Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    July 19, 2026

    घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    July 19, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेJuly 19, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात शुक्र भ्रमण फायद्याचे ठरेल. वास्तुयोग आहे. नोकरदारांच्या बाबतीत नवीन घराची नोंदणी होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायाला होणारा विरोध मावळल्याने व्यावसायिक वर्गाला दिलासा मिळेल. नवीन करार करताना कागदपत्रे नीट वाचून मगच सही करा. गाडी चालवताना महिलांनी ट्रॅफिक नियम पाळावेत. विद्यार्थ्यांनी नवीन मैत्री करताना समोरच्या व्यक्तीला नीट पारखून घ्या. पटकन कुणावरही विश्वास ठेवू नका.

    वृषभ

    • या आठवड्यात ग्रहमान अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात यश मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी शिस्तीत नियोजन करणे आवश्यक आहे. इतरांवर विसंबून न राहता, कामात स्वतः लक्ष द्या. व्यावसायिक वर्गाच्या महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. भागीदारीऐवजी स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. महिलांना रेंगाळलेली कामे पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांना तसेच कलाकार आणि खेळाडूंच्या दृष्टीने प्रगतीचा काळ आहे.

    मिथुन

    • हा आठवडा आर्थिक व्यवहारात प्रगतीच्या वाटेवर राहील. नोकरदारांचा कामाचा उरक जबरदस्त असेल. मनासारखी कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकाल. व्यावसायिक वर्गासाठी गतिमान आठवडा असेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. राजकीय मध्यस्थीतून लाभ होण्याची शक्यता आहे. महिलांना घरात दुरुस्तीची कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांचा भावाशी वाद होण्याची शक्यता आहे.

    कर्क

    • ग्रहमान अनुकूल आहे. नोकरदारांची सरकारी कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या गटबाजी आणि राजकारणापासून लांब रहाणे इष्ट. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. व्यावसायिक वर्गाची मनाप्रमाणे वसुली होऊ शकते. तुमच्या उत्पादनाला खूप प्रसिद्धी मिळेल, त्यानुसार मागणीही वाढू शकते. महिलांनी व्हायरल आजारांबाबत काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी पाकीट सांभाळावे, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.

    सिंह

    • या आठवड्यात कायदेशीर बाबींची काळजी घ्या. नोकरदारांनी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्यावेत. आठवड्याच्या शेवटी अचानक लाभ होईल. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत कामगारांचे प्रश्न अनपेक्षितपणे समोर येतील. परिणामी, त्यावर समर्पक पर्याय शोधायला वेळ लागेल. महिलांनी खरेदीचा मोह टाळावा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या वादात मध्यस्थी करू नये.

    हेही वाचा – ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत

    कन्या

    • या आठवड्यात आनंददायक बातम्या मिळतील. नोकरदारांना कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील. मनाप्रमाणे कामे होतील. अधिकार आणि लाभ मिळू शकतात. व्यावसायिक वर्गाला प्रसिद्धी मिळेल. अनेक वेगवान घडामोडी घडतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल. देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, नक्की यश मिळेल.

    तुळ

    • या आठवड्यात रवी आणि गुरू कर्क राशीत आहेत. रवी कर्मस्थानात आहे. नोकरदारांना करिअरमध्ये चांगली प्रगती साधता येईल. नवीन जॉबच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळेल. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पना अंमलात आणता येतील. त्या आधारे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणू शकाल. महिलांना मैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांनी पॉकेट मनी जपून वापरा. मित्रांना पैसे उधार देऊ नका.

    वृश्चिक

    • भाग्यस्थानात रवी आणि गुरू चांगले फळ देतील. तथापि, नोकरदारांची एखादी वस्तू हरवण्याची शक्यता आहे. कामात हलगर्जीपणा करू नका. प्रोजेक्टचा डेटा आणि फाइल सांभाळून ठेवा. व्यावसायिक वर्गाला चांगल्या वसुलीचा फायदा होईल. प्रलंबित जुनी येणी देखील वसूल होतील. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा, नक्की यश मिळेल. महिलांच्या बाबतीत जुनी दुखणी परत उद्भवतील, काळजी घ्या आणि पथ्य पाळा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.

    धनु

    • या आठवड्यात फसवणूक होऊ नये, म्हणून सावध रहा. नोकरदारांच्या विवाहेच्छुक मुला-मुलींचे विवाह ठरतील. नोकरीत किंवा कामाच्या स्वरूपात बदल संभवतात. व्यावसायिक वर्गाला अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागेल. कामगार अचानक असहकाराची भूमिका घेण्याची शक्यता आहे. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्या. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी राहील. अन्य कारणाने घरात वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    मकर

    • या आठवड्याची सुरुवात भक्तिमय होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा ताण असेल, पण वेळेचे नियोजन आणि तत्परता याच्या आधारे तुम्ही सफल होऊ शकाल. वरिष्ठ खूश होतील. तथापि, हाताखालच्या स्टाफची नाराजी राहील. व्यावसायिक वर्गाला दानधर्म करता येईल. व्यवसायाच्या नवीन कल्पना मिळतील, त्याचा पाठपुरावा करा. महिलांना मैत्रिणींबरोबर देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. चांगल्या मित्रांची संगत ठेवा.

    कुंभ

    • या आठवड्यात तब्येतीची कुरबुर राहील. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा जास्त व्याप नसला तरी, हाताखालच्या कर्मचारीवर्गाने काम चुकीचे केल्याने त्रास होईल. त्या कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. जाहिरात चुकीच्या पद्धतीने दिल्याने व्यावसायिक वर्गाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात जास्त वेळ जाईल. महिलांची घरात चिडचिड होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांनी पाकीट सांभाळावे. मित्रांना पैसे उधार देऊ नका.

    हेही वाचा – मधुमेह नियंत्रणासाठी आहार मार्गदर्शन

    मीन

    • या आठवड्यात पावसाळी सहलीला जाण्याचा योग आहे. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. त्याचबरोबर कामाचा व्याप वाढेल. नवीन प्रोजेक्टसाठी उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. व्यावसायिक वर्गाला प्रॉडक्टसाठी प्रदर्शनाचा चांगला फायदा मिळू शकेल. त्यासाठी मेहनतही करावी लागेल. महिलांसाठी घरात आनंदाचे वातावरण असेल. काम कमी आणि बडबड जास्त, असे होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात यश मिळेल. सादरीकरण चांगले आणि प्रभावी होण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत

    July 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 19, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 28…

    ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत

    July 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जुलै 2026

    July 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    July 19, 2026

    घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    July 19, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026

    July 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लीलाकमळें खेळणें, पुष्पमाळा झेलणें

    July 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 364
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 496
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 238
    • मैत्रीण 24
    • ललित 788
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    July 19, 2026

    घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    July 19, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.