Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…
    ललित

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देJune 26, 2026Updated:June 26, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, श्रीकृष्ण अर्जुन, साशंक अर्जुन, संयमी श्रीकृष्ण, अर्जुनाला पडलेले प्रश्न, श्रीकृष्णाची उत्तरे, श्रीकृष्ण अर्जुन प्रश्नोत्तरे, श्रीकृष्णाचे अर्जुनाला समजावणे, माणसातील श्रीकृष्ण, माणसातील अर्जुन, आपल्यातील श्रीकृष्ण, आपल्यातील कृष्णाला जागे ठेवणे, आपल्यातील अर्जुनाला जागे ठेवणे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘श्रीमद्भगवद्गीता’ म्हणजे असे पुस्तक ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. असे म्हटले तर ते चुकीचे नाही. याचा विचार करताना सर्वप्रथम आपण कृष्ण-अर्जुन आहोत हे पक्के समजले पाहिजे. आपली अर्जुनासारखी अवस्था नेहमीच होते. म्हणजेच…

    ”सीदन्ति मन गात्राणि मुखं च परिशुष्यति|

    वेपथुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ||1.29||

    मग काय शोधत बसतो, कोणी कृष्ण येईल का? मला मदत करेल का? असे कोणी आपल्याला भेटले तर, सर्वांत महत्वाचे असते ते संवाद साधला जाणे. समोरच्याचे ऐकणे. कसाही प्रश्न असला तरी, शांतपणे प्रश्नावर आपले मत देणे. त्याला त्याचे उत्तर शोधायला मदत करणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. एवढे होऊन सुद्धा कृष्णचे पण नेहमी ”इति मे मत:” (हे असे मला वाटतं) किंवा ”यथेच्छसि तथा कुरू” हेच वाक्य आहे. म्हणजेच, ‘सांगायचे काम मी करतो बाकी तू ठरव.’

    हेही वाचा – मन माऊली सकळांची…

    पण हेच जर दुसऱ्या कोणाच्या बाबतीत झाले तर आपण सल्ला द्यायला लगेच पुढे येतो. म्हणजेच, आपल्यातील कृष्ण जागा होतो. याचाच अर्थ आपण कधीतरी कृष्ण कधीतरी अर्जुन असे होतो. सगळी कौशल्य आपल्यातच आहेत, पण आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडतो… आणि मग नकारात्मक भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी प्रश्नाच्या मुळापर्यंत जायची तयारी हवी. त्यातून बाहेर पडताना अनेक गोष्टी समोर येतील. त्याचबरोबर इतरही प्रश्नांची उत्तरे मिळतील.

    कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, विज्ञानयोग अशा अनेक पद्धतीने आपल्याला आपले उत्तर शोधता येते आणि शेवटपर्यंत हार न मानता त्याचा पाठपुरावा करत सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचता येते.

    हेही वाचा – सहावे इंद्रिय… मन

    श्रीकृष्ण अनेक वेळेस अर्जुनाच्या प्रश्नाला वैतागला असेल, पण अर्जुनाचे समाधान होत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण समजावतच होतेच ना। काहीवेळेस तर अर्जुन मुद्दाम वेळ काढण्यासाठी पण प्रश्न विचारत होता, ते काय श्रीकृष्णाला समजत नव्हते का? पण तरी दोघांमधील संवाद सुरूच राहिला… कारण एकमेकांवरील विश्वास! असाच विश्वास स्वत:वर असला तर…

    खरंच, आपल्यातील श्रीकृष्णाला केव्हा जागे करायचे? केव्हा अर्जुनासारखे स्वत:लाच प्रश्न विचारायचे हे समजायला हवे शेवटी!

    यत्र योगेश्वर: कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर:|

    तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||18.78||

    हे महत्त्वाचे. दोघेही आपल्यातच आहेत, फक्त “मी-तू पणाची केली बोळवण” याप्रमाणे दोघांमध्ये संवाद हवा. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाला समोर करायचे, कृष्णाला की अर्जुनाला? हे आपणच ठरवायचे. त्यासाठी आपल्यातील कृष्णाला आणि अर्जुनाला नेहमी जागे ठेवले पाहिजे.

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026 ललित

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026 ललित

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    By ॲड. कृष्णा पाटीलJune 26, 2026

    भाग – 2 घरात पहिल्यांदाच मोठं कार्य होतं. मुलगा शिकून नोकरीला लागला होता. कष्टाने संसार…

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    June 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे 

    June 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 340
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 467
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 737
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.