Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी, खारी गवार, बटाट्याची भाजी, कारल्याचे लोणचे, कारल्याची रस,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना या टिप्स वापरून पाहा.

    • दुधी भोपळ्याची कोफ्ता करी करताना दुधीचे मोठे मोठे तुकडे करून आतील मऊ पांढरा भाग बियांसहित कापून बाजूला ठेवावा. नंतर दुधी किसून, साले राहतील ती टाकून द्यावीत. कीस पिळून घ्यावा. पाणी टाकून द्यावे. किसाचे नेहमीप्रमाणे कोफ्ते करावे. आतील पांढरा भाग बियांसहित पाणी घालून मिक्सरमध्ये वाटावा. नारळाप्रमाणे दाटसर रस करावा. गाळावा. हा रस करीसाठी (ग्रेव्हीसाठी) वापरावा. ही करी चवदार आणि भरपूर होते. पांढरा भाग बाजूला काढल्यामुळे कोफ्ते जास्त करी शोषून घेत नाहीत. त्यामुळे कोफ्ते फुटण्याची भीती नसते.
    • मेथी, पालक, मुळ्याचा पाला या भाज्या जास्त देठ न काढता निवडून बारीक चिराव्यात. दोन-तीन दिवस उन्हात वाळवून पूड करून डब्यात भरून ठेवाव्यात. उन्हाळा आला की, वाळलेल्या भाजीचा उपयोग करावा. भाजीची पूड रात्री भिजत घालावी. पाणी भरपूर असावे, कारण फार फुगते. सकाळी दोन-तीन वेळा ती पाण्यातून काढावी. भाजीत कणीक, थोडे बेसन, मीठ-तिखट, चवीला साखर घालून घट्ट मळून छोटे पराठे किंवा पुऱ्या कराव्यात. मोहन घालू नये. पोळ्या पण फार छान बनतात. लोणी आणि लोणच्याबरोबर तर फार स्वादिष्ट लागतात. (10 पुऱ्यांकरिता 1 चमचा भाजीची पूड असे प्रमाण घ्यावे.)

    हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    • उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी करताना फोडणीमध्ये एक छोटा चमचा डाळीचे पीठ घालावे. त्यामुळे भाजीस छान पिवळा रंग येतो. ती रुचकर लागते. तसेच भाजी कढईस लागत नाही. त्यामुळे खरडण्याचा त्रास वाचतो.
    • गवारीच्या शेंगाची भाजी करतात. कुणाला आवडते कुणाला नाही. मात्र खारी गवारी शेंग सर्व लहान-मोठ्यांना आवडतेच असा अनुभव आहे. गवारीच्या शेंगा धुऊन कोरड्या करा. जून असलेल्या काढून टाका. बाकी शेंगा शेंडा काढून न मोडता निर्लेप कढईत तळून काढा. छान खमंग कुरकुरीत होतात. नंतर चवीप्रमाणे या शेंगांना थोडे मीठ चोळा. खारी सोपी गवारी शेंग तयार. अशी खारी शेंग चिवडा, उपिटातही खमंग, कुरकुरीत छान लागते. गप्पा मारताना, सहलीत खारी शेंग मजा आणते. गवारीच्या शेंगा लिंबाच्या लोणच्याबरोबरही छान लागतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ अन् बरंच काही…

    • प्रथम कारल्याचे पातळ काप करून त्याला थोडे मीठ आणि चिंचोकाभर गूळ लावून तासभर फडक्यात बांधून ठेवावे. वर वजन ठेवावे. नंतर ते पिळून भांड्यात काढावे. मंग मोहरीची पूड घ्यावी. त्यामध्ये लिंबाचा रस आणि असल्यास थोडा व्हिनीगर घालून घुसळावे. नंतर त्यात मीठ आणि फोडणी घालून सर्व एकत्र करावे. हे लोणचे बरेच दिवस टिकते आणि औषधीही आहे.
    • आपण जेव्हा कारल्याचा, आल्याचा, तुळशीचा, नारळाचा रस काढतो, तेव्हा त्याला थोडासा गूळ लावावा म्हणजे रस चांगला निघतो.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    By Team AvaantarJune 9, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026

    Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला

    June 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 323
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 449
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 689
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.