Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: प्राजक्ता काथे
वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.
मेष या आठवड्यात घरात शांतता राहील. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी अनावश्यक कटकटी वाढतील, अशा परिस्थितीत सांभाळून बोला. शक्यतो वादाची सुरुवात तुमच्या बोलण्यामुळे होणार नाही, याची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहार करतान सावध राहावे. विशेषत: स्पर्धक आणि हितशत्रूंपासून जपून रहा. महिलांनी शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक टाळावी. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येईल; छंदातून फायदा होऊ शकतो. वृषभ या आठवड्यात शुक्राच्या भ्रमणामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. इच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामे जलदगतीने पूर्ण कराल. घरासाठी देखील पुरेसा वेळ देता येईल. व्यावसायिक वर्गाने बेकायदेशीर काम टाळावे, अन्यथा…
मेष या आठवड्यात रवी मेष राशीमध्ये आला आहे. तो उच्चीचा असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येत उत्तम राहील. नोकरदारांचे ऑफिसमध्ये वर्चस्व राहील. तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि कामाचे श्रेय तुम्हालाच मिळेल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन प्रॉडक्ट बाजारात आणले जाऊ शकते. नवीन करार होतील. सरकारी कामे जलद गतीने पूर्ण होतील. महिलांच्या बाबतीत मनाप्रमाणे घरात कामे होतील. मदतनीसाकडून वेळेत मदत मिळेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परदेशी शिक्षणासाठी चांगला कालावधी आहे. वृषभ या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना सुट्टी मिळण्यात अडचणी येतील. काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यामध्ये अडकून पडाल. घरातील लग्नकार्याला ऐनवेळी उपस्थित राहू शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन योजना अमलात आणता येतील. नवीन व्यवहार उत्साहात सुरू कराल.…
मेष रागावर नियंत्रण ठेवा या आठवड्यात 15 तारखेला रवी मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष मंगळाची रास आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च झाल्याने नोकरदारांची चिडचिड होईल. पैसे कुणाला उसने देऊ नका. तथापि, नोकरीच्या ठिकाणी कामे पटापट होतील. व्यावसायिक वर्गाकडून मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते. परदेशप्रवास टाळावा; नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक विचारपूर्वक करावी. अक्षय तृतीयेला दानधर्म आणि पितृ तर्पण करावे. महिलांना मुलांच्या विषयीचे प्रश्न सतावतील. तसेच, उष्णतेचे आजार होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. वृषभ ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळावा या आठवड्याच्या सुरुवातीला लाभ स्थानात बरेच ग्रह आहेत. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.…
मेष या आठवड्यात सरकारी कामे विनासायास पूर्ण होतील. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण साधारण राहील. तथापि, आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पना उपयोगी पडतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्तार करू शकाल. महिलांना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल, त्याचबरोबर परिश्रमही हवेत. वृषभ या आठवड्यात मान-सन्मान मिळेल. नोकरदारांना पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठ खूश राहतील. कार्यालयातील सहकाऱ्यांना पार्टी द्याल. व्यावसायिक वर्गाला नफा होईल, व्यवसायात तेजी जाणवेल. महिला अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करू शकतील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळेल. मिथुन या आठवड्यात कलाकारांचा भाग्योदय होईल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. श्रेय मिळेल. काम चांगल्याप्रकारे…
मेष या आठवड्यात मनःशांती मिळेल. कामाच्या बाबतीत नोकरदारांची धावपळ होईल. जे काम ‘नंतर बघू’ म्हणून बाजूला ठेवलं आहे, तेच अर्जंट करून द्यावे लागू शकेल. व्यावसायिक वर्गाला दुसऱ्याकडे थकलेले पैसे परत मिळतील. व्यवसाय वाढविण्याची योजना आखाल. महिलांना घरासाठी शोभेच्या वस्तू किंवा नवीन रोप विकत घेता येतील. विद्यार्थ्यांना जीवाला जीव देणारा मित्र मिळेल. सुसंगत फायद्याची ठरेल. वृषभ या आठवड्यात मुलांशी वाद होतील. नोकरदारांना नवीन जॉबमध्ये रुळायला वेळ लागेल. कामाचा ताण नसेल, पण नवीन काम करताना वेगळीच हुरहूर लागेल. व्यावसायिक वर्गाला नवीन योजना राबवल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल; त्याची व्यवसायवाढीला मदत होईल. तथापि, कच्चा माल कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धावपळ होऊ शकते. घरात…
मेष या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. मौज-मजा आणि घर सजावटीवर खर्च करू शकाल. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत तुमचे भागीदार आणि कुटुंबाला तुमचे महत्त्व जाणवेल. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलेल. महिलांना घराच्या नूतनीकरणावर खर्च करावा लागेल. तथापि, भौतिक सुविधांवर विचारपूर्वक खर्च करा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कुसंगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. वृषभ या आठवड्यात नोकरीत बढती संभवते. ज्यांना जॉब बदलायचा आहे, अशांनी जरूर प्रयत्न करावेत. नोकरदारांकडे एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येईल आणि तुम्ही ती आत्मविश्वासाने पार पाडू शकाल. कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पनांचा योग्य वेळी वापर करता येईल आणि फायदा होईल. त्याचा परिणाम…
मेष या आठवड्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कोणते काम आधी करावे, असा प्रश्न पडू शकतो; वरिष्ठांची मदत घ्या. व्यावसायिक वर्गाने ठरलेले कार्यक्रम पुढे ढकलू नयेत. नवीन प्रकल्प मिळतील. तथापि, कायदेशीर बाबी नीट समजून घ्या. महिलांनी कामात चालढकल करू नये; चांगल्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावीत. स्वतःचे वाहन मित्र-मैत्रिणींना वापरायला देऊ नका. वृषभ या आठवड्यात बहीण-भावांसोबत मजा कराल. नोकरदारांना कामाची फारशी काळजी वाटणार नाही; सहकारी मदत करतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यावसायिक वर्गाला परदेशी व्यवसाय करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे; त्या दृष्टीने प्रयत्न करा. महिलांना प्रवासाचा आनंद मिळेल; त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचे असल्यास…
मेष या आठवड्यात सूर्याचे मकर राशीतील भ्रमण लाभदायक ठरणार आहे. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील; उत्साह वाढेल. नोकरदारांची सगळी कामे सुरळीत सुरू राहतील; आर्थिक ताण उरणार नाही. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवहार फायद्याचे ठरतील; नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांच्या नवीन ओळखी होतील; नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मतावर ठाम राहावे; त्याद्वारे तुमचा ठसा उमटेल. वृषभ या आठवड्यात प्रवासाचा योग आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तथापि, पैसे जपून वापरा. कुटुंबातील मतभेद दूर करू शकाल. व्यावसायिक वर्गाला खरेदी–विक्रीतून लाभ मिळेल. व्यावसायिक जोडीदाराचा सल्ला घ्या, स्वतःचे मत लादू नका. महिलांकडून घरातील कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडले जाईल. विद्यार्थ्यांना नवीन मित्र–मैत्रिणी मिळतील; तथापि, जुन्या मित्रांना…
मेष नवीन वर्षाची सुरुवात आनंदात होईल. नवीन संकल्प हाती घ्याल आणि वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदारांना प्रमोशन आणि पगारवाढ संभवते; बदली होण्याची शक्यताही आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने छान वातावरण आहे; नवीन ऑर्डर मिळतील. व्यावसायिक भागीदाराला महत्त्व द्या; त्यांचे विचार ऐका. जोडीदाराबरोबर महिला छान वेळ घालवतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये; अभ्यासाकडे लक्ष द्यावे. वृषभ या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला भांडवल कमी पडेल; त्यासाठी बँकेची मदत मिळेल. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. कुटुंबात मंगलकार्य घडेल आणि महिलांच्या माहेरची मंडळी एकत्र येतील. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल; वेळेचे नियोजन आवश्यक…
मेष या आठवड्यात आपली कामे स्वतःच पूर्ण करण्यावर भर द्या; इतरांवर अवलंबून राहू नका. नोकरदारांच्या दृष्टीने वातावरण चांगले राहील; सगळी कामे जबाबदारीने पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला स्थितिजन्य लाभ मिळण्याची शक्यता आहे; अनपेक्षित लाभही संभवतो. तरुण–तरुणींचे विवाह ठरण्यासाठी योग्य कालावधी आहे. महिलांना कामानिमित्त प्रवास घडेल; प्रवासात कार्यसिद्धी होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे. वृषभ या आठवड्यात शुभग्रहांमुळे अनुकूल वातावरण राहील. बुद्धिजीवी, कलाकार आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ संभवतो. नोकरदार जातक आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकतील. व्यावसायिक वर्गाने नवीन संधींचा उपयोग करून घ्यावा; नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील; परदेशी प्रवास संभवतो. महिलांना माहेरील मंडळींबरोबर छान प्रवास घडेल. विद्यार्थ्यांना नवीन पार्ट-टाइम…

