Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत
    ललित

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देMay 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, रुखवताचे महत्त्व, लग्नकार्यातील रुखवत, मुलीच्या कौशल्याचे रुखवत, रुखवतात मुलीचे कौशल्य, रुखवतातील वस्तूंचे महत्त्व, रुखवताची वैशिष्टपूर्ण मांडणी, शुभकार्यातील रुखवत, रुखवतातून कलेचे प्रदर्शन, रुखवतातून प्रीवेडिंगची मजा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “ए आई तुला माहीत आहे का, आज मी निशाच्या घरी गेले होते ना, तिथे तिची आई उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करत होती. उद्या तिची मोठी बहीण येणार आहे ना! कार्यक्रम आहे त्यांच्याकडे…” घरात येत असतानाच मेधा आईला सांगत होती.

    “अगं अधिक महिना आहे ना, म्हणून येणार असेल तिची ताई…” – आई.

    “हो ना! केवढी तयारी केली आहे त्यांनी. घर सजवले आहे, किती वस्तू आणल्या आहेत… किती खाऊ आणला आहे, बापरे! दिवाळी असल्यासारखेच वाटले मला…” – मेधा.

    “हौस असते ना गं! मग काय… म्हणतात ना हौसेला मोल नाही.” – आई.

    “अगं आई, पण एवढे सगळे द्यायचे असते का? म्हणजे आपण पण ताईला एवढे देणार आणि दादा-वहिनी जेव्हा वहिनीच्या माहेरी जातील, तेव्हा एवढे देतील का त्यांना?” – मेधा.

    “नाही गं, असे काही नसते. जो तो आपापल्या ऐपतीनुसार खर्च करतो.” इति आई.

    “आई काय गं, ताई येईल तेव्हा आपण पण असे घर सजवायचे का?”

    “घर सजवायला काय? ते तर आपण केव्हा पण सजवू शकतो! त्यामुळे आपल्यालाच छान वाटते. घर नीट असेल, सजवलेले असेल म्हणजे घरात रहाणाऱ्यांनाच समाधान वाटत असते. कोणी येणार म्हणून घर कशाला सजवायचे? कोणीही केव्हाही यावे घर कसे छानच असावे…”

    “हो गं, ते तर आहेच. आई तुला सांगू का… तिथे ना काकूंनी छान रुखवत पण मांडली आहे. आपण परवा त्या शेजारच्या रोहनदादाचा घरी गेलो होतो ना, त्याच्या बाळाच्या कार्यक्रमाला तेथे पण असेच होते ना रुखवत वगैरे. हे पण करायचे असते का गं आई. मग आपण कधी करायचं रुखवत?”

    हेही वाचा – हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    माय लेकींच्या गप्पा ऐकणारे आजी-आजोबा एकदम हसायला लागले. आजी म्हणाली, “मेधाताई रुखवत करायचं, पण ताईसाठी नाही बरं का, तो करायचा आमच्या मेधाताईंसाठी!”

    “म्हणजे गं काय आजी?” – मेधा.

    “अगं खरंतर, रुखवत असं कधीही करायचं नसतं. पहिल्यापासून ते लग्नातच केलं जायचं. मोठा ठेवा असतो गं रुखवत म्हणजे!” – आजी

    “आजी अगं, रुखवत म्हटलं मी… ठेवा कुठून आणला तू.”

    “अगं, रुखवत हा इतका गोड शब्द आहे ना की, त्यामध्ये खूप आठवणींचा ठेवा असतो,” – आजी

    “रुखवत करण्यात तुझी आजी तर एकदम एक्सपर्ट आहे. तुझ्या आजीला किती वस्तू करता येतात माहीत आहे का तुला? तुझ्या आजीला आवर्जून सांगायचे काही वस्तूंसाठी…”

    “बापरे, म्हणजे आजी तू किती पैसे कमवत असशील त्यातून?”

    ”मेधाताई, जरा शांत व्हा. तुम्हाला वाटतं तसं हे पैशाचं रुखवत नसतेच मुळी. रुखवत म्हणजे मुलगी लग्नापूर्वी अनेक नवनवीन गोष्टी शिकायची, त्या वस्तू त्या रुखवतामध्ये असायच्या… भरतकाम, विणकाम, चित्रकला, टाकाऊमधून टिकाऊ वस्तू ती तयार करायला शिकत असे ज्यामधून तिचे घर सजावट, वेगवेगळ्या रंगसंगती, घरातील वस्तूंचा वापर करून नवीन वस्तू तयार करण्याचे कौशल्य सर्वांसमोर येई जे तिला तिच्या पुढील आयुष्यात म्हणजेच संसारात खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून चटण्या, लोणची, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी, लाडू, चिवडा, फराळाचे इतर पदार्थ हे पण ती शिकत असल्यामुळे रुखवतात या वस्तू पण असत. जेणेकरून तिला या सर्व गोष्टींमुळे अनोळखी लोकांमध्ये पण आपलेपणा वाटेल. रुखवतामध्ये भांडी सुद्धा असतात, जेणेकरून आई-वडिलांचे प्रेम, माया तिच्यासोबत सासरच्या घरी जायची. यामध्ये काही जवळचे लोक आवर्जून काही गोष्टी या मुलीला मायेपोटी करून देत… काहींना आवर्जून काही गोष्टी करायला सांगितल्या जायच्या. यामध्ये ती जी सप्तपदी चालणार असते त्यांच्या अर्थाचे छान लेखन केलेले असायचे, तिने भरलेला चुडा, ती जे मंगळसूत्र, जोडवी, नथ यानंतर घालायला सुरुवात करणार असते, त्याच्या अर्थाचे पण छान चित्र काढून लेखन केलेले असते. या सर्व वस्तू तयार करताना ती मुलगी हळूहळू लग्नासाठी तयार होत असे. या सर्वांमधून वेगवेगळ्या गोष्टी त्यांचे अर्थ ती समजावून घेत असे. आत्ताच्या तुमच्या भाषेत सांगायचे तर ही प्री-वेडिंगची मजा अशा सगळ्या गोष्टींमधून ती मुलगी अनुभवायची.” – आजोबा.

    हेही वाचा – पसारा आवरेना आठवणींचा!

    “…आणि हे सर्व काही ती सगळ्यांच्या बरोबर अनुभवत असे. हसत-खेळत या गोष्टी बनवल्या जायच्या. त्यामुळे सासरी त्या वस्तू बघितल्यावर तिला त्या गोष्टी आठवून आनंद होतो.” – आई.

    “बरं का मेधाताई, या फराळाच्या पदार्थांमध्ये गंमत पण केली जाते म्हणजे करंजीमध्ये, लाडूमध्ये मीठ घातले जाते आणि तो लाडू सासरी गेल्यावर कोणाला खायला मिळेल त्याची मजा घेतली जात असे. यामुळे दोन्ही घरात खेळीमेळीचे वातावरण असे.” – आजी

    “म्हणजे, एक प्रकारचे हे प्रेझेंटेशनच की.” – मेधा.

    “हो पण सर्वांच्या सहभागातून तयार केलेले.” – आई.

    “असे हे रुखवत लग्नातील महत्त्वाचा भाग! यामधील फराळाचे पदार्थ खाऊनच नवरा मुलगा मिरवणुकीला जात असे. येथे खास करून फोटो काढले जात. ते रुखवत लावणे म्हणजे मुलीच्या माहेरच्या लोकांचे कौशल्य… कारण इतक्या प्रेमाने, काळजीपूर्वक केलेल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित दिसायला हव्यात, तसेच ते रुखवत उचलणे हे सासरच्या लोकांचे कौशल्य असते. ते व्यवस्थित काढून घरी घेऊन जाणे आणि नंतर त्या सर्वांना दिसतील अशा लावणे…” – आजी.

    “बापरे एवढा विचार तर केलाच नाही मी!” – मेधा.

    “आता काय, परवा बघितलेला मुलांच्या अन्नप्राशनाचा कार्यक्रम असो नाही तर, उद्याचा तुझ्या मैत्रिणीकडील अधिक महिन्याचा कार्यक्रम… कुठेही रुखवत मांडतात. तुम्हाला माहीत आहे का आई, आता तर हे रुखवत भाड्याने पण मिळते. मग काय, कार्यक्रम कोणताही असो हे मांडलेले असतेच… हौस बाकी काय!” – आई.

    “हौस जरी म्हटलं, भाड्याने जरी आणला तरी, तो मायेचा आठवणींचा ठेवा असलेल्या पूर्वीच्या रुखवताची सर याला थोडीच येणार? मेधा म्हणाली तसे, ते तर फक्त ‘प्रेझेंटेशन’! ते रूखवत थोडीच म्हणता येईल?” – आजी.

    “ए आजी, कसले भारी वाटत असेल ना त्या मुलीला, जेव्हा ती त्या वस्तू स्वत:च्या हाताने तयार करणार आणि सगळे जण आवर्जून ते बघणार त्याचे कौतुक करणार…“ – मेधा.

    “मग काय मेधा तुलापण आवडेल ना तुझे असे कौतुक झालेले. तर मग हळूहळू जरा आईला, आजीला कामात, स्वयंपाकात मदत करा. रुखवत काही एका दिवसात तयार होत नाही. स्वत: काहीतरी तयार करायचे तर, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील, लोक कौतुक काही उगीचच नाही करणार! लोक कौतुक तर भाड्याने आणलेल्या रुखवताचे पण करतील गं, पण आपण तयार केलेल्या गोष्टींचा आनंद निराळाच… आणि तो निखळ आनंद घेता आला पाहिजे.”

    “हो आजोबा तुम्हाला काय म्हणायचे समजले मला. चलो इस बातपर एक-एक कप चाय हो जाये. महत्त्वाचे म्हणजे हा चहा मी करते!” – मेधा.

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026 ललित

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026 ललित

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    By माधवी जोशी माहुलकरMay 29, 2026

    गरम चहाच्या घोटासोबत ताज्या बन-मस्का पावाचा आस्वाद देणारे आणि अनोळखी माणसांचे ओळखीत रुपांतर करणारे तसेच…

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 312
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 435
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 661
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Most Popular

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.