मेष
- या आठवड्यात अपेक्षित घटना घडतील. राशीस्वामी मंगळ 21 तारखेला वृषभ राशीत जात आहे. नोकरदारांच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. तथापि, कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेणे इष्ट. महिलांच्या बाबतीत कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सांभाळून बोला आणि वागा. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधील इंटरव्ह्यूमध्ये नोकरी लागण्याची शक्यता आहे. कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी प्रगतीचा काळ आहे.
वृषभ
- या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ मिळेल. असे असले तरी, नोकरदारांनी गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कामाचा ताण वाढेल, पण शांत राहून काम करत रहा. व्यावसायिक वर्गाची दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशाअभावी राहिलेली कामेही पूर्ण करू शकाल. व्यवसाय वाढून उत्पन्नात वाढ होईल. बुद्धीचातुर्य आणि संवादकौशल्याने महिलांना अडचणींवर मात करता येईल. विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकेल; सर्व बाजूंनी यश मिळेल.
मिथुन
- या आठवड्यात महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. राशीस्वामी बुध 23 तारखेला कर्क राशीत जात आहे. नोकरदारांची बरेच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात सुलभता जाणवेल. कुटुंबात आनंदी बातम्या मिळतील. व्यावसायिक वर्गाला घर किंवा कामासाठी जागा घेणे शक्य होईल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. नवीन करारावर सही करू शकाल. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना गुरूंचे सहकार्य मिळू शकेल. सर्व कामे बुद्धीचातुर्याने पूर्ण करू शकाल.
कर्क
- या आठवड्यात नवीन क्षेत्राची ओळख होईल. एखाद्याला उसने दिलेले पैसे नोकरदारांना परत मिळतील. अचानक येणाऱ्या समस्यांमधून व्यवहारकौशल्याने मार्ग काढू शकाल. व्यावसायिक वर्गाचा आत्मविश्वास वाढेल; काही धाडसी निर्णय घेऊ शकाल. आपल्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे राहाल. महिलांच्या दृष्टीने वैवाहिक सुखासाठी हा कालावधी उत्तम आहे. मात्र, आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.
सिंह
- या आठवड्यात मित्रमंडळींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कामावर खूश असतील. कामे उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. मित्रांच्या माध्यमातून नवीन ओळखी होऊन व्यावसायिक वर्गाला व्यवसायात मदत मिळू शकेल. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी महिलांना नवीन संधी मिळतील. कुटुंबातील मुलांसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना नवीन वाहन प्राप्तीचा योग आहे.
हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!
कन्या
- या आठवड्यात अडकलेली कामे गतिमान होतील. राशीस्वामी बुध 23 तारखेला कर्क राशीत प्रवेश करत आहे. नोकरदारांच्या बाबतीत कामात सुलभता असेल, आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून त्यांच्या प्रगतीच्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यावसायिक वर्गाची जमीन किंवा स्थायी संपत्तीबाबत अडकलेली कामे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. खर्च वाढेल, पण पुढे फायदा मिळेल. महिलांनी दुसऱ्यांच्या वादात किंवा भांडणात न पडलेले हिताचे ठरेल. पण आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहावे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.
तुळ
- या आठवड्यात उत्सव आणि ओळखीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील. नवीन संकल्पना फलद्रूप होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. परिस्थिती अनुकूल आहे, असे व्यावसायिक वर्गाला जाणवेल. प्रदर्शनातून चांगले लाभ होतील. नवीन कामे मिळतील. महिलांना भाग्य आपल्याबरोबर असल्याचा अनुभव येईल. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल; काहींना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
- या आठवड्यात मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. राशीस्वामी मंगळ वृषभेत सप्तम स्थानी येत आहे. नोकरदारांचे राहत्या घराचे प्रश्न मिटतील. घरातील दुरुस्तीची कामे पूर्ण करू शकाल. समाजातील उच्चभ्रू वर्तुळात संपर्क वाढेल. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. त्याचबरोबर कामे करताना ताण जाणवेल. पण इतरांना मदत करू शकाल. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. घरात खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु
- या आठवड्यात मुलांविषयीची काळजी कमी होईल. नोकरदारांना सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. थोरामोठ्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिक वर्गाचे कार्यक्षेत्र रुंदावल्यामुळे कामाचा ताण जाणवेल. दुसरीकडे, मुलांची काळजी राहणार नाही, त्यामुळे उत्साहात असाल. कामाच्या ठिकाणी महिलांच्या हाती महत्त्वाची सूत्रे येण्याची शक्यता आहे. करमणुकीवर खर्च कराल. विद्यार्थ्यांना मित्रांकडून सहकार्य मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील.
मकर
- या आठवड्याची सुरुवात उत्साहाने होईल. काही प्रश्नांमध्ये दिलासा मिळेल. नोकरदारांनी वादविवाद टाळावेत. आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबातील तरुण मुला-मुलींचे प्रश्न सुटतील. शुभवार्ता समजतील. व्यावसायिक वर्गाचे कायदेशीर प्रश्न असतील तर, ते मार्गी लागतील. वादग्रस्त येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. महिलांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत. याबाबतीत पूर्ण विचार करून शांतपणे निर्णय घ्यावेत, मध्यस्थी स्वीकारू नका. विद्यार्थ्यांचे करिअरविषयक प्रश्न सुटतील. पण आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ
- या आठवड्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी भाग्योदय आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात स्थिरता लाभेल, मानसन्मान मिळेल. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. पण कुटुंबात शांतता राहील, याकडे लक्ष द्या. शिवाय, वाहन खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांना तसेच कलाकार आणि खेळाडूंना नवीन संधी मिळतील, सुविधा मिळतील.
हेही वाचा – आबा आणि मित्रमंडळींची पार्टी
मीन
- या आठवड्यात नोकरीमध्ये भाग्यसंकेत मिळतील. नोकरदारांच्या अधिकारकक्षा रुंदावतील. पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशी जाण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाचे हितशत्रू डोके वर काढतील. म्हणूनच स्पर्धकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. महिलांनी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे. लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरा; पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे.


