Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रदीप नक्की कोण होता?
    ललित

    प्रदीप नक्की कोण होता?

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीJune 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, कथाविश्व, प्रदीपची कहाणी, राजूशेठचे दुकान, जळगावमधील कपड्यांचे दुकान, कपड्याच्या दुकानाची सफाई, प्रदीपकडून दुकानात सफाई, सफाईसाठी प्रदीपला इतरांची मदत, प्रदीपचा जेवणाचा डबा, प्रदीपसाठी सेल्समनचा दिलेरपणा, प्रदीपसाठी सेल्समनकडून जेवण, प्रदीपचे रहस्य
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    “दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे”

    ही पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं

    “काय पाहिजे?”

    त्याने शांतपणे बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला,

    “राजूशेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे…”

    अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली.

    “बोला.”

    “ते… तुम्हाला सफाईकामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?”

    “हो. तू करणार आहेस का?”

    त्याने मान डोलावली. राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पंधरा-सोळा वर्षांचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे, असं त्यांना वाटेना… पण तीन दिवसांपासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे, त्यांना योग्य वाटत नव्हतं.

    “तुझं नाव?”

    “प्रदीप.”

    “वडील काय करतात?”

    “रिक्षा चालवतात.”

    “कुठे रहातोस?”

    “समता नगर…”

    “ठीक आहे. तीन हजार देऊ तुला महिन्याला. खाडे करायचे नाहीत. खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो…”

    “हो चालेल,” तो म्हणाला

    तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले, “अरे भास्कर… याला दुकान दाखवून दे. काम समजावून सांग.”

    भास्कर आला, त्याने प्रदीपला ते तीन मजली भव्य दुकान दाखवलं.

    “तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल. फ्लोरिंग, काचेची कपाटं, काऊंटर्स, वॉशरूम… सगळं साफ करावं लागेल. हे कपड्यांचं दुकान आहे. इथे थोडीही धूळ चालत नाही. ग्राहक येताना धूळ घेऊन येतात… त्यामुळे वारंवार झाडू मारणं, कपड्याने पुसणं करावं लागतं. रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल…”

    हेही वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    प्रदीपने मान डोलावली.

    “जा आता. सकाळी आठ वाजताच ये.”

    प्रदीप गेला. त्याला जाताना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही, असंच वाटून गेलं.

    “ठीक आहे… पाहू दोनचार दिवस… नाही पटला तर हाकलून देऊ,” ते मनाशीच बोलले.

    प्रदीप दुसऱ्या दिवशी आला. त्याने काम करायला सुरुवात केली, पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही, हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं. ते त्याला वारंवार सूचना देऊ लागले. दहा वाजले. दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती. ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे. नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं. दुकान सुरू झालं. साडेअकराला भास्कर वॉशरूमकडे जायला निघाला तर, वॉशरूमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.

    “काय रे काय झालं? का रडतोय?”

    “नाही. काही नाही…” प्रदीपने डोळे पुसले.

    “तुला काम जमत नाही, असं मनोज सांगत होता. कधी काम केलं नाही वाटतं?”

    “नाही…”

    “गरिबी वाईट असते बाबा. काहीही कामं करायला लावते. जमेल जमेल…. तीन-चार दिवस हाल होतील. मग सवय होऊन जाईल. काही रडू नको. घरी कोण काम करतं?”

    “आई आणि बहिण.”

    “तरीच! कळलं ना कसा त्रास होतो ते?”

    प्रदीपने मान डोलावली.

    दुपारी भास्कर कस्टमर नाही, असं पाहून जेवायला बसला; त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.

    “काय रे जेवायचं नाही का?”

    प्रदीपने नकारार्थी मान हलवली.

    “का? डबा नाही आणला का?”

    “नाही.”

    “ये मग इकडे… आपण दोघंही जेवू.”

    “नको. मला भूक नाहीये…”

    “अशी कशी भूक नाही. सकाळपासून काम करतोय. चल मुकाट्याने ये खायला…”

    तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले. प्रदीपचा डबा नाही, हे पाहून त्यांनी भाजी आणि दोन दोन पोळ्या प्रदीपला एका ताटलीत काढून दिल्या. भूक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.

    “उद्यापासून डबा आणत जा. काय!” भास्करने दम भरला.

    “ते… आई आजारी असते, त्यामुळे आणता येत नाही”

    तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं. एक जण म्हणाला, “काळजी करू नको. आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी सुद्धा…”

    प्रदीप काही बोलला नाही. पण त्याचे डोळे भरून आल्याचं भास्करच्या लक्षात आलं.

    चार-पाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये, हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली. कुणी काऊंटर पुसून घेतले, कुणी काचेची कपाटं साफ केली, तर कुणी पंखे, लाइट्स… आठवडाभरात प्रदीपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं. पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजूशेठला ही गोष्ट माहीत नव्हती, त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते. भास्करला त्यांनी दोन-तीनदा त्याच्याबद्दल विचारलं, तेव्हा भास्कर म्हणाला, “चांगला आहे पोरगा कामाला… मेहनती आहे.”

    लग्नाचा सीझन होता. ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली. प्रदीपचं कामही वाढलं. वारंवार दुकान झाडणं, पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही. पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला. आता तो मोकळेपणाने बोलत होता. फुरसत असली की, तो सेल्समनना मदत करायचा. ढिगाने पडलेल्या साड्या, बेडशिट्सच्या घड्या करून ठेवायचा. ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅक करुन ठेवायचा. त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खूश होते.

    महिना झाला. राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले, तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आल्याचं त्यांना जाणवलं.

    “काय रे काय झालं?”

    “काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून…”

    त्याने डोळे पुसले. शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नव्हता. उलट, सीझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरू असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खूश होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.

    सोमवार उजाडला. राजूशेठ दुकानात आले. देवांच्या फोटोंची पूजा करून ते कॅश काऊंटरवर बसत नाही, तोच प्रदीप त्यांच्याकडे आला आणि नमस्कार करून म्हणाला,

    “शेठजी, माझे बारावीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरू होताहेत तर, मी हा आठवडाच काम करू शकणार आहे…”

    शेठजींना धक्का बसला.

    “अरे पण, तू दुकानात काम करूनही क्लासेस करू शकतोस. संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला…”

    “नाही शेठजी, क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात”

    आता मात्र शेठजी रागावले. आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं. याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता. पैसा देऊनही माणसं टिकायची नाहीत. काही तर ॲडव्हान्स घेऊन पळून जायची. दुकान चालेल की नाही, यापेक्षा माणसं टिकतील की, नाही याचीच चिंता शेठजींना लागून रहायची. प्रदीप टिकेल, असं त्यांना वाटत होतं. शिवाय, त्याचं कामंही त्यांना आवडलं होतं.

    हेही वाचा – कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

    “तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर, तसं बोलला का नाहीस? आता या आठ-दहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावं लागेल…” ते रागावून म्हणाले.

    प्रदीप हसला… “काही हरकत नाही शेठजी. तुम्हाला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही.”

    शेठजींना आश्चर्य वाटलं. एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्याचे पैसे कापले म्हणून वाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती. या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं. तरुण पोरांना अशीही पैशांची किंमत असते कुठे?

    नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला. पण तो चार हजार पगारावर अडून बसला. शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.

    सोमवार उजाडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वर्दळ सुरू व्हायची होती. प्रदीपला आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं… “काय रे विचार बदलला की काय तुझा?”

    प्रदीप हसून म्हणाला, “नाही शेठजी. या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय.”

    “बरं बरं…”

    प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला. शेठजी खुर्चीवर बसत नाहीत, तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली. आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरू होणार याचा शेठजींना आनंद झाला.

    क्रमश:
    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026 ललित

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026 ललित

    दहावी नापास

    June 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJune 24, 2026

    सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक,…

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 338
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 465
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 731
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026
    Most Popular

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.