Author: डॉ. अस्मिता हवालदार

Avatar photo

डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

Rental family… हा जापनीज सिनेमा एका वेगळ्याच विषयावर आहे. भाडोत्री नातलग किंवा गरजेनुसार व्यक्ती मिळवून देणारी संस्था असते. थोडक्यात, नात्याचा आभास निर्माण करून देणारी एजन्सी. अभिनयाची आवड असलेले पण यशस्वी नसलेले, पैशांची गरज असलेले नटनटी या संस्थेसाठी काम करतात. फिलीप नावाचा मध्यमवयीन अमेरिकन नागरिक जपानमध्ये राहात असतो. काही जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केल्यावर आता बरेच दिवस या परक्या देशात त्याच्याकडे काम नाही. तो एजन्सीसाठी ‘टोकन व्हाइट गाय’ असतो आणि एजन्सी त्याला पहिले काम देते, एका लेस्बियन मुलीच्या नवऱ्याची भूमिका करण्याचा. तिचा खोटा खोटा विवाह सोहळा करण्याचे काम संस्था करत असते. यानंतर वेगवेगळ्या भूमिका त्याला मिळतात. वडील नसलेल्या मुलीचा पिता, सुप्रसिद्ध…

Read More

डॉ. अमित महाजन यांच्या ‘मेधावी : एक स्वैर अनुवाद’ या पुस्तकात जगभरातल्या प्रसिद्ध कथालेखकांच्या निवडक कथांचा स्वैर अनुवाद आहे. वेगवेगळ्या लेखकांच्या वीस कथा यात समाविष्ट केल्या आहेत. अल्बर्ट कामू, गाय मोपासा, ऑस्कर वाइल्ड,चेखोव वगैरे लघुकथेवर आपली अमीट छाप सोडणाऱ्या लेखकांच्या सशक्त कथा देशोदेशीची खबर घेऊन येतात. रशियन, ब्रिटीश, फ्रेंच आणि भारतीय लेखकांच्या 19व्या आणि 20व्या शतकातल्या गाजलेल्या कथा माणसाच्या अंतरंगाचे रहस्य उलगडून सांगायचा प्रयत्न करतात. लघुकथेत कमी शब्दांत आपले विचार मांडायचे असतात तेही रंजकतेने! फापटपसारा करून चालत नाही. कथा विसविशीत असून चालत नाही. नेमका अर्थ पोहोचवणे आणि साहित्यिक मूल्य जपणे, ही तारेवरची कसरत करावी लागते. लेखकाने निवडलेल्या सर्वच कथा अप्रतिम…

Read More

युवल नोआ हरारी लिखित आणि वासंती फडके अनुवादित ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक हिब्रू भाषामध्ये 2011 साली प्रसिद्ध झाले आणि इंग्लिशमध्ये 2014 साली, तेव्हापासून जगभर गाजते आहे. आतापर्यंत 65 भाषांत अनुवादित झाले आहे. 498 पानांचे हे पुस्तक अक्षरशः आपल्याला खिळवून ठेवते. हे पुस्तक जसे मला मैत्रिणीने आग्रहाने वाचायला लावले, तसे कोणाच्या मित्राने, भावाने, भावाच्या मित्राने, बहिणीने, ट्रेनमधल्या मित्राने, ग्रंथपालाने, पुस्तकमैत्र समूहाने एकमेकांना सांगितले. समाजमाध्यमांतून यावर लिहिले गेले. असे म्हणतात, जेव्हा ‘गीता रहस्य’ प्रसिद्ध झाले होते, तेव्हा आपल्याकडे लोक ते हातात घेऊन रस्त्यातून मिरवत असत! असेच इम्प्रेशन मारण्यासाठी सुद्धा ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तक लोकांनी विकत घेतले आणि…

Read More

लेखक श्री ना पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ म्हणजे, दोन खंडांत, चार भागांत 1358 पानांत लिहिलेली ही तुंबाड गावाच्या खोतांच्या घराण्याची कथा आहे. जगबुडी नदीकाठी नांदलेल्या एका घराण्याच्या चार पिढ्यांची द्विखंडात्मक दीर्घकथा असे सुरुवातीला लिहिले आहे. सन 1725 ते 1942 पर्यंतचा घराण्याच्या तुंबाड आणि लिंबाड या दोन वंशशाखांचा इतिहास आहे. सव्वाशे वर्षांचा कालखंड. मलपृष्ठावर लिहिले आहे की, तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांचा ही बखर एखाद्या रम्याद्भूत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे. लेखकाने कोकणाच्या संस्कृतीवर सत्य वाटावी, इतकी काल्पनिक सृष्टी निर्माण केली आहे. अशी संस्कृती प्रत्यक्षात नांदली असावी, या व्यक्ती खऱ्या असाव्यात याबद्दल शंका उरत नाही, इतकी ही कादंबरी सशक्त आहे. त्यावेळी भारतात राजकीय उलाढाली…

Read More

डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या ‘मंदिर कसे पहावे’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2019मध्ये प्रसिद्ध झाली आणि आजवर पाच आवृत्या निघाल्या आहेत. भारताच्या इतिहासात रस असल्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी लगेच ते वाचलं होतं. आजही अधूनमधून वाचत राहते. मंदिर कसे पहावे? हा कसला विषय! मंदिरात जायचं, गाभार्‍यातल्या देवाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा की झालं… असं वाटलं असेल. पण मंदिर पहाणे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. कसे? ते हे पुस्तक वाचून समजते. मंदिर का पहावे, याचे उत्तरही मिळते. अगदी लहानसं 94 पानांचं हे पुस्तक असलं तरी, एका बैठकीत वाचून होत नाही! कारण प्रत्येक पान विचार करायला उद्युक्त करते. इतकेच नाही तर या…

Read More

लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि मी त्यानंतर चार वर्षांनी वाचली. यावरचा सिनेमा सुद्धा पाहिला. प्रौढ साक्षरता अभियान हा या उपहासात्माक कादंबरीचा विषय आहे. शिक्षकांनी प्रौढ अशिक्षित लोकांना शिकवायचे, असा आदेश शासनाकडून आला होता. प्रौढ अशिक्षितांना शोधायचे आणि त्यांचे वर्ग भरवायचे. एकतर वयाने मोठे हे लोक कशासाठी शिकतील? रोजचे कामकाज, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून उरलेल्या वेळात का शिकतील? त्यामुळे त्यांच्या राहणीमानात फरक पडणार नसल्याने मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्‍या कमकुवत लोक का शिकतील? याचा विचार न करता निरक्षरता निर्मूलन उपक्रम राबवला होता आणि अर्थात, जे सरकारी योजनांचे होते तेच झाले होते.…

Read More

विष्णूभट गोडसे वरसईकर  यांचे ‘माझा प्रवास’ (संशोधित आवृत्ती- चिंतामणी विनायक वैद्य (1907)) हे मराठीतले पहिले प्रवास वर्णन आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखक विष्णूभट गोडसे वरसईकर उत्तर भारतात फिरत होते. त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेले स्वातंत्र्य समर लिहून ठेवले आहे. त्यांचा हेतू मात्र इतिहासाची नोंद करण्याचा नव्हता. त्यांनी डायरी लिहिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे, कारण हे बखरीसारखे लिहिले आहे. परदेशी प्रवाशांनी भारतात आल्यावर अशा प्रकारच्या बखरी लिहून ठेवल्या, ज्या आज ऐतिहासिकदृष्ट्‍या मौलिक पुरावा आहेत. उदा. मॅगस्थेनीसचे इंडिका. पुस्तकाच्या प्रस्तावनेत चि. वि. वैद्य म्हणतात की, 1857च्या युद्धाबद्दल (‘बंड’ असे लिहिले आहे, पण…

Read More

भाग – 2 भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीच्या पहिल्या दोन भागांत असलेले कथानक या लेखाच्या पहिल्या भागात पाहिले. खंडेराव विठ्ठल या पुरातत्वात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हे स्वगत आहे. हा मूळचा मोरगाव नावाच्या खेड्यात राहणारा श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा असून शिकण्यासाठी शहरात येऊन राहिला आहे. सिंधू संस्कृती ते विसाव्या शतकातल्या सामान्य भारतीयांचा तो प्रतिनिधी आहे. कादंबरीची सुरुवात, ‘कोण आहे? मी खंडेराव. तू कोण आहेस? मी तू आहे…’ अशी आहे. तिसऱ्या भागाची सुरुवात बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात खंडेराव प्रवेश घेतो, या प्रसंगाने होते. तिथला क्लार्क मोरगावच्या एका मुलीचा मुलगा असल्याने खंडेरावाला घरी घेऊन जातो. त्या बडोद्याच्या आत्याला जुन्या आठवणी…

Read More

भाग – 1 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडेंची पहिली कादंबरी कोसला लोकप्रिय आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे भाषण वादग्रस्त झाले. त्यांनी भाषणात व्यक्त केलेल्या मतांशी मी अजिबात सहमत नाही. त्यांच्या राजकीय मतांशी सुद्धा सहमत नाही. तरीही Seperate Art from the artist हे मनापासून पटल्यामुळे हे पुस्तक वाचायचे ठरवले. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ हे नाव पुस्तकाला का दिले असेल? असा प्रश्न पडतो. अडगळही आणि समृद्ध सुद्धा! इंग्लिशमध्ये oxymoron म्हणतात तसं. अडगळीतले सामान, अडगळीची खोली हेच डोळ्यासमोर येते तर, समृद्ध म्हटल्यावर वैभवशाली, गौरवशाली असे काही. दिवाळीची सफाई करताना माळ्यावर ठेवलेले जुने सामान दरवर्षी…

Read More

लक्ष्मण माने यांच्या ‘उपरा’ या विलक्षण आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. भटक्या विमुक्त कैकाडी समाजाचे चित्रण यात येते. पुस्तकाचे मुखपृष्ठ नीट पाहायला हवे. गाढवाच्या पाठीवर सामानसुमानासकट मुले बसली आहेत. गाढवाच्या आकारापेक्षा सामानाचा बोजा मोठा आहे. गाढवाचा एक पुढचा आणि एक मागचा पाय बांधला आहे. कैकाडी समाजातले लोक गाढवाच्या पाठीवर संसार बांधून एका गावाहून दुसऱ्या गावी फिरत राहतात. फक्त पावसाळ्यात एका ठिकाणी राहतात. गाढवाचे बांधलेले पाय समाजाने त्यांना घातलेली बंधने दाखवतात. पाठीवर असह्य ओझे आणि पायात बंधन अशा परिस्थितीत या समाजाला जगावे लागते. टोपल्या विणणारी ही जमात भारतभर पसरली असून सर्वांची भाषा एकच आहे. भटकी जमात असल्यामुळे त्यांचा विचार कोणी…

Read More