Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मेष या आठवड्याच्या सुरुवातीला थोडी चिंता राहील. नोकरदार नवीन संकल्प हाती घेतील आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्ण करू शकतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. जास्त अधिकार प्राप्त होतील. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे; ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. वृषभ या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. नोकरदारांना अनपेक्षित प्रमोशन मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरुपात बदल घडेल. व्यावसायिक वर्गाला भांडवलासाठी आर्थिक मदतीची गरज भासेल; बँकेकडून ती मदत मिळेल. नवीन करार होतील, व्यवसायात वाढ होईल. महिलांच्या बाबतीत घरात मंगलकार्य ठरण्याचे योग…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे । माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥85॥ मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥ हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥ यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥88॥ यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥6॥ पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे । सहजे हालविलिया वेगळा दिसे…
दर्शन कुलकर्णी भानुसप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – गण गण गणात बोते… मंत्र समजून आचरणात आणण्याची गरज दिनविशेष प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर टीम अवांतर हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 रोजी मिरजजवळील बेगड गावी जन्म झाला. त्यांचे घराणे भिक्षुकांचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर बाळकृष्ण यांना इचलकरंजी येथील त्यांचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. पण त्यांना भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिले. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण गाणे…
सुधीर करंदीकर शेगावचे श्री गजानन महाराज यांनी सर्व भक्त मंडळींना एकच मंत्र दिला होता आणि तो म्हणजे – गण गण गणात बोते… महाराज स्वतः या मंत्राचा सतत जप करत असत आणि त्याप्रमाणे तो आचरणात आणत असत. कुठलाही मंत्र म्हटला की, त्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे, ध्यानस्थ बसून त्या मंत्राचा नित्यनियमाने जप करणे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, नित्य जप करण्याबरोबरच त्या मंत्राचा अर्थ समजावून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे आणि ठेवणे! आपण बरेचजण ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नित्य जप करत असतो. असा जप केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं आणि त्यामुळे जप करणाऱ्यांना मानसिक शांतता नक्कीच मिळते. पण…
कामिनी व्यवहारे भारतात आमटीचे नानाविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या डाळींची तसेच मिक्स डाळींचीही ही आमटी केली जाते. चवीतही फरक असतो. डोक्यावर टाळूला घाम येईल अशा काही झणझणीत असतात. या डाळींची लज्जत आणखी वाढविण्यासाठी त्यात काही पदार्थही घातले जातात. काहीवेळेस कणकेच्या वड्या (डाळ ढोकळी) तर, काहीवेळेस बेसनाचे गोळे (गोळ्यांची आमटी) घातल्याने त्याचे स्वरुप बदलते आणि वेगळाच स्वाद येतो. साहित्य हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा) एकूण कालावधी पुरवठा संख्या – 3 ते 4 जणांसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com…
डॉ. विवेक वैद्य दुपारी बातम्या बघताना “लोकलच्या दरवाज्यात स्टंट करणाऱ्या तरूणाचा मृत्यू” ही बातमी तिने पाहिली आणि ती अस्वस्थ झाली. आपला मुलगा लोकलने कॉलेजला जातो आणि त्याच्याबरोबर असणारे काही मित्र थोडे आगाऊ आहेत, हे तिला माहिrत होते. त्यांच्या नादाला लागून हाही काही नसते उपद्व्याप तर करत नसेल? ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. तब्बल अर्धा तास उशिराने तो आला तोपर्यत हिचा जीवात जीव नव्हता. थोडा वेळ गेल्यावर सहज विचारते असे दाखवत ती म्हणाली, “का रे, तुझे मित्रबित्र नाही ना काही स्टंट करत लोकलमध्ये?” “नाही गं. मी तर त्यांना लोकलच्या दरवाज्यातही उभ राहू देत नाही. घरी आई वाट पहात असते ना…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥72॥ तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥73॥ एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥74॥ नातरी सागरींचां पाणीं । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारियाची नव्हे ॥75॥ पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥ जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात, सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात येऊ शकतात. वृषभ – तुमच्या राशीचा अधिपती शुक्र हा महत्वाकांक्षी आहे. शुक्र सांसारिक सुखांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आज आवश्यक गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात वेळ घालवाल. अर्थात, या काळात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी वाद घालणे टाळा. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. योग किंवा ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. मिथुन – आज अनेक कामांमध्ये तुम्हाला शुभ…
ॲड. कृष्णा पाटील परवा बाप्या म्हणजेच बापूच्या लग्नाची बैठक सुरू होती. मुलीला मुलगा पसंत पडला होता. मुलाला मुलगी पसंत पडली होती. सर्व बघाबघी झाली होती. आता लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मुलीचं स्थळ बाप्याच्या मामानेच आणलं होतं. मामाच्या सगळीकडे ओळखी, त्याच्यामुळेच स्थळ चालून आलं होतं. मामा लग्नाला मध्यस्थी होता. बाप्याच्या भावकीतली चार माणसं गोळा झाली होती. मुलीकडील चार-पाच माणसे आली होती. बाप्याच्या घरात लग्नाची बोलणी सुरू होती… देण्या-घेण्याचा विषय निघाला. बाप्याचा मामा मुलीकडच्या लोकांना म्हणाला, “तुम्हाला जेवढं शक्य असंल तेवढं करा. आमची कोणतीही सक्ती नाही.” मुलीकडचे लोक म्हणाले, “आम्ही मुलगी आणि नारळ देणार. आमची परिस्थिती नाही, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं…
प्रणाली मंगेश महाशब्दे आज वाड्यात खूप गडबड होती. शेजारच्या सुमाची मंगळागौर होती. मग काय विचारता सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. वाड्यामध्ये तुमचे आमचे असे काही नसते, त्यामुळे ही मंगळागौर सगळ्यांच्याच घरचा सोहळा होता. सकाळी सगळेजण आवरून पूजेच्या, स्वयंपाकाच्या तयारीला लागले. नुकतेच लग्न झालेली सुमा तिच्या नवऱ्याबरोबर पूजेला बसली होती. तिच्या दोन-तीन मैत्रिणी आणि वाड्यातील नवीन सूना अशा छान पाच-सहा जणी सुमाबरोबर पूजेसाठी बसल्या होत्या. यथासांग पूजा पार पडली. उखाणे घेत, एकमेकांना घास भरवत सगळ्यांची जेवणं झाली. संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण करून देत सगळेजण घरी गेले. संध्याकाळी सगळेजण वाड्याच्या मधल्या चौकात जमा झाले. तसेतर मंगळागौरीचे खेळ हा बायकांचा कार्यक्रम… पण आमच्या वाड्यात…

