Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली कशी असावी आणि कशी नसावी!
    शैक्षणिक

    शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली कशी असावी आणि कशी नसावी!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, शिक्षकांचा सकारात्मकपणा, शिक्षकांचे वर्तन, शिक्षकांची देहबोली, शिक्षकांचा उत्साह, शिक्षकांचा निरुत्साह, शिक्षकांची नोकरी, शिक्षकी पेशा, शिक्षकांची सकारात्मक भूमिका,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. किशोर महाबळ

    शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना शिकण्यात मुळीच रस नसतो. शक्यतो शिकणे टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यास न करण्यासाठी आणि होता होईतो वर्गातही न बसण्यासाठी विद्यार्थी काही ना काही कारणे शोधत असतात. तहान लागलेली असो की नसो, त्या निमित्ताने आणि अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्गाबाहेर जाण्याचा ते प्रयत्न करतात. वर्गात बसलेच तर, त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर कंटाळा आणि निरुत्साह दिसतो. अंगाला आळोखेपिळोखे देणे, कारण नसताना इकडे तिकडे बघणे, आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी बोलणे यासारख्या असंख्य अनावश्यक गोष्टी करण्यात मुले वेळ घालवतात आणि अनेकदा सुट्टीची वाट बघत बसतात, असे शिक्षकांचे म्हणणे असते. विद्यार्थ्यांचे हे वागणे, हा निरुत्साह शिक्षकांना फार त्रासदायक वाटतो. शिकण्याची इच्छाच नसणाऱ्यांचे अभ्यास विषयाकडे, शिकविण्याकडे, फळ्याकडे लक्ष वेधणे, त्यांची एकाग्रता टिकविणे हे फार मोठे आव्हान असते. हे करताना आपलीही एकाग्रता टिकवून ठेवणे अत्यंत कठीण असते. यातच तासिकेचा अमूल्य वेळ अनेकदा वाया जातो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हा निरुत्साह आणि त्यांची नकारात्मक देहबोली यावरून विद्यार्थ्यावर शिक्षक नेहमीच टीका करतात, ते काही प्रमाणात बरोबर आहे.

    विद्यार्थ्यांचे अभ्यासात तसेच वर्गात लक्ष न लागण्याची असंख्य कारणे असतात, हे मान्यच करायला हवे. पण अनेकदा विद्यार्थ्यांच्या अशा वर्तनास शिक्षकही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. शाळेत वावरताना, वर्गात शिरताना, वर्गात शिकवताना, वर्गात आणि वर्गाबाहेर विद्यार्थ्यांशी बोलताना शिक्षकांचे हावभाव आणि वागणे कसे असते? काही अपवाद वगळता बहुतांश शिक्षकांचे हावभाव, बोलणे आणि देहबोली ही अत्यंत नकारात्मक असते. अनेक शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह सोडून अन्य सगळे भाव असतात! आपले हावभाव हे नकारात्मक आहेत, याची या शिक्षकांना जाणीवही नसते. जाणीव करून घेण्याची इच्छाही नसते. चेहऱ्यावरील हावभाव व देहबोलीचे अध्यापनातील महत्त्वच त्यांना लक्षात आलेले नसते. ते जेवढे त्यांच्या वेषाबद्दल, राहणीमानाबद्दल सजग असतात तेवढेही ते वर्गात असताना आणि शिकविताना आपल्या चेहऱ्यावर कोणते भाव असतात याबाबत जागरूक नसतात.

    हेही वाचा – माहिती तंत्रज्ञानातून सर्वोत्तम अध्यापन

    काही शिक्षकांच्या चेहऱ्याकडे बघून ते सतत कोणावर तरी रागावलेले, चिडलेले किंवा संतापलेले आहेत, असे वाटते. काही शिक्षकांकडे बघून ते बेफिकीर, मग्रुर, उद्धट असल्याचे चटकन लक्षात येते. काही जणांकडे बघून ते नेहमीच थकलेले आणि आजारी आहेत किंवा अपचनामुळे बेजार आहेत, असे वाटते. तर काही जणांकडे बघून ते रोज घरातील किंवा बाहेरील कोणाशी तरी भांडून आले आहेत, असे वाटते. काही जणांच्या चेहऱ्यावर अत्यंत निराशा दिसते. ते अत्यंत दुःखमय जीवन जगत असल्याचे वाटते. काही जणांचे चेहरे नेहमीच त्रासिक असतात. काही शिक्षक कायम घाबरलेले दिसतात. काही जणांजवळ आत्मविश्वास नसल्याचे तर, काही जणांजवळ अतिआत्मविश्वास असल्याचे दिसते. विद्यार्थी बेशिस्तीने वागणार आहेत, असे गृहित धरून वर्गात येणारे काही शिक्षक असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम संशय दिसतो. काही जण आपल्या चेहऱ्यावर हसू येऊ नये, याची पूर्ण काळजी घेत वागत असतात. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे ऐकून आनंद, आश्चर्य, हसू, कौतुक असे कोणतेही चांगले भाव काही शिक्षकांच्या चेहऱ्यावर कधी येतच नाहीत.

    उत्साह, चैतन्य आणि अफाट उर्जेने ओतप्रोत भरलेल्या, जगाकडे मोठ्या आशेने आणि अपेक्षेने बघणाऱ्या, प्रेरणा, स्फूर्ती, कौतुक आणि मार्गदर्शनाची अपेक्षा करणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या चेहऱ्यावरील असे नकारात्मक हावभाव, निरुत्साही वर्तन मुळीच आवडत नाही. अशा शिक्षकांचे शिकविणे आवडत नाही. अशांना विद्यार्थी टाळण्याचा प्रयत्न करतात. अशा शिक्षकांच्या वर्गात त्यांना बसावेसे वाटत नाही. शिकण्याची त्यांची प्रेरणाच खुंटून जाते. शिकणे हे कंटाळवाणे आणि नकोसे वाटू लागते.

    आवडीने शिक्षकी पेशात आलेले शिक्षक क्वचितच आढळतात. तरुणवयात जे साध्य करायचे होते, जो व्यवसाय करायचा होता तो न जमल्याने नाईलाजाने शिक्षकी पेशात आलेले अनेक जण असतात. त्यांनी नाखुशीनेच, बीएड- डीएड केलेले असते. हे शिक्षणही पाठ्यपुस्तके वाचून न करता गाईड वाचून केलेले असते.

    शिक्षक म्हणून आपल्याला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावयाची आहे, याची जाणीव करून घेऊन आवडीने हे शिक्षण घेतलेले नसते. त्यामुळेच शिकवायचे म्हणजे नेमके काय करायचे, वर्गात कसे वागायचे, कसे बोलायचे, सकारात्मक वर्तन म्हणजे काय, या महत्त्वाच्या विषयांचा विचारच केलेला नसतो! तसेच, प्रभावी अध्यापनाच्या विविध पद्धतींचा नीट अभ्यासच केलेला नसतो. मुळात शिक्षक होण्यात रूची नसल्याने शिकविणे आवडत नाही, पण पैसे कमविण्यासाठी तर ते करावे लागते. याचा परिणाम नकारात्मक देहबोलीत होतो. न आवडणारे काम करावे लागल्याने ते काम करण्याचा कंटाळा चेहऱ्यावर प्रगट होतो. ज्यांना मुळातच शिकविण्यात, विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि व्यक्तिमत्व विकासात मदत करण्यात काडीचीही रूची नसते, तेच जास्त पगार मिळतो म्हणून आणि मिळेल तो रोजगार करायचा एवढ्या एकमेव उद्देशाने तसेच नाईलाजाने शिक्षक झालेले असतात. म्हणूनच अशा शिक्षकांची देहबोली आणि त्यांचे हावभाव हे विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याबद्दलचा निरूत्साह वाढण्यास कारणीभूत ठरतात.

    हेही वाचा – शिक्षकांचे वर्तनही सकारात्मक हवे

    जे शिक्षक आवडीने शिक्षक झालेले असतात, किंवा ज्यांनी शिक्षकाच्या भूमिकेचे महत्त्व समजून घेतलेले असते, ते वेगळे वागतात. त्यांची प्रत्येक कृती आणि उक्ती ही अर्थपूर्ण असते. त्यांना आपला पेशा आवडत असल्याने, वर्गात जाणे, विद्यार्थ्यांना शिकविणे, मार्गदर्शन करणे, चर्चा करणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडावेत म्हणून प्रयत्न करण्यात अत्यंत आनंद वाटतो. आपल्या वर्गात देशाची भावी पिढी बसली आहे, याची त्यांना निरंतर जाणीव असते. शिक्षणानेच चांगले जीवन जगता येते, हे माहीत असल्याने विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, भरपूर अभ्यास केला पाहिजे, असे या शिक्षकांना तीव्रतेने वाटते. माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा आयुष्यात यशस्वी झाला पाहिजे, अशी त्यांना तीव्र इच्छा असते. अभ्यास करणे आणि शिकणे हे विद्यार्थ्यांना सहसा आवडत नाही, याची या शिक्षकांनाही जाणीव असते आणि म्हणूनच शिक्षण, शिकणे आणि शिकविणे हे रंजक कसे करता येईल, शिक्षणाची मुलांमध्ये आवड कशी निर्माण करता येईल, याचा हे शिक्षक सतत विचार करीत असतात आणि विविध मार्गांनी प्रयत्न करीत जातात.

    हे सारे ते आवडीने करीत असल्याने साहजिकच त्यांचे वर्तन चैतन्यपूर्ण असते. त्यांच्यात दुर्दम्य आशावाद असतो. तो आशावाद उत्साह अशा शिक्षकांच्या वागण्यातून बोलण्यातून सहजगत्या व्यक्त होतो. आवडीचे काम करीत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरूपात आनंद आणि समाधान सहजगत्या व्यक्त होते. अशा शिक्षकाच्या या चैतन्यपूर्ण वर्तनाचा सकारात्मक परिणाम अभ्यासात शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्याचा कितीही कंटाळा करणाऱ्या विद्यार्थ्यावरही होतोच. त्यालाही आपण काही करावे, असे वाटू लागते. अशा शिक्षकाच्या वर्तनातून प्रचंड ऊर्जा, उत्साह, चैतन्य, आशावाद, प्रेरणा व्यक्त होत जाते. हे सारे सकारात्मक असते. आपल्या एका नकारात्मक कृतीचा, वर्तनाचा, बोलण्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होणार आहे, याची या शिक्षकाला जाणीव असते आणि त्यामुळे आपल्या हावभावातून, वर्तनातून सकारात्मकता व्यक्त होईल, असा या शिक्षकांचा अखंड प्रयत्न असतो. अशा शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्येही उत्साह, आनंद, चैतन्य, अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत होत गेली तर, नवल ते काय? असे शिक्षक कुठून मिळवायचे आणि आजच्या शिक्षकांचे वर्तन सकारात्मक कसे करायचे, हे आपल्या समोरचे खरे आव्हान आहे!

    (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ या पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    By रश्मी परांजपेApril 14, 2026

    मागील लेखात आपण बालगटातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेतील खेळ…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 385
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 554
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.