Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. अस्मिता हवालदार
डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.
लेखक ह. मो. मराठे यांची ओळख म्हणजे, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक… त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’ यासारख्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. अनेक नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘बालकाण्ड’मध्ये लेखकाने स्वतःची कहाणी सांगितली आहे. पुस्तक वाचताना मनाला वेदना होतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुळतुळीत गोटा, शेंडी असलेल्या चेहऱ्यावर हरवलेले भाव असलेल्या लहान मुलाचे चित्र आहे. कोकणस्थी भाषेचा प्रयोग या पुस्तकात आहे. ही भाषा बोली भाषा आहे, मराठीची एक बोली भाषा… फारशी माहीत नसलेली! लेखक हनु (हनुमंत) सात-आठ वर्षांचा असतानाचा काळ यात आहे. या वयाच्या मुलाच्या नजरेतून कहाणी सांगितली आहे. त्याला इतक्या लहान वयात द्वेष, मत्सर, राग, करुणा या भावना असू शकत नाहीत किंवा त्याच्यावर…
‘लिटिल वुमेन’ या कादंबरीवर सिनेमा आहे आणि हिंदीत ‘कच्ची धूप’ नावाची मालिकाही होती. या कादंबरीचे भाषांतर प्रसिद्ध कवियत्री शांता शेळके यांनी समर्पक शब्दांत केलं आहे. लेखिका लुइसा मे अल्कॉट हिचे हे आत्मवृत्त नसले तरी, एकीच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन लिहिलेले कथानक आहे. चार बहिणी आणि त्यांची आई यांच्यावर असलेले कथानक, अमेरिकेत महायुद्धाच्या वेळी घडते. वडील युद्धावर गेले आहेत आणि आई मिसेस मार्च, या चार मुलींना वाढवते. ती जगभरातली आईसारखीच असते. मुलांना संस्कार देते, संगोपन करते, मुलींना मूल्य शिकवते. ही कादंबरी किशोर वयात वाचायला हवी. मी शाळेत असताना वाचली होती आणि तेव्हा अतिशय आवडली होती. परीकथेसारख्या या कथेत प्रत्येक मुलीने स्वतचे प्रतिबिंब…
गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकांठचा धोंडी’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 1955 साली प्रसिद्ध झाली आणि 2022मध्ये चौदावी आवृत्ती आली, यावरून तिची लोकप्रियता लक्षात येते. वाचकांच्या हृदयाला स्पर्शून गेलेली ही कादंबरी आहे. मुखपृष्ठावर मुंडासे बांधलेल्या, पिळदार मिशा अन् करारी चेहरा असलेल्या पुरुषाचा चेहरा आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याचे वय आणि अनुभव दोन्ही सांगत आहेत. हिरव्या रंगातल्या मुखपृष्ठावर बैलही दाखवला आहे. बैल, ती व्यक्ती आणि हिरवा निसर्ग यातून चित्रकार कथानक सांगायला सुरुवात करतो आहे, असे वाटते. पुस्तक वाचून झाल्यावर खात्री पटते, धोंडी असाच दिसत असावा. मलपृष्ठावर धोंडी हवालदार या तुंगी गडाच्या रक्षकाच्या वंशजाची ही कहाणी आहे, असे लिहिले आहे. ‘दोन पिढ्यांतला संघर्ष’ हे…
वाचनाची आवड असलेल्याने भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ वाचली नाही, याची शक्यता कमीच! वाचली नसेल तरी ऐकलं तरी असेलच!! मराठी कादंबरी म्हटली की, या कादंबरीचा संदर्भ येतोच. या कादंबरीची अनेकदा समीक्षा झाली आहे. अनेकांनी मत व्यक्त केले आहे… इतकी की, त्यावरच एक पुस्तक होऊ शकेल! असेल सुद्धा… मराठी वाचकांच्या मनावर अजूनही या कादंबरीचे गारूड आहे. पु.लं.नी म्हटलं होत की, ‘या कादंबरीने साहित्यिकांना खडबडून जागं केलं.’ मीही ही कादंबरी वाचली, कारण घरात इतरांना वाचताना पाहिलं आणि चर्चा करताना ऐकलं म्हणून. आठवी, नववीत असताना वाचली असेन. त्यावेळी मला ती अपूर्ण वाटली होती. बाबांना मी म्हटलं होतं की, यात शेवट काही होतच नाही, अर्धवट…
‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘नातीगोती’ यासारखी नाटके, ‘चक्र’ सारखी कादंबरी आणि चित्रपट , ‘ठणठणपाळ’ सारखे खुशखुशीत सदर आणि बरंच काही लेखन प्रसिद्ध असलेल्या जयवंत दळवींचे 1964 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक ‘सारे प्रवासी घडीचे’! आपू नावाच्या मुलाची ही कथा आहे. लेखकाने इतकं जिवंत वर्णन केले आहे की, हे काल्पनिक आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कोकणातले एक गाव आपल्या कल्पनाशक्तीने त्यांनी आपल्यासमोर उभे केले आहे. त्यात मोजता न येण्याइतकी पात्रे बारीकसारीक तपशीलांसकट आली आहेत. लेखकाच्या खुमासदार शैलीमुळे वाचताना गालातल्या गालात हसू, ते पुढची अक्षर दिसू नयेत इतकं डोळ्यांत पाणी येईपर्यंतचे हसू… येते. सगळा विनोद निर्मळ, निरागस आहे. जसे हसू तसे काही वेळा…
‘तू तर माझ्याही पुढे गेलीस’ या नावाचा ‘स्मृतिचित्रे’मधला एक धडा शाळेत असताना होता. गंमत म्हणून एकमेकांना चिडवताना धड्याचं नाव वापरत होतो, त्यामुळे लक्षात राहिलं… ना. वा. टिळकांची एक कविता सुद्धा होती – ‘बोला हवे ते, मला काय त्याचे? पुरे जाणतो मीच माझे बळ…’ या ओळी मला फारच आवडल्या होत्या. कवितेचा अर्थ नीट कळला नव्हता, पण असे बाणेदार उत्तर कोणाला देता यायला हवे, असं त्यावेळी शाळेत असताना बोलणी खायच्या वयात वाटलं होतं. ‘स्मृतीचित्रे’ पुस्तक वाचलं ते या कारणांसाठी! पुन्हा वाचायला घेतलं तेव्हा सतत माझ्याशी, या काळातल्या माझ्या आसपासच्या स्त्रियांशी लक्ष्मीबाईंची नकळत तुलना व्हायला लागली आणि अपार कृतज्ञता दाटून आली. त्या काळातल्या…
‘शाळा’ ही मिलिंद बोकील यांची गाजलेली कादंबरी. त्यावर सिनेमाही आला आहे आणि नाटकही! आणीबाणीच्या काळात म्हणजे 1977 साली कथानक घडते. कादंबरी ‘शाळेत गेलेल्या प्रत्येकाला अर्पण’ केलेली आहे. शहराजवळच्या अविकसित गावात, अगदीच खेडे नाही अशा ठिकाणी असलेल्या शाळेची, शाळेतल्या मुलांची गोष्ट आहे. होम स्कूलिंग किंवा डी-स्कूलिंग करणाऱ्या मुलांना हे अनुभव कसे मिळत असतील? असा प्रश्न मला कायम पडतो. लेखकाला तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांची होणारी मानसिक घुसमट दाखवायची आहे. या कादंबरीत वर्गातली मुलं, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, सिनेमाच्या नावाच्या भेंड्या, क्रीडामहोत्सव, स्नेहसंमेलन, परीक्षा, निबंध, वहीला खाकी कव्हर, शाळेचा कॅम्प, टोपणनावे, प्रार्थना इत्यादी संदर्भ येतात… त्यावेळी भूतकाळात रमायला होते. आपल्या शाळेची, शाळेतल्या दिवसांची आठवण होते.…
भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशींवर श्री. जा. जोशींनी लिहिलेली ‘आनंदी गोपाळ’ कादंबरी खूप लोकप्रिय झाली. या आधीही त्यांच्याबद्दल काशीबाई कानिटकरांनी लिहिले होते. कादंबरी रंजकतेने लिहिली असल्यामुळे खूप भावली. मध्यंतरी त्यावर सिनेमाही आला, तोही गाजला. आनंदीबाईंवरची कादंबरी वाचल्यावर त्यांच्याबद्दल कुतूहल वाटलं होतं. ‘डॉ. आनंदीबाई जोशी, एका ध्यासाचा प्रवास’ हे चरित्रात्मक अनुवादित पुस्तक अलीकडे वाचले. डॉ. नंदिनी पटवर्धन यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. श्रुती फाटक यांनी केला आहे. हे पुस्तक वाचताना जाणवत राहिले की, ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीचा पगडा मनावर आहे, मनात सर्व पात्रांच्या प्रतिमा तयार आहेत… पण चरित्र आणि कादंबरी यात असलेला मुलभूत फरक लक्षात घ्यायला हवा.…
आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी वयानुसार बदलत असते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी पुस्तकं आवडत असतात. बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी मी पंधरा – सोळा वर्षाची असताना वाचली असेन… कदाचित आधीच! तेव्हापासून आजपर्यंत माझं सर्वात आवडतं पुस्तक तेच राहिलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांची पुस्तकं मात्र दर दोन-तीन वर्षांनी बदलत राहिली, पण बनगरवाडीने मला भुरळ घातली होती. वाचल्यावर लगेच मला ती आवडली होती आणि बाबांना मी तसं म्हटलंही… तेव्हा त्यांनी, ‘कादंबरीत काय वाचायचं, हा लेखक समर्थ कसा…’ हे समजावून सांगितलं आणि मग तर ती मनातून हृदयात जाऊन बसली. व्यंकटेश माडगूळकरांनी स्वत:च प्रस्तावनेत लिहून ठेवलंय की, वेलीला कलिंगड यावे, तशी ही कादंबरी उतरली…
अनिल बर्वेलिखित कादंबरी 1975 साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर यावर नाटक आले. मी शाळेत असताना कधीतरी हे नाटक पाहिल्याचं आठवतं. विस्मृतीत गेलेलं हे पुस्तक माझ्या भावाने दिलेल्या ढीगभर पुस्तकांत दिसलं आणि न राहवून लगेच वाचून काढलं. लहानसं असल्याने लगेच वाचून झालं. कथावस्तू इतकी धरून ठेवणारी आहे की, पुस्तक खाली ठेववेना! मुखपृष्ठावर एक मोठा काळा पंजा, त्यात अडकलेला दोर, पंज्याच्या मधोमध लाल रंगाचा डोळा आणि पंज्याला पेलून धरणारा हात… असे चित्र आहे. काळपुरुषाच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या असलेली मानव जात… त्यात एक कुणीतरी मरणाच्या डोळ्यांत डोळे रोखून त्याच्या विकराल पंजाचे आव्हान स्वीकारतो, मृत्यूला जिंकतो… मलपृष्ठावर लिहिले आहे की, ही कादंबरी माणुसकीचा जन्मोत्सव साजरा…

