये आता पदार्थांची रेलचेलच सुरू होते. हेही वाचा – लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी आषाढ म्हटले की, कापण्या, पुऱ्या,…

Read More

“तुज सगुण म्हणो की निर्गुण रे…” हे गाणे ऐकले आणि विचार सुरू झाले की, खरंच सगुण आणि निर्गुण म्हणजे काय? कोण महत्त्वाचे? त्यांची उपासना कशी करायची? एकदम लक्षात आले की, याचे उत्तर ‘श्रीमद्भगवद्गीता’मध्ये मिळेल. त्यानुसार चवथ्या अध्यायात ज्ञानयोगाबद्दल सांगितले म्हणजेच सुरूवात करून दिली, त्यानंतर पुढील अध्यायांमध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार उपासनेचे महत्त्व सांगून त्याचे फळ काय याबद्दल पण सांगितले. हे ऐकल्यावर मात्र दोन्हीमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? असा प्रश्न अर्जुनाला पडला. त्याचे उत्तर पण बाराव्या अध्यायात दिले. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, सोन्याचा पर्वत असो किंवा सोन्याचा तुकडा दोघांचाही कस सारखाच! म्हणजेच खंड हा प्रारंभ तर अखंड हा शेवट. अनेक…

Read More

‘श्रीमद्भगवद्गीता’ म्हणजे असे पुस्तक ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. असे म्हटले तर ते चुकीचे नाही. याचा विचार करताना सर्वप्रथम आपण कृष्ण-अर्जुन आहोत हे पक्के समजले पाहिजे. आपली अर्जुनासारखी अवस्था नेहमीच होते. म्हणजेच… ”सीदन्ति मन गात्राणि मुखं च परिशुष्यति| वेपथुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ||1.29|| मग काय शोधत बसतो, कोणी कृष्ण येईल का? मला मदत करेल का? असे कोणी आपल्याला भेटले तर, सर्वांत महत्वाचे असते ते संवाद साधला जाणे. समोरच्याचे ऐकणे. कसाही प्रश्न असला तरी, शांतपणे प्रश्नावर आपले मत देणे. त्याला त्याचे उत्तर शोधायला मदत करणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. एवढे होऊन सुद्धा कृष्णचे…

Read More

दोन मैत्रिणींमधला संवाद… पहिली – अगं फोटो बघितला का? आज किनाई माझ्या लेकाने मला पोळी करायला मदत केली. दुसरी – हो का? वा मस्तच की! पहिली – हो ना, अगं कणीक पण त्यानेच भिजवली आणि पोळी पण लाटली. दुसरी – अरे वा… चला छान सुरुवात झाली म्हणजे… 0000 काही दिवसांनी… दुसरी – काय गं काय चालले आहे? पहिली – स्वयंपाकाशिवाय काय करणार दुसरे? दिवसभर नुसते खायलाच करावे लागते. दुसरी – अगं पण मुलं करतात ना तुला मदत? पहिली – कशाचे काय? सुरुवातीला केली मदत, आता काही नाही! त्यादिवशी तर मुलाने सांगितले की, ‘आता मला पोळी करता येते, परत नाही करणार!’…

Read More

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् । श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किं प्रयोजनम्।। दान करणे हे हाताचे भूषण आहे. सत्य बोलणे हे कंठाचे भूषण आहे. शास्त्र ऐकणे हे कानाचे भूषण आहे. मग इतर अलंकारांची काय गरज आहे? खरंच दानाचे किती महत्त्व आहे! माणूस हा परोपकारी वृत्तीचा आहे. त्याला नेहमीच दुसऱ्याच्या कामी / उपयोगी येण्याची सवय असते. अगदी लहानपणापासूनच मुलांना आपल्या जवळील वस्तू वाटून घेण्याची सवय लावली जाते. कळत नकळत आपण अनेक गोष्टी दुसऱ्यांना देत असतो. त्यामध्ये काही वेळेस ती गोष्ट परत मिळावी, अशी इच्छा असते तर, काही वेळेस असे काही वाटत नाही. समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी…

Read More

नुकतेच माझ्या YouTube चॅनल वरून प्रा. डॉ. सुरेश मेणे लिखीत “मनाचे श्लोक – अध्यात्माची पाऊलवाट” या पुस्तकाचे 205 भागांचे क्रमश: वाचन पूर्ण केले. खरं सांगायचे तर, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करायचे, हे ठरवून, या आधीपण “एक तरी ओवी ज्ञानेशांची” या डॉ. वि. रा. करंदीकर आणि डॉ. हे. वि इनामदार यांच्या पुस्तकाचे पण क्रमश: वाचन केले. यामधून अनेक गोष्टी समजत गेल्या, उमजत गेल्या, काहींच्या बाबतीत नव्याने विचार करू लागले. असाच हा पण एक विचार… कोणीतरी म्हटले आहे की, “शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुसऱ्या कोणालाही मनाइतका मान नाही.” खरंतर, मन हे शरीर आणि इंद्रिये यांना नियंत्रित करते. मन चंचल आहे… मन…

Read More

“ए आई तुला माहीत आहे का, आज मी निशाच्या घरी गेले होते ना, तिथे तिची आई उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करत होती. उद्या तिची मोठी बहीण येणार आहे ना! कार्यक्रम आहे त्यांच्याकडे…” घरात येत असतानाच मेधा आईला सांगत होती. “अगं अधिक महिना आहे ना, म्हणून येणार असेल तिची ताई…” – आई. “हो ना! केवढी तयारी केली आहे त्यांनी. घर सजवले आहे, किती वस्तू आणल्या आहेत… किती खाऊ आणला आहे, बापरे! दिवाळी असल्यासारखेच वाटले मला…” – मेधा. “हौस असते ना गं! मग काय… म्हणतात ना हौसेला मोल नाही.” – आई. “अगं आई, पण एवढे सगळे द्यायचे असते का? म्हणजे आपण पण ताईला…

Read More

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण… संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगात त्यांनी किती छान विचार मांडले आहेत. मन हे असे कोडे आहे की, दिसत तर नाही, पण सगळे काही सामावून घेते, सगळे काही घडवून आणते. मन प्रसन्न असेल तर कामं इतक्या चांगल्या पद्धतीने होतात की आश्चर्य वाटावे! सकाळी जर छान गाणे ऐकले की, मन दिवसभर छान, प्रसन्न रहाते. समोर छानसे छोटेसे फूल जरी बिघतले तरी ते खूश होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारे, आनंद मानणारे हे मन कठीण परिस्थिती पण तेवढ्याच ताकदीने हाताळते. मन खंबीर असले की, कोणत्याच प्रकारे कोलमडून न जाता आपण उत्तर शोधू शकतो. तर असे…

Read More

अधिक महिना सुरू होण्यापूर्वीच कितीतरी दिवस आधीच त्याचे वेध लागले. सगळीकडे जावयाला काय काय देता येईल याबद्द्ल वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत… आणि अशातच मन थोडे विचारात रमले. मुलगी जन्माला येतेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. लक्ष्मी जन्माला आली असेच म्हटले जाते. (नारायण जन्माला आला असे नाही म्हणत.) तेवढ्याच लाडात तिला वाढवले जाते. वयात आल्यावर लग्न होते आणि या लक्ष्मीला नारायण मिळतो. लग्नाला येणारा प्रत्येकजण, मग तो कोणाच्याही बाजूचा असो, “किती छान लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे” असेच म्हणत असतो. सासरी तर तिचे गृहलक्ष्मी म्हणूनच स्वागत केले जाते. लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायणाचा प्रवास सुरू होतो. वेगवेगळे सण, कार्यक्रम, सोहळे दोघांचे एकमेकांच्या साथीने सुरू होतात. पहिल्या…

Read More

आज सकाळपासून नानांची गडबड सुरू होती. मुलगा, सुन यांना लेकींना फोन लावून द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे कधी बोलणे होते, यासाठी उगीचच घरात चकरा मारत होते. तसे तर नाना म्हणजे वय वर्षे 90 पार केलेले आणि आई 80 पार केलेल्या, पण उत्साहात सगळ्यांना मागे टाकणारे. छान भरलेला संसार दोन मुली आणि दोन मुले… सगळ्यांची लग्न झालेली. दोघी मुलींना एक मुलगी आणि एक मुलगा. त्यांची पण लग्न झालेली. मुलांच्या मुलांचे लग्न अजून व्हायचे होते. तर, असा हा नानांचा छान गोतावळा. बाकी बहीण-भाऊ तर नानांचे मस्तच आहेत. काही आहेत काही नाहीत… वयोमानाप्रमाणे दिसत नाही, ऐकू येत नाही. पण सगळे मस्त! तर असो. अशा…

Read More