Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: हेमा पाटील
मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.
भाग – 5 ओटीभरणासाठी पारूबाईंना सुनेच्या माहेराहून पदार्थांचे दहा- बारा करंडे हवे होते… सकाळी उठल्यापासून घरात तारांबळ उडाली होती. उमाच्या तिन्ही नणंदा आदल्या दिवशीच आल्या होत्या. तिच्या नवऱ्याच्या दोन्ही आत्या आणि त्यांच्या सुना-लेकी, सासूच्या दोघी सख्ख्या बहिणी, चार चुलत बहिणी, सासूची आई एकेक करून डेरेदाखल झाल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती स्वयंपाकघरातच होती. येणाऱ्या पाहुण्यांचे हवे- नको पाहात होती. संध्याकाळी उमाची काकी आणि भाऊ डोहाळे जेवण घेऊन आले. उमाच्या मनात धास्ती होती, आता आत्याबाई काय तमाशा करतात याची! काकी स्वयंपाकघरात आली, उमाला तिने जवळ घेऊन विचारले, “कशी हायस बाळा. तब्येत बरी हाय ना? काय त्रास व्हत नाय ना?” उमाने तिच्या मिठीत शिरत…
उमाला झोप लागत नव्हती… ती आठवणीत रमली होती… “कसलं कालवण केलंया? त्यात आढं दिसतंया वरचं. शेंगदाणं संपलेती का समदं घरातलं? शेंगदाण्याचं कुट का घातलं न्हाई?” “घातलंय की, आत्या कुट. जास्त घातले की, कालवणाची मूळ चव बिघडते, त्यामुळे तेवढे घातलेय.” “आत्ता गं बया! कालची नांदायला आलेली तू… तू मला शिकीवनार काय चांगलं आन् काय वंगाळ?” हे ऐकून उमाने मान खाली घातली. तेव्हापासून ती कालवणात अगदी घट्ट गोळा होईपर्यंत कुट घालत असे. तिला दिवस गेले आणि हळूहळू चित्र पालटायला लागले. तिला काय खावंसं वाटतंय, हे सासू इतर कुणामार्फत विचारू लागली. तिच्यासाठी वेगळे काही पदार्थ करू लागली. तिला उलट्या होतात म्हणून फोडण्या स्वतः…
भाग – 3 बाळाच्या बारशाच्या दिवशी आणखी दीड महिन्याने बाळाला घरात ठेवून आपल्याला नोकरीवर रुजू व्हावे लागेल, यामुळे उमा भावनावश झाली होती… बाहेर जेवायला बसल्याने बायकांचा कलकलाट पूर्ण थांबला होता, कारण आता हाताची आणि तोंडाची लढाई सुरू होती. तेवढ्यात पारूबाई ताट वाढून आत घेऊन आली. तिच्या पुढ्यात ताट ठेवत म्हणाली, “जिऊन घे. जेवणाची येळ चुकली तर पोराचं पोट दुखंल.” उमाच्या मांडीवरून तिने बाळाला उचलले आणि ती त्याच्याशी बोबड्या बोलीत बोलू लागली. उमाने ताट पुढ्यात घेतले आणि जेवायला सुरुवात केली. बाळ अंगावर पित असल्याने तिलाही भूक लागली होती. तिचे जेवण झाल्यावर सासूने बाळाला तिच्याकडे दिले, मग ती जेवायला बाहेर गेली. सासूचे…
भाग – 2 बारशासाठी सगळ्या कदम भावकीला आमंत्रण होते. भावकीतल्या आलेल्या बायकांच्या ताटात एकेक पेढा आणि घुगऱ्या घालायचे चालले होते. अजून उमाची ओटी भरणे सुरू होते. नातू झाला म्हणून पारूबाई खूपच आनंदात होती. आपल्या एकुलत्या एका लेकाला मुलगा झाला, घराण्याचा वंशवेल वाढला; त्यामुळे तिने अगदी जोरदार बारसे केले होते. लाडूचे गावजेवण घातले होते. बारशाला येणाऱ्या बायका बाळासाठी झबलं, टोपडं आणि तिच्यासाठी ओटी आणत होत्या. पाव्हण्या बायका एखादा डाग आणत होत्या. पारू बाईची नजर बहिरी ससाण्यासारखी तीव्र होती. दूर असूनही सुनेच्या ओटीत कुणी काय घातले, याकडे तिचे बरोबर लक्ष होते. पुरूष माणसांची बाहेरच्या मांडवात पंगत बसली होती. पुरुषांच्या दोन पंक्ती उठल्याशिवाय…

