Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेJune 14, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदारांच्या दृष्टीने सध्याच्या नोकरीत अनुकूल वातावरण असेल. वरिष्ठ खूश राहतील. पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने कोणताही निर्णय घेताना घाई करू नये. भागीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. भागीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे होईल. घरातील विवाहयोग्य मुला-मुलींचे लग्न जुळण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांसाठी हा आठवडा गडबडीचा असेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होतील.

    वृषभ

    • या आठवड्यात शुभ ग्रह साथ देतील. नोकरदारांनी गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहावे. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या दबावामुळे आक्रमक होऊ नका. शांतपणे काम करत राहा. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून उत्पन्न वाढेल. जी कामे पैशाअभावी थांबली होती, ती पूर्ण होतील. प्रतिस्पर्धी गटात शांतता राहील. महिलांनी मैत्रिणींशी वादविवाद करू नये. खासकरून, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

    मिथुन

    • या आठवड्यात विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरदारांच्या बाबतीत नवीन सकारात्मक बदल घडेल. कामे पूर्ण करू शकाल. कामाचे श्रेय मिळेल. कामाच्या ठिकाणी राजकारण होऊन त्याचा लाभ मिळेल. व्यावसायिक वर्गाला अनुकूल काळ आहे. जागा घेण्याचे बऱ्याच दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन करार करू शकाल. महिलांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरात जास्त पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना गुरू आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही बुद्धीचातुर्याने कामे पूर्ण कराल.

    कर्क

    • या आठवड्यात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वासाच्या जोरावर नोकरदार कामातील आव्हाने सहज स्वीकारतील. व्यवहार कौशल्यामुळे नवीन कामे मिळतील. कंपनीला फायदा करून द्याल. व्यावसायिक वर्ग स्पर्धकांवर मात करू शकतील. तथापि, लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. महिलांच्या बाबतीत कुटुंबात लहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण आवडीची कामेही करता येतील. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.

    सिंह

    • या आठवड्यात मित्रमंडळी आणि हितचिंतकांकडून लाभ मिळू शकेल. नोकरदारांच्या कामात अनपेक्षित बदल संभवतात. ज्येष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी राहील. तुम्ही आत्मविश्वासाने सगळी कामे पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला मित्रमंडळींकडून नवीन कामे मिळतील. मित्रांच्या मध्यस्थीने अडकलेली कामे मार्गी लागतील. महिलांना कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक असाल तर चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना नवीन वाहन मिळण्याचा योग आहे.

    हेही वाचा – मंजिरी

    कन्या

    • या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ मिळेल. नोकरदारांची कामे जास्त त्रास न घेता सहजतेने पूर्ण होताना दिसतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील मुला-मुलींची लग्न ठरतील. व्यावसायिक वर्गाचा खर्च अचानक वाढेल. कामाचा दबाव वाढेल. जास्त काम करावे लागेल. महिलांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळावी. अभ्यासात दुर्लक्ष करू नये.

    तुळ

    • या आठवड्यात उत्सव, प्रदर्शन यामधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रयत्नांची जोड देऊन अवघड कामे पूर्ण करू शकाल. भाग्य तुमच्या सोबत असल्याचा अनुभव येईल. व्यावसायिक वर्गाला प्रदर्शनात सहभागी होऊन जास्त फायदा होईल. नवीन ओळखी होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महिलांच्या बाबतीत वडिलोपार्जित संपत्तीची व्यावहारिक कामे गतिमान होऊन पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

    वृश्चिक

    • या आठवड्यात मुलांबाबत असलेल्या चिंता दूर होतील. नोकरदारांवर वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. व्यावसायिक वर्ग वडिलांच्या किंवा मोठ्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करू शकतील. कामात वर्चस्व राहील. नवीन ओळखी होतील. कार्यक्षेत्र रुंदावल्यामुळे महिलांना जास्त काम करावे लागेल. विद्यार्थ्यांची प्रगती बघून घरात आनंदी वातावरण राहील.

    धनु

    • या आठवड्यात वडिलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. नोकरदारांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. इतरांना मदत करू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मात्र, नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. इतरांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका. महिलांना संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.

    हेही वाचा – जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    मकर

    • या आठवड्यात कायदेशीर प्रश्नातून सुटका होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, परंतु कामाला गती मिळेल. मित्रमंडळीत वाद घालू नका. कुटुंबातील मुलांचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाची वादग्रस्त येणी वसूल होतील. कायदेशीर मदत मिळेल. उत्साही वातावरण राहील. महिलांनी कोणाच्याही कामात मध्यस्थी करू नये, मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

    कुंभ

    • या आठवड्यात राहत्या घराचा प्रश्न सुटेल. नवीन नोकरी शोधणाऱ्या नोकरदारांना पूर्वी दिलेल्या मुलाखतीचे सकारात्मक उत्तर मिळेल. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात स्थिरता लाभेल. मान-सन्मान मिळेल. पण दुसरीकडे दगदग वाढेल, कामाचा ताण वाढेल. महिलांना सुख-सुविधा मिळतील. कुटुंब किंवा मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना नवीन वाहन खरेदीचा योग आहे. मात्र, संबंधित कागदपत्रे तपासून बघा.

    मीन

    • या आठवड्यात भाग्य संकेत मिळतील. नोकरदारांना आतापर्यंत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सकारात्मक बदल घडतील. अधिकाराच्या कक्षा रुंदावतील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत स्पर्धक बलवान होतील. हितशत्रूंच्या कारवाया सुरू होतील, सावध रहा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महिलांनी प्रलोभनांपासून दूर राहावे, फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 14 जून2026

    June 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 14 जून2026

    By Team AvaantarJune 14, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 जून 2026; वार : रविवार भारतीय सौर : 24…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026

    June 14, 2026

    Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं

    June 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 14 जून2026

    June 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 328
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 454
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 703
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.