Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेAugust 2, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात सरकारी कामांना वेग येईल. कामाच्या ठिकाणी नोकरदारांचे वादविवाद होऊ शकतात. त्यामुळ वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या आणि वाद टाळा. व्यावसायिक वर्गाला सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावे लागतील. तथापि, त्यानंतर पुढील सर्व गोष्टी सोप्या होतील. महिलांना नवीन संधी मिळतील आणि आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी खर्च वाढेल. अशा परिस्थितीत पूर्वी केलेले आर्थिक नियोजन उपयोगी पडेल.

    वृषभ

    • या आठवड्यात अनेक समस्या सुटतील. नोकरदारांना नशिबाची चांगली साथ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती साधता येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली मालमत्तेसंबंधीची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून आर्थिक प्रगती होईल. कल्पक दृष्टीकोन आणि योग्य संधींचा फायदा मिळेल. महिलांचे वडिलोपार्जित संपत्तीचे वाद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल.

    मिथुन

    • या आठवड्यात बँकेची कामे पूर्ण होतील. नोकरदारांना अतिरिक्त कामे करावी लागू शकतात. अशा वेळी शिस्तबद्ध पद्धतीने काम करा. राजकारण आणि गटबाजीपासून दूर रहा. व्यावसायिक वर्गाला ओळखी किंवा मध्यस्थीमुळे अडकलेली कामे पूर्ण करता येतील. कामानिमित्त दूरचे प्रवास होतील. कुटुंबातील तरुण मुला-मुलींचे विवाह ठरू शकतात, त्यामुळे महिलांच्या बाबतीत उत्साहाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना छोटी-मोठी कामे करून पॉकेटमनी कमावण्याची संधी मिळेल.

    कर्क

    • या आठवड्यात वादविवाद टाळा. नोकरदारांच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाल. व्यावसायिक वर्गाची प्रगती होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल आणि तो लाभदायक ठरेल. महिलांना जवळच्या व्यक्तींसोबत लांबचा प्रवास करण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे आणि दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    सिंह

    • या आठवड्यात मान-सन्मानाचे योग आहेत. नोकरदारांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. सहकुटुंब धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग आहे. व्यावसायिक वर्ग आत्मविश्वास आणि ऊर्जेने कामात झोकून देईल. भागीदाराची चांगली साथ मिळेल. व्यापारातील उलाढाल वाढून नफा होईल. महिलांना भिशी लागण्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

    हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    कन्या

    • या आठवड्यात अनपेक्षित घटना घडतील. नोकरदारांची धावपळ वाढेल आणि नियोजनात बदल करावा लागू शकतो. हितशत्रूंपासून सावध राहा. व्यावसायिक वर्गाला पूर्वी केलेल्या करारांचा आणि कामांचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी जाहिरातींना भुलू नये तसेच कोणाच्याही गोड बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांना अडचणी येतील; मात्र कष्टाच्या जोरावर त्यावर मात करता येईल.

    तुळ

    • या आठवड्यात व्यावसायिक पत वाढेल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. तथापि, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकता; मात्र यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत व्यवसाय थोडा मंद राहील, परंतु दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. अपेक्षित गोष्टी घडतील आणि जीवनात पुढे जाण्याच्या संधी मिळतील. महिलांच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ असून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक

    • या आठवड्यात संमिश्र स्वरूपाची फळे मिळतील. नोकरदारांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नयेत. गरज भासल्यास विश्वासू आणि जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. अचानक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढेल आणि प्रवासाचे योग आहेत. महिलांच्या बाबतीत कुटुंबात वादविवाद वाढू शकतात. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अद्ययावत राहणे आवश्यक आहे.

    धनु

    • या आठवड्यात शिस्त पाळा. नोकरदारांना ग्रहांची नैसर्गिक साथ कमी मिळेल. कामाच्या बाबतीत तत्पर राहणे आवश्यक आहे. इतरांवर अवलंबून राहू नका आणि कामात चालढकल करू नका. व्यावसायिक वर्गाला नियोजनात बदल करावा लागू शकतो. विविध अडचणींच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल; मात्र बदलत्या सहकार्याच्या धोरणाचा फायदा घेता येईल. महिलांनी कुटुंबात शांतता टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    मकर

    • या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. कामात घाईगडबड करू नका. मित्रमंडळींच्या वर्तुळात जपून वागा. पावसाळी सहलीचा योग आहे. व्यावसायिक वर्गाची आर्थिक उन्नती होईल. दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळतील. मात्र, कर्ज घेऊ नका तसेच उधार पैसे देणे-घेणे टाळा. महिलांना तडजोड करावी लागू शकते, हट्टीपणा सोडून द्या. विद्यार्थ्यांनी मित्रांना पैसे किंवा वस्तू उसने देणे टाळावे.

    कुंभ

    • या आठवड्यात अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. नोकरदारांना कामाच्या बाबतीत अचानक अडचणी उद्भवू शकतात. वरिष्ठांचा रोष पत्करावा लागू शकतो. व्यावसायिक वर्गाला व्यवसायासाठी अतिरिक्त आर्थिक मदत घ्यावी लागू शकते. बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर अडचणींवर मात करता येईल. गोंधळून जाऊ नका. पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. महिलांचा अनपेक्षित खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि कुसंगत टाळावी.

    हेही वाचा – स्कूटी, बायको आणि मी…

    मीन

    • या आठवड्यात शुभ फळे मिळतील. नोकरदारांनी कायदेशीर बाबींसंदर्भात सावध रहावे. सरकारी कामांमध्ये अचानक अडचणी येऊ शकतात. कामाच्या बाबतीत प्रामाणिक रहा. व्यावसायिक वर्गाने राजकारण टाळावे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. व्यवसायाची जाहिरात केल्यास फायदा होईल. महिलांना घरासंबंधी नवीन वस्तू खरेदी करता येतील. विद्यार्थ्यांना नवीन वाहन मिळण्याचा योग आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 2, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 11…

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.