Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 17:04 ; नक्षत्र : पुनर्वसु 18:13; योग : व्यतिपात 06:40, वरियान 27:37; करण : कौलव 27:52; सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 12:38; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अजा एकादशी श्रावणी सोमवार शिवपूजन / शिवामूठ – गहू वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक टीम अवांतर आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे रामोशी-बेरड समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादूजी खोमणे (नाईक) होते आणि ते पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. उमाजी हे लहानपणापासून चंचल, हुशार आणि धाडसी होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला 1857च्या उठावाने सुरुवात झाली, अशी नोंद आहे.…

Read More

अध्याय तेरावा सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥14॥ तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥891॥ उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥892॥ कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥893॥ किंबहुना जैसे पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥894॥ परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥895॥ पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 19:29; नक्षत्र : आर्द्रा 19:52; योग : सिद्धि 09:44; करण : वणिज 08:41, बव 30:16; सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै टीम अवांतर कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर या गावी…

Read More

आपल्या शरीरात रक्तामधील साखरेची पातळी किती आहे आणि ती दीर्घकाळात कशी बदलते, हे तपासण्यासाठी HbA1c  (Glycated hemoglobin – ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) ही टेस्ट सर्वात महत्वाची मानली जाते. HbA1c म्हणजे काय? HbA1c म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनशी जोडलेली ग्लुकोजची मात्रा. यातून मागील दोन ते तीन महिन्यांतील सरासरी शुगर लेव्हल कळते. त्यामुळे फक्त एका दिवसाची नव्हे तर, दीर्घकालीन नियंत्रणाची खरी माहिती मिळते. HbA1c रिपोर्ट कसा वाचावा? 5.7% पेक्षा कमी – सामान्य (Normal) 5.7% ते 6.4% – प्रीडायबेटिस (मधुमेह होण्याची शक्यता) 6.5% पेक्षा जास्त – मधुमेह डॉक्टर रुग्णाला औषधं, आहार किंवा जीवनशैलीतील बदल सुचवताना HbA1c चाचणीचा विशेष आधार घेतात. HbA1c का महत्वाचे आहे? रोजच्या शुगर टेस्टमध्ये…

Read More

अध्याय तेरावा सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13॥ आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥873॥ तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥874॥ आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणोनि जया । विश्वांघ्री नांव ॥875॥ पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगवेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥876॥ म्हणोनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूचां ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥877॥ जें सर्वांचिया शिरावरी । जे नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 14 भाद्रपद शके 1948; तिथि : नवमी 21:53; नक्षत्र : मृगशीर्ष 21:30; योग : वज्र 12:46; करण : तैतिल 11:04; सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ 10:17; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गोपाळकाला अश्वत्थमारुती पूजन शिक्षक दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखिका, कवयित्री आणि अनुवादक कविता महाजन टीम अवांतर मराठीतील एक उत्तम लेखिका, कवयित्री आणि अनुवादक असणाऱ्या कविता महाजन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1967…

Read More

अध्याय तेरावा ज्ञेयं यत तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते ॥ अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥12॥ तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥864॥ आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥865॥ जें जाणितलेयाचिसाठीं । संसाराची काढूनियां कांटी । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाचां ॥866॥ तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नावं जया ॥867॥ जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥868॥ रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती । तरि कोणें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 13 भाद्रपद शके 1948; तिथि : अष्टमी 24:13; नक्षत्र : रोहिणी 23:03; योग : हर्षण 15:43; करण : बालव 13:20; सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:52; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 श्रीकृष्ण जयंती (उपवास) जरा जिवंतिका पूजन कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक, समीक्षक शंकर सारडा टीम अवांतर साहित्यिक आणि समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म 4 सप्टेंबर  1937 रोजी महाबळेश्वर येथे झाला. मराठी साहित्यविश्वात…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 13 “राजेश आणि मी बिझनेस पार्टनर ह राजेशच्या दोन्ही भावांना बिजनेसमध्ये समान पार्टनरशिप पाहिजे होती. राजेशने मजबुरीने त्यांना नकार दिला, कारण त्यांना जर पार्टनरशिप दिली असती तर, त्यांनी सगळं काही जुगार आणि नशा करण्यात घालवलं असत. कोणत्या भावाला आपल्याच भावाचं आयुष्य खराब झालेलं पाहावंसं वाटलं असत. पण त्या दोघांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यादिवशी जेव्हा तो मीटिंगला जात होता, तेव्हा याच दोघांनी एका गुंडाला सुपारी देऊन त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणला. त्यांनीच स्वतःच्या भावाचा खून केला प्रॉपर्टीसाठी!” राहुल अग्रवालने विभाला माहिती दिली. “वाहिनी त्यानंतर त्या दोघांनी जाऊन माझ्यावर केस केली आणि माझ्यावर कपंनी बळकवण्याचा आरोप…

Read More

डॉ. किशोर महाबळ अगदी लहान वयापासून प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने आजूबाजूच्या आई-वडील, ताई-दादा आणि अन्य व्यक्तींचे आवाज आणि बोलणे, त्यांनी व्यक्त केलेल्या भावभावना, आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य छोट्या-मोठ्या घटना, असंख्य प्रकारचे छोटे-मोठे आवाज, सर्व विविध प्रकारचे गंध, लहान-मोठ्या आणि वेगवेगळ्या वजनाच्या अक्षरशः असंख्य वस्तू, वेगवेगळे आकार, विविध तापमान असलेल्या वस्तू किंवा रस, वेगवेगळे रंग, वेगवेगळे शब्द, पशू, पक्षी, झाडे असे मोजता येणार नाहीत आणि आपल्याला समजणार नाहीत, असे अक्षरशः जे जे दिसेल, ते ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. मोठ्यांना ज्या गोष्टी बिलकूल आवडत नाहीत, अशाही वस्तू, रंग, पदार्थ कसे आहेत, हे जाणून घेण्यात त्या बालकाला कोणताही संकोच वाटत नाही! झोपेची वेळ…

Read More