Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्त्री… एक आई आणि मुलगी
    मैत्रीण

    स्त्री… एक आई आणि मुलगी

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरNovember 14, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, आई, आई मुलगी, स्त्री रूपे, माता कन्या, आईची शिकवण, आईचे संस्कार,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिवाळी, दसरा, होळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या सणावारांना हमखास आईची आठवण येते. कोणालाच ऐकू न येणारी ही अज्ञात स्पंदनं हृदयात कुठेतरी जाणीव करून देत असतात… कधीच न विझणारी तिच्या विचारांची ज्योत मनात असते अन् ती जीवनातील अनेक चढ-उताराच्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करत असते… जणू तुम्हाला सांगत असते की, “घाबरू नकोस! तू एकटी नाहीस… कारण माझा अंश तुझ्यात आहे! मी तुझ्यामध्येच आहे!”

    आई प्रत्येक क्षणाला आठवते… विशेषतः सणावारांच्या दिवसांत तर जास्तच! जीवनात रंग भरायला तीच शिकवते! तिने दिलेली एकूण एक शिकवण लहानपणापासून मनात अधोरेखित होते… रूचकर स्वयंपाक कसा करायचा? कोणता पदार्थ कुठल्या सणाला करायचा? घरातील सर्वांच्या आवडी-निवडी कशा लक्षात ठेवायच्या? कुळाचारांचे पूजाविधी कसे करायचे? कोणती पूजा केव्हा करायची? का करायची? व्रत-वैकल्यांचे महत्त्व कसे जपायचे? या बरोबरच, रोज देवाजवळ सांजवात व्हायला हवी, तुळशीला रोज पाणी घालून तिचीही पूजा करून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावावा, त्याचेही महत्त्व आईने पटवून दिल्यामुळे ते कायम मनावर प्रतिबिंबीत झालेले दिसते.

    या सर्व गोष्टींची आता इतकी सवय झाली आहे की, हातावरच्या रेषांवर सुद्धा तिनेच दिलेली शिकवण कोरल्यासारखी भासते. सणवार आले की, असं वाटतं प्रत्येक घरातील आईच तिथे आपले अनोखे अस्तित्व घेऊन अवतरली आहे! तिच्या रूचकर पदार्थांचा सुगंध घराघरातील स्वयंपाकगृहातून दरवळतो… तिच्या परंपरेच्या दिव्यातील ज्योत प्रकाशमय होत मंदपणे तेवत असते आणि तिचा देवाला आळवताना लागलेला धीरगंभीर, परंतु भावविभोर सूर ती नसतानाही आरत्यांमधून जाणवतो… तो सूर मनाला इतका भिडतो की, मुलीसुद्धा आरती म्हणताना तितक्याच आनंदाने आणि भावपूर्णतेने देवाकडे सर्वांच्या सकुशलतेची प्रार्थना करते.

    हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी

    मुली जेव्हा आपले स्वतःचे घर सजवतात, तेव्हा त्या सजावटींमध्ये, त्या वस्तूंच्या नीटनेटकेपणामध्ये आपल्या आईच्या असंख्य आठवणी, इच्छा पाहात असतात आणि तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्या आपल्या घरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात… तिच्या कुटुंबातील प्रत्येक विधीकार्य, हरेक रीतिरीवाज हा आईच्या उपस्थितीचा किंवा तिच्या अस्तित्वाचा पुनर्जन्म असतो, जो तिच्या मुलींच्या कर्तृत्वातून सिद्ध होतो. हे गृहकर्तव्य नित्यनेमाने निभावत असताना मुलगी नेहमी हाच विचार करत असते की, आपली आई हे काम असं करत होती, अमुक तमुक सणाला असा स्वयंपाक करत होती, कुळाचाराचे तिचे पदार्थ ठरलेले होते… रोजच्या गृहोपयोगी वस्तू नेमक्या जागी ठेवण्याची तिची सवय, सगळ्यांचे आरोग्य जपण्याकरिता तिची चाललेली धडपड, तिच्या रोजच्या कामाचे नियोजन… हे सर्व मुली संस्मरणात ठेवतात आणि त्यांच्याही नकळत त्या स्वतः आपल्या मनातील भावसुलभतेने, कर्माने, आशीर्वादाने आपल्या आईच्या भूमिकेत कधी शिरतात, हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही. त्या मग मामी,  आत्या, काकू, नणंद, वहिनी, सासू अशा अनेक प्रकारच्या नात्यांमधून आपले स्त्रित्वाच्या नात्यांची सुंदर वीण विणतात आणि आपल्या कुटुंबाच्या हिताकरिता तसेच, प्रथा, परंपरा, संस्कृती जपण्याकरिता सिद्ध होतात. कधी कधी ओवाळणीच्या ताटातील किंवा देव्हऱ्यातील दिव्याच्या वातीकडे पाहून मनातल्या मनात आईला आठवून म्हणतात, “आई बघ, तू जे संस्कार मला दिलेस… जे रीतीरिवाज, परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर केलेस ते जसेच्या तसे पूर्णत्वाकडे नेण्याचा मी प्रयत्न करते आहे. संध्याकाळी देवाजवळ समईतील वाती उजळताना, तुळशीजवळ रोज दिवा लावावा, रामरक्षा म्हणावी हे मी माझ्या मुलांना शिकवले आहे…

    हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…

    देवाजवळ सांजवात लावण्याआधी मनपण शांत करा, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा किंवा कंटाळा, असंख्य विचारांचा कोलाहल मनात ठेवून ते करू नका… कारण कुठलीही कृती करताना त्या कामाप्रति आपले संपूर्ण समर्पण असायला हवे! मन शांत असेल तरच ते काम पूर्णत्वास जाते, त्याचे परिणाम निश्चितच फलदायी आणि आनंददायी असतात.” हा भाव मनामध्ये ठेवून जेव्हा त्या मुली आपल्या आईला आठवतात, तेव्हा देव्हाऱ्यातील समईची किंवा पूजेच्या थाळीतील त्या निरांजनाची ज्योत त्या मुलींना शांत आणि स्थिर दिसते… त्या ज्योतीकडे पाहून आईने तिचा हात आपल्या मस्तकावर ठेवून आशीर्वाद दिल्याची भावना त्या मुलींच्या मनात जागृत होते अन् आपसूकच आईच्या अस्तित्वाची जाणीव ती पुन्हा पुन्हा अनुभवते… आपल्या मनाशीच म्हणते की, आई कुठेच गेली नाही किंवा जात नाही, ती तिच्या मुलींच्या मनामध्ये आपल्या संस्कारासह, तिच्या प्रेमासह, कुटुंबवत्सल भावनेने कायम राहात असते आणि आपल्या आईपणाच्या तसेच स्त्रित्वाच्या अनेक रुपांची, तिच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना सतत करून देत असते…

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026 मैत्रीण

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026 मैत्रीण

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    मेहनत करने वालों की…

    By हर्षा गुप्तेJune 22, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आजचा विषय प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचा… आपली…

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.