Author: प्रणाली मंगेश महाशब्दे

प्रणाली महाशब्दे

संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

रांगोळी म्हटलं की, आजकाल मोठमोठ्या रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या डोळ्यांसमोर येतात. पायघड्यांसारख्या रांगोळ्या घातल्या जातात. त्याचबरोबर धान्याच्या, फुलांच्या रांगोळ्या पण मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. याच मोठ्या रांगोळ्यांचे छोटे स्वरूप सणावाराला घराच्या दारासमोर दिसते. पण खरंच रांगोळी आणि आपले खूप जवळचे नाते आहे, हे रांगोळी काढताना लक्षात येते. सकाळी उठले की, पहिले सडा-रांगोळी हे महत्त्वाचे काम. मला असे वाटते की, कालची रांगोळी आधी गोळा करायची (खराट्याने नाही बरं का. त्याचे फरशीवर ओरखडे उमटतात.) नंतर व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर सडा टाकायचा. त्यावर सुबक अशी रांगोळी काढायची. ती पण ठिपक्यांची. यामागे असे तर नसेल ना? कालचे सर्व “रात गयी बात गयी” याप्रमाणे विसरून…

Read More

पाठवणी हा शब्द जरी ऐकला तरी किती गोष्टी डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक स्त्रीवर्गाबरोबरच पुरुषवर्गाचा सुद्धा हळवा कोपरा असतो हा शब्द. बायकोच्या पाठवणीच्या वेळेस तिच्या माहेरच्यांना काय वाटले असेल, हे वडील म्हणून मुलीच्या पाठवणीच्या वेळेस जाणवते. एकूणच काय तर, नको असलेला पण हवाहवासा असा हा शब्द! एक छोटा जीव जन्माला येतो. घरातील सगळे जण त्या छोट्या जीवाचे कोडकौतुक करण्यात दंग होतात. हळूहळू हट्ट करून, रडून, कट्टी-बट्टी करून, दिवस-महिने-वर्ष उलटतात. सगळ्यांना एकमेकांची सवय लागलेली असते. अशा या 20-22 वर्षांच्या (आता 30 किंवा त्यापेक्षा जास्त पण) सहवासानंतर त्या छोट्या जीवाला म्हणजेच मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे. किती कठीण आहे ना हे! त्यानंतर ती मुलगी परत…

Read More