Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    आशू आणि अधीर

    October 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fourteen, चौदावा अध्याय, अध्याय चौदावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय चौदावा

    ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥18॥

    तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें । ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ॥271॥ इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे । तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं ॥272॥ तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें । जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ॥273॥ आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥274॥ एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ॥275॥ पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ॥276॥ जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे । तैं हारी जैत होईजे । आपणचि ॥277॥ तैसे मध्योर्ध्वअध । हे जे गुणवृत्तिभेद । ते दृष्टीवांचूनि शुद्ध । वस्तुचि असे ॥278॥

    नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति । गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥19॥

    परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो । परिसें तें सांगतसों । मागील गोठी ॥279॥ तरी ऐसें निजनिजें । सामर्थ्यें तिन्ही सहजें । होती देहव्याजें । गुणचि हे ॥280॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    अर्थ

    सत्त्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी (स्वर्गादि लोकी) जातात, रजोगुणी पुरुष मध्येच (मनुष्यलोकी) रहातात. निंद्यगुणी (तमोगुणी) पुरुष अधोगतीला (पशुपक्ष्यादिकांच्या जन्माला) जातात. ॥18॥

    त्याप्रमाणे सत्त्वाच्या उत्कर्षामध्ये त्यांचे जगणे व मरणे असते, ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. ॥271॥ याचप्रमाणे जे रजोगुणाने जगतात व मरतात ते मृत्युलोकात मनुष्य होतात. ॥272॥ त्या मृत्युलोकात सुखदु:खाची खिचडी, देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. व जेथे (ज्या मृत्युलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर) मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही. ॥273॥ व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाच्या उत्कर्षात जे मरतात, ते नरकभूमीला जाण्याचा दाखला घेतात. ॥274॥ अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्त्वादि तिन्ही गुण ऊर्ध्वादि गतींना कसे कारण आहेत, हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले. ॥275॥ वस्तु ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तु (विस्मृतीने) आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते. ॥276॥ आपल्यावर परचक्र आले आहे, असे ज्यावेळेस राजा स्वप्न पाहतो, त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी घडलेला जय अथवा पराजय तो आपणच होतो, (त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे), ॥277॥ त्याप्रमाणे (वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे) उत्तम गति, मध्यम गति व अधोगति हे गतीचे भेद गुणवृत्तींच्या भेदामुळे आहेत. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तु शुद्ध आहे तशीच आहे. ॥278॥

    ज्या वेळी पुरुष (गुणाचा) द्रष्टा होऊन (गुणांवाचून) इतर दुसरा कर्ता नाही असे जाणतो व गुणांहून वेगळा जो (आत्मा) त्याला जाणतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मत्स्वरूप त्याप्रत पावतो. ॥19॥

    परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले, असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो. ऐक. ॥279॥ तर हे तिन्ही गुणच, आपल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावत:च देहाच्या निमित्ताने होतात. (देहच बनतात) ॥280॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तामस कर्म जितुकें, अज्ञानफळेंचि पिके

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : तामस कर्म जितुकें, अज्ञानफळेंचि पिके

    October 17, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026 अध्यात्म

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तामस कर्म जितुकें, अज्ञानफळेंचि पिके

    By Team AvaantarOctober 17, 2026

    अध्याय चौदावा कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥16॥ येणेंचि…

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    October 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    आशू आणि अधीर

    October 17, 2026

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026

    वयोमानानुसार रोज किती चालावे?

    October 17, 2026

    दसरा, सरस्वती पूजन, रावणदहन आणि आपण…!

    October 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 474
    • अवांतर 217
    • आरोग्य 160
    • पंचांग आणि भविष्य 634
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 999
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    आशू आणि अधीर

    October 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.