मेष
- या आठवड्यात ओळखी किंवा मध्यस्थीच्या माध्यमातून लाभ होतील. नोकरदारांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे तसेच ऑफिसमधील महत्त्वाच्या फाइली सांभाळून ठेवाव्यात. त्या गहाळ होण्याची किंवा विसरण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाची उधारी वसूल होईल. परदेशी व्यापार वाढवू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मध्यस्थीचा उपयोग होईल. महिलांनी वेंधळेपणा करू नये. विशेषत:, प्रवासात काळजी घ्या. नातेवाईकांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. त्यांनी उत्सव आणि प्रदर्शनांना भेट द्यावी.
वृषभ
- या आठवड्यात आर्थिक जोखीम टाळा. शेअर मार्केटमध्ये पैसे लावू नका. नोकरदारांनी स्वतःची कामे स्वतः करावीत. कोणावरही विसंबून राहू नये. तसेच, प्रलोभनांपासून दूर रहावे. व्यावसायिक वर्गाने अति आत्मविश्वास बाळगू नये. पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा. नवीन कामे स्वीकारताना आपल्या क्षमतेचा विचार करावा. महिलांना जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक फायदा मिळेल. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. परदेशात जाण्यासाठी योग्य काळ आहे.
मिथुन
- या आठवड्यात सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य स्थिती राहील. तथापि, कामाच्या बाबतीत अपडेटेड रहा. वरिष्ठ आणि कंपनीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गातील जातकाला प्रवास करावा लागेल. प्रवासात नवीन ओळखीतून फायदा संभवतो. त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल. महिलांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
कर्क
- या आठवड्यात लांबचे प्रवास ठरवाल. घरातील तरुण मुला-मुलींचे प्रश्न सुटतील. नोकरदारांचे प्रमोशन आणि पगारवाढीची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन नियोजन करू शकाल. नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. महिलांना घरात नवीन खरेदी करता येईल. घरातील मदतनीसांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी कुठलेही काम अपूर्ण ठेवू नये. तसेच, सकारात्मक रहावे.
सिंह
- या आठवड्यात तरुणांना स्पर्धात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी तुमच्या कार्यकक्षा ओळखून काम करावे. छोट्या-मोठ्या प्रलोभनांपासून दूर रहा. अति आत्मविश्वास टाळा. दुसऱ्या कुणाचे काम स्वतःच्या जबाबदारीवर करू नका. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत काही कडू-गोड घटना घडतील. अशा परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. घाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. महिलांनी प्रामाणिकपणे काम करत राहावे; कामात सातत्य ठेवा, नक्की यश मिळेल. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
हेही वाचा – सारं काही रंगभूमीसाठी!
कन्या
- हा आठवडा खूप गतिमान असेल. नोकरदारांनी कुणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद असेल. कार्यालयीन कामाच्या बाबतीत सामान्य काळ असला तरी, सकारात्मक रहा, लाभ होईल. व्यवसायाला चांगली चालना मिळेल आणि व्यावसायिक वर्गाला फायदा होईल. छंदातून नवीन जोडधंदा सुरू करू शकाल. महिलांना मैत्रिणी आणि कुटुंबातील लोकांकडून सहकार्य मिळेल. त्यांचे छोटे प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल, परिणामी स्पर्धेत आणि मुलाखतीत यश मिळेल.
तुळ
- या आठवड्यात मानसन्मान मिळेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामात सुलभता असेल. मात्र, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा; फसवणूक होण्याची शक्यता आहे. परिवारातील मुलांच्या नोकरीचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाने हितशत्रू आणि स्पर्धकांकडे लक्ष देऊन त्यांच्या कारवाया वेळेत थांबवाव्यात. नवीन उसनेवारी देऊ नका. महिलांना शेअर मार्केटमध्ये लाभ संभवतो. त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी स्वतःचे वाहन इतरांना वापरायला देऊ नये. तसेच महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.
वृश्चिक
- या आठवड्यात अडचणी आणि समस्यांवर मात कराल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. वरिष्ठ खूश राहतील. मोठी गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील आणि व्यापारातही वाढ होईल. नियोजनात बदल केल्याने व्यापारात फायदा होईल. घरातील तरुण मुला-मुलींचे लग्न ठरतील, त्यामुळे महिलांचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक रहावे, उज्ज्वल भविष्यासाठी ते चांगले आहे.
धनु
- या आठवड्यात सकारात्मक विचार करा, आशावादी रहा. नोकरदारांना कामे सहजपणे पूर्ण करता येतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, त्यामुळे ते मनाप्रमाणे खर्च करू शकतील. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. अव्याहतपणे कामे करावी लागतील, न कंटाळता कामे पूर्ण करा. अडचणींवर मात करू शकाल. त्यांनी जाहिरातींना भुलू नये. समाजासाठी आणि कुटुंबासाठी महिला प्रेरणास्रोत बनून राहतील, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विद्यार्थी मित्रांना मदत करू शकतील. त्यांची स्वप्ने साकार होण्याची शक्यता आहे.
मकर
- या आठवड्यात मंगलकार्य ठरतील. कलाकार आणि खेळाडूंच्या दृष्टीने अनुकूल कालावधी आहे. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. नवीन नोकरी शोधणाऱ्या जातकांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाने वसुली करताना कायदेशीर मार्गच वापरा. अन्यथा, वसुली वादग्रस्त होईल. तसेच, कर्ज घेऊ नका. महिलांच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटकन प्रतिक्रिया देऊ नका, वाद टाळा. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
- निराश होऊ नका, सकारात्मक रहा. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य परिस्थिती राहील. कामाचा ताण जास्त नसेल. कामे वेगाने पूर्ण करू शकाल. नवीन ओळखी आणि मध्यस्थीतून व्यावसायिक वर्गाला नवीन करार करता येतील. भागीदाराबद्दल गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. कामात आणि पैशांच्या बाबतीत पारदर्शकता ठेवा. महिलांनी घरात काम करताना काळजी घ्यावी. विशेषत:, तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना बहीण-भावाबरोबर वेळ घालवता येईल, त्यामुळे आनंदी राहाल.
हेही वाचा – वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
मीन
- या आठवड्यात नवीन संधी मिळतील. नोकरदारांना नवीन प्रोजेक्टची जबाबदारी सोपविली जाईल. कामात सुलभता असेल. नवीन जॉबच्या शोधात असाल तर, त्याच्या संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यापारात महत्त्वाचे बदल घडू शकतात. स्पर्धकांवर मात करून पुढे जाऊ शकाल. प्रतिस्पर्ध्यांकडून मैत्रीचा हात पुढे केला जाईल. तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाल. कुटुंबात मंगलकार्य ठरेल आणि महिलांवर नियोजनाची जबाबदारी पडेल. ती तुम्ही उत्साहाने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वाहन खरेदीचा योग आहे.


