Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्रणाली वैद्य भाग – 11 शांताबाईंनी एक खोल श्वास घेतला आणि सुमित्रा आजीकडे पाहून हलकं हसल्या, “मी येईन तुमच्यासोबत. पण एक अट आहे — तिथे मला आराध्यालाही न्यायचंय.” सुमित्रा आजी क्षणभर स्तब्ध झाल्या, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधानाचं हसू उमटलं… “तिला न्यायचंच… अग मीच म्हणणार होते आराध्याला सोबत घेऊन चल… माझ्या मनातलं तुझ्या तोंडी आलं. मलाच खूपच आनंद झाला हे ऐकून. अगदीच योग्य जागा आहे तिच्यासाठी.” हे बोलताना त्यांच्या नजरेत काहीतरी जाणून असल्यासारखा एक भाव होता… आज घरात एक वेगळंच शांत, पवित्र वातावरण निर्माण झालं होतं… सुमित्रा मावशींच्या ओजस्वी आवाजात आणि त्यांच्या शब्दांमधून उमटणाऱ्या श्रद्धेमुळे घरातल्या प्रत्येकालाच एक अनामिक…
माधवी जोशी माहुलकर भाग – 2 संध्याकाळ झाली तरी नानासाहेब अजूनही हॉलमध्ये खुर्चीवरच बसून होते. सुमतीच्या या अवस्थेला ते स्वतःला जबाबदार मानत होते. त्यांच्या लाडक्या सुमतीला त्यांना या अवस्थेत पाहवले जाणार नव्हते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. मनाशी काहीतरी निर्धार करून ते उठले आणि बाहेर बगीच्यात आले. सुमतीनेच लावलेली झाडे फुलांच्या भाराने वाकली होती. त्यातील मोगऱ्याच्या काही कळ्या त्यांनी काढून आपल्या ओंजळीत घेतल्या आणि ते सुमतीताईंच्या खोलीत आले. त्या कळ्यांना त्यांनी सुमतीताईंच्या उशाशी ठेवले आणि ते सुमतीताईंच्या उठण्याची वाट पाहू लागले. अर्ध्या तासाने सुमतीताई उठल्या त्या मोगऱ्याचा सुवास आला म्हणूनच. त्यांना आपल्या उशाशी ती मोगऱ्याची फुलं दिसताच त्या आनंदल्या, “अहो,…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एऱ्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रतिं भानु कां जैसा । कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥63॥ मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥4॥ माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हे जगचि नोहे आघवें । जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥64॥ कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥65॥ हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥66॥ महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परि माझां ठायीं बिंबते । जैसें जळीं…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय चांगला राहील, आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इच्छित बदली किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवन देखील आनंददायी राहील. मात्र रागावर नियंत्रित मिळवा, अन्यथा तुम्ही वादात अडकू शकता. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. अनुकूल ग्रहांच्या स्थितीमुळे नशीब पालटणार आहे. व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, मात्र सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची कामे यशस्वी होतील. पदोन्नती शक्य आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या…
राजू पाटील लच्छनकर नमस्कार मी आनंदयात्री… नुकत्याच झालेल्या विधानसभा तसेच नांदेड लोकसभा निवडणुकीत मी अगदी मी मग्न होतो. राजकीय क्षेत्रात काम करत असताना इतकी मोठी जबाबदारी पक्षानं तसेच आमचे खासदारकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण साहेबांनी टाकली. पण या धावपळीत, या गडबडीत, कुठेतरी एक मन साहित्यात रमत होतं. खरंच जीवन जगत असताना, जग ओळखता ओळखता आपण कोण आहोत, हेच कळत नाही. मलाही असा प्रश्न पडतो की, मी शेतकरी आहे, राजकारणी की, एक चिंतन करणारा? की मग मी एक साहित्यिक? इतक्या मोठ्या शब्दांत मी अडकणार नाही. माझ्या मनातील भावना मी आज व्यक्त करणार आहे. शेतशिवारात गेलो की, मी माझ्या भावविश्वात जातो. एकदा का…
मयुरेश गोखले आज पहाटे 5 वाजताच श्रीरंग जागा झाला. त्याला आज ऑफिसला लवकर जायचे होते. हलकी थंडी सुरू झाली होती, रोजच्या सवयीमुळे पंखा डोक्यावर फिरत होता. मी साखर झोपेत होते, पण त्याच्या उठण्याची चाहूल मला लागली होती. तो अचानक जवळ आला, मी झोपेत आहे हे पाहून अलगद माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकले. मी खूप सुखावले. पण आज तो सकाळी जाऊन रात्री उशिरा परत येणार होता, त्यामुळे मन थोडे उदास होते. लग्न होऊन जेमतेम 4 महिने झाले असतील आणि याच्या ऑफिसची लगबग वाढतच होती. ऑफिस ही पहिली बायको आणि मी दुसरी असं वाटायला लागलं होतं. असो, आज श्रीचा मूड काही वेगळाच वाटत…
कोफ्तासाठी साहित्य सारासाठी मसाला साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप्स हेही वाचा – Recipe : बटाट्याचा बदामी हलवा शिंगाड्याची भजी साहित्य कृती टिप्स (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
मानसी देशपांडे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे मातृत्व… असं म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी…’ आई होणं खरंच सोपं असतं का? अजिबात नाही. आज माझ्यावरून हे जाणवत आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात तसं, “आपल्या जोडीदाराचं मुल वाढवणं म्हणजे त्याला अंश रुपाने स्वतःच्या शरीरात जागा देणं. स्त्री ही काही प्रमाणात आपल्या जोडीदाराची आई देखील होते. जेव्हा जेव्हा ती संघर्षासाठी उभी असते, तेव्हा ते नाते भलेही पत्नीचे असेल, पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करते, तेव्हा ते नाते आईचेच असते…” गरोदरपणात किती बदल होतात शरीरात ते प्रत्येक स्त्री अनुभवत असते. कधी खूप राग येतो, तर कधी मन आनंदात असते.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥2॥ जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥47॥ आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥48॥ मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥49॥ तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥50॥ परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥51॥ पैं…
दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:48) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. काम खूप असले तरी कठोर परिश्रमाने तुम्ही ते हातावेगळे करू शकाल. आर्थिक लाभ होईल. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतात. परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. कामानिमित्त एखादा छोटासा प्रवास कराल. आज नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल. धार्मिक आणि सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल, मात्र तुमच्या…

