दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 27 आश्विन शके 1948; तिथि : अष्टमी 10:51; नक्षत्र : उत्तराषाढा 15:37;
- योग : धृति 24:33; करण : बालव 23:54;
- सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:14;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दुर्गाष्टमी
महाष्टमी उपवास
आयुध पूजन
सरस्वती विसर्जन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
गीतकार शांताराम नांदगावकर
टीम अवांतर
प्रसिद्ध कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1936 रोजी कोकणातील कणकवली येथील नांदगाव येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमधील परळ येथे रहायला आले. त्यामुळे शांताराम यांचे शालेय शिक्षण परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. शीघ्र कवी म्हणून देखील त्यांची ओळख होती. पहिली कविता लिहिली तेव्हा ते दहावीत होते. शाळेचा अभ्यास करताना त्यांना दिव्याच्या ज्योतीवर कविता सुचली. ‘का उगा पतंगा जळसी?’ ही कविता त्यांची पहिली कविता ठरली.
1979 साली प्रदर्शित झालेल्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्यांमुळे नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रीम’ मध्ये आले. अष्टविनायक’नंतर सचिन पिळगावकर यांच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण यांच्यासोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली.
हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026
‘गंमत जंमत’ या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्याकडून मराठी गाणे गाऊन घ्यायचे असा निर्णय झाला. मात्र ‘माझ्यासारख्या अमराठी व्यक्तीला मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो,’ असे कारण सांगून किशोर कुमार यांनी गाण्यासाठी नकार दिला. तेव्हा ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी हे गाणे गाऊन धमाल उडवून दिली.
नांदगावकरांनी 70 आणि 80 अशा दोन दशकांमध्ये एक सिद्धहस्त गीतकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वलय निर्माण केले होते. दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, प्रभाकर जोग, अशोक पत्की, अनिल मोहिले, अरुण पौडवाल यांसारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. ‘रजनीगंधा’, ‘बंदिनी’, ‘बकुळीच्या तळी’, ‘सजल नयन’ अशा लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांमधील गाणी नांदगावकर यांनीच लिहिली होती. ज्यांना अतिशय लोकप्रियता मिळाली.
‘सूर सनईत नादावला’, ‘हे सावळ्या घना’, ‘विसर प्रीत विसर गीत’, ‘तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला’ यांसारखी भावविभोर गीते किंवा ‘येऊ कशी प्रिया’, ‘रुपेरी वाळूत’, ‘अनुरागाचे थेंब झेलती’ ‘धुंदित गंधित होऊनी सजणा’ अशी अल्लड प्रेमगीते तर ‘ससा तो ससा’, ‘बे एके बे’ ‘चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची’ ही सहजसोपी बाळबोध बालगीतेही लिहिली. भक्तिरसपूर्ण अशा ‘हरीनाम मुखी रंगते’, ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘प्रभू मी तुझ्या करातील वीणा’ या रचनाही त्यांनी केल्या. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या ‘जीवनाच्या क्रीडांगणी’ या अल्बममधील ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ सारखे गाणेही नांदगावकर यांच्याच लेखणीतून उतरले आहे.
1987 साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘दलितांचा राजा’ या अल्बमसाठी अप्रतिम अशी गाणी देखील त्यांनी लिहिली. नवी दिल्ली येथे 1974 साली ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून नांदगावकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘सूरसिंगार’चा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. 1985 मध्ये नांदगावकर यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लढली होती. या निवडणूकीमध्ये ते जिंकून देखील आले होते. 11 जुलै 2009 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळायला लागेल. कामात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतील. व्यावसायिकांना प्रगतीचे मार्ग दिसतील, परंतु आर्थिक लाभासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज भासू शकते. चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घ्या. सुज्ञ निर्णयांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
वृषभ – आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात, याशिवाय आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. व्यावसायिक आपला व्यवसाय किंवा गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकतात. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करण्याऐवजी, आपल्या अनुभवावर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. संभाषणात संयम राखणे आज फायदेशीर ठरेल.
मिथुन – आजचा दिवस दिलासा देणारा आणि आनंदाची बातमी देणारा असा असू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला कठीण परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करेल. मानसिक चिंता हळूहळू कमी होईल. व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. प्रवासातून फायदा होऊ शकतो. फक्त आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण अगदी लहान गोष्टींचाही तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
कर्क – एखादी चांगली बातमी आजचा दिवस खास बनवू शकते. जीवनात सुखसोयी आणि समृद्धी वाढण्याची चिन्हे आहेत. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी मात्र स्वतःच्या धोरणात बदल करावा लागू शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटणे किंवा महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते. नवीन व्यावसायिक गुंतवणुकीबाबत संयम बाळगणे उत्तम राहील. घाईने घेतलेला निर्णय समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. कामासोबतच, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, अनावश्यक ताण टाळा.
सिंह – आजचा दिवस आर्थिक लाभ आणि मानसिक शांतीच्या दृष्टीने शुभ संकेत घेऊन येणारा आहे. दीर्घकाळापासूनची चिंता कमी होऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्या दृष्टीने नियोजन आणि आवश्यक तयारी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या मदतीने रखडलेले प्रकल्प पुढे नेण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ नियोजनावर समाधानी राहू नका. वेळेवर कृती करणे आणि सक्रिय राहणे तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाईल.
कन्या – कामाच्या ठिकाणी आज अनुकूल परिस्थिती असेल. सर्व कामे तुम्ही उत्साहाने आणि एकाग्रतेने पूर्ण कराल, ज्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांनी नफा वाढवण्यासाठी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले पाहिजेत. इतरांचे सल्ले जरूर ऐका. मात्र आपली स्वतःची मते लादण्याचा आग्रह टाळा. आज सहकार्य आणि नम्रतेने काम केले, तर अनेक कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात.
तुळ – आज आर्थिक परिस्थिती समाधानकारक असू शकते, परंतु काही बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नोकरदार जातकांनी नोकरीतील कोणताही बदल पुढे ढकलावा आणि सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ घ्यावा. विरोधकांनी निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा, कारण अगदी लहानसा निष्काळजीपणादेखील नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. मुख्य कामावर लक्ष केंद्रित करा. विचारपूर्वक केलेली कृती तुम्हाला अनावश्यक त्रासांपासून वाचवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक – आज आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात तसेच कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होऊ शकते. बऱ्याच काळापासून गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून एखाद्या योजनेवर काम करत असाल, तर आता तुम्ही ती अंमलात आणण्यासाठी पावले उचलू शकता. व्यवसाय वाढवण्यासाठीही आजचा दिवस अनुकूल असू शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी इतरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यासंदर्भात संपूर्ण माहिती गोळा करा.
हेही वाचा – Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!
धनु – आज आपल्या वागणुकीत आणि आर्थिक निर्णयांमध्ये विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विचार न करता कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण यामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या कारणावरून कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यावेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी, आपले विचार शांतपणे मांडा. पूर्ण करण्यास कठीण असलेली आश्वासने देऊ नका. व्यवसायात नफा कमी होऊ शकतो आणि काही कामांमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. संयम बाळगा आणि संघर्ष टाळून आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा.
मकर – आजचा दिवस शिस्त आणि योग्य नियोजनाने पुढे जाण्याचा आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तुमच्या काही चिंताही कमी होतील. व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात, मात्र त्यांनी योग्य माहितीनंतरच निर्णय घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या संघटितपणे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. संभाषणादरम्यान आपले शब्द काळजीपूर्वक निवडा, कारण तुमच्या कोणत्याही शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. कामाच्या व्यस्ततेत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ – आज कौटुंबिक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. घरातील सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी, प्रकल्पांवर आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे हार मानू नका. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा. रागावर नियंत्रण ठेवल्यास नातेसंबंध आणि काम या दोन्हीमध्ये संतुलन राखले जाईल.
मीन – आजचा दिवस आर्थिक लाभाची चिन्हे घेऊन येत आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्याने भविष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतात. सामाजिक आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठीही आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. मात्र इतरांशी संवाद साधताना आपल्या शब्दांबाबत विशेष काळजी घ्या, कारण नकळतपणे केलेल्या एखाद्या टिप्पणीमुळे कोणीतरी नाराज होऊ शकते. काम पुढे ढकलण्याची सवय सोडा आणि आपली जबाबदारी वेळेवर पूर्ण करा. तुमचा संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे परिस्थिती सुधारू शकते.


