Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
प्रमोद मनोहर जोशी आपल्या मनात आपल्या आजीचं एक कल्पनेतलं आदर्श असं चित्र नक्की कसं असू शकेल ते आज फेसबुकवर पाहिलेल्या या छायाचित्रात बघून वाटलं. या आजी नेमक्या कोण? यांना मी ओळखत नाही, पण त्यांचं ते सात्विक सोज्वळ निरागस आणि सुमधुर हसू असणारं रूप बघून मला ही कविता सुचली. आपलं वार्धक्यातील रूप देखील अतिशय दिमाखात मिरवणारी एक वृद्ध स्त्री म्हणून या आजी मला जास्त भावल्या आणि अगदी आपसूकच ओळी कागदावर उतरल्या… सीमेपल्याडही वार्धक्याच्या अजून भासशी चिरतरुणी तू वदनावरती प्रसन्नता अन् ओठांवरती मधाळ हासू !! सोसलेच असशील तूही ग अडीअडचणी ऊन उन्हाळे कधी काळोख्या रातीमधली कडाडणारी खिन्न वादळे उभी राहुनी तशीच कणखर…
मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला गेल्या 30 वर्षांत एकदा नव्हे तर, दोनदा पायरी चढावी लागली. कारण किरकोळ होते; पण हे दोन्ही अनुभव भन्नाट होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट. त्यातही आपले पोलीस काय करू शकतात! तसेच, न्याययंत्रणा प्रत्यक्षात कशी चालते, याचा ‘याचि देही याची डोळा’ अनुभव घेतला. भाग -1 लोकमतमध्ये काम करीत असताना माझे ऑफिस चिंचपोकळीवरून नवी मुंबईच्या सानपाड्याला शिफ्ट झाले. त्यामुळे 2006 ते 2009 अशी चार वर्षे मी विरार ते सानपाडा आणि परत असा प्रवास करीत होतो. तीन गाड्या बदलून ऑफिसला जात होतो आणि तीन गाड्या बदलून घरी येत होतो.…
यश:श्री आग्रा येथील ताजमहालचे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षण आहे. स्थापत्यशास्त्राचा हा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. मुगल बादशाह शहाजहाँ याने जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल बांधून घेतला. कलारसिक असलेल्या शहाजहाँने कलाकार आणि कलेला राजश्रय दिला. या ताजमहालप्रमाणेच त्याचे सिंहासन देखील त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. भारतीय परंपरेनुसार भारतातील राजेमहाराजे सिंहासनावर बसून राज्यकारभार चालवित होते. परंतु शहाजहाँ मोराच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. म्हणून परांपरागत सिंहासनाला दूर करत त्याने मयुरासन बनवून घेतले. हेच ते तख्त-ए-ताऊस! थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा याविषयीचा एक लेख वाचनात आला होता. मोराला फारशी भाषेत ‘ताऊस’ म्हणतात. म्हणून त्या आसनाला ‘तख्त- ए- ताऊस’ म्हटले जात होते. या आसनावरील…
चंद्रशेखर माधव मी पुण्यात पर्वती परिसरात रहातो. आमच्या इमारतीच्या मागेच पर्वती टेकडी आहे. एकूण परिसर हवेशीर आणि निसर्गरम्य आहे. पण परिसर तसा मोकळा असल्याने पहिल्यापासूनच भुरटे चोर वगैरे येण्याचे प्रमाण जरा जास्त आहे. साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वीची, म्हणजे 2007-2008मधील घटना असेल. मध्यरात्री पावणेबाराचा सुमार होता. माझ्या घराच्या मागच्या खोलीमध्ये बाहेर जाण्याचा अजून एक दरवाजा आहे. त्या दरवाजाला कडी लावली आहे की नाही, हे पहात असताना माझ्या असं लक्षात आलं की, बाहेरील लोखंडी दरवाज्याला एक माणूस कडी लावत आहे. लक्षात आल्यानंतर मी हळूच पत्नीला खूण करून शांत राहण्याला सांगितलं आणि तिला खुणेनेच सांगितलं की, बाहेर कुणीतरी आहे आणि मी मुख्य दरवाजाने बाहेर…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आलेय तुमच्या भेटीला! वांद्रे येथे संध्याकाळी एक इव्हेंट होता. छान तयार होऊन निघाले होते. म्हटलं, चला कॅब बुक करुयात. पण बुकच होईना! त्यात ‘गुगळीण मावशी’ प्रवासाचा वेळही खूप दाखवत होती. मग उत्तम आणि जलद पर्याय निवडला. रिक्षा केली आणि कांदिवली स्टेशन गाठलं. लोकल ट्रेनमध्ये बसून वांद्र्याला गेले. ट्रेनमध्ये नेहमीचे एंटरटेन्मेन्ट… ‘अय्या तुम्ही’, ‘अमुक एका सीरियलमधलं तुमचं काम’, ‘तुमचा तो शो’, ‘तुमचं दिसणं’ आणि मग सेल्फी… यात वांद्रे कधी आलं ते कळलंच नाही. स्टेशनवरून रिक्षा केली आणि इव्हेंटचं ठिकाण गाठलं. दोन-तीन तास छान गेले. ओळखीची खूप माणसं भेटली. रीफ्रेश झाले आणि घरी यायला निघाले.…
आराधना जोशी आपल्या आठवणींचं एक मानसशास्त्र असतं. एखादी आठवण ही रंग, गंध, चव, स्थळ, व्यक्ती याच्याशी निगडीत असतेच असते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारी काही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागलं तर, जीव नकोसा होतो. मात्र याच तळपत्या उन्हात काल अचानक मोगऱ्याचा गंध आला आणि जीव सुखावून गेला, उन्हाच्या झळा जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या आणि अनेक आठवणींना उजाळा देऊन गेला. होलिकोत्सवाच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये पुरणपोळ्यांचा बेत आखला जातो. पुरण शिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत आणि त्यात वेलची, जायफळ पावडर, केशर, गूळ यांचा जो काही वास घरामध्ये दरवळतो त्याच्याशीही अनेकांच्या आठवणी निगडीत असतील. याच उन्हाळ्यात घरी आणल्या जाणाऱ्या कैऱ्या, आंबे यांच्या वासाशी…
दिप्ती चौधरी घरातील माणसे 22 एप्रिलला निघणार होती, त्या आधीचे 20 आणि 21 हे दोन दिवस खूप गडबडीत आणि घाईत जाणार होते. प्रवासासाठी करावी लागणारी RTPCR चाचणीसाठी सकाळी लवकरची वेळ आगाऊ घेऊन ठेवली होती. पण तिथेही मोठी रांग लागली होती. आई घरी येऊन आम्हाला आणि दिदीला हॉटेलमध्ये सोडून परत घरी येणार होती, कारण अमेरिकेच्या सामानाची बांधाबांध करायला पॅकर येणार होते. चाचणीला इतका उशीर झाला की, पॅकर येऊन दाखल झाले तरी आम्ही घरी पोहोचलो नव्हतो! धावतपळत घरी पोहोचलो… बॅगा भरून ठेवल्या होत्या आणि कलोनजी येऊन थांबली होती, त्यामुळे आम्हाला पकडून आई हॉटेलमध्ये सोडणार होती. आम्हाला दोघांना एकत्र कुठे घेऊन जायचे तर,…
हर्षा महाबळ देशपांडे लहानपणी आजीने बक्षीस म्हणून दिलेली रावळगावची गोळी… एखादं चांगलं काम केलं म्हणून आईने लाडाने केलेला शिरा… बाबांची पाठीवर मिळालेली शाबासकी… बहिणीला प्रोजेक्टमध्ये मदत केल्यावर तिच्या डोळ्यात दिसलेली चमक… आपल्यावर टाकलेली एखादी जबाबदारी नीट पार पाडल्यावर शाळेतल्या शिक्षकांकडून मिळणारी कौतुकाची थाप… मैत्रिणीने आपल्यासाठी ओंजळीत आणलेली बकुळीची फुले… आपल्याला आवडतं म्हणून सुट्टीत हॉस्टेलमधून घरी गेल्यावर शेजारच्या काकूंनी करून आणलेली त्यांच्या हातची भाजी… आपल्या लाडक्या ताईसाठी शोधून शोधून आणलेलं पुस्तक तिला देताना तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव… लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असायचा नाही! खूप महागाची वस्तू बक्षीस मिळण्याचे दिवस नक्कीच नव्हते. न तेव्हा कोणाकडे इतके पैसे खर्चायला असायचे… पण…
मनोज जोशी विरार ते दादर (ऑफिस) असो किंवा दादर ते विरार (घर) असो, मी शक्यतो स्टॅण्डिंग प्रवास करावा लागणार नाही, हे पाहतो. मग भलेही घरातून लवकर निघावं लागलं तरी बेहत्तर किंवा दादरहून चर्चगेटला जावं लागलं तरी, तसं मी करतो. वृत्तपत्रात काम करताना हा प्रश्न फारसा भेडसावत नसे. कारण दुपारची गाडी पकडायची… तीही शक्यतो दादर आणि येताना रात्री 12.20 किंवा 12.40 गाडी पकडली की, बसायला मिळत होते. तरीही जरा लवकर गेलो तर, एखादी बोरिवली किंवा भाईंदर लोकल पकडायची आणि कांदिवलीला उतरायचे. त्यानंतर येणारी विरार लोकल पकडायची. जेणेकरून दादर ते कांदिवलीचा प्रवास छान बसून व्हायचा आणि विरार ट्रेनमध्ये बहुतांश वेळा बोरिवलीला बसायला…
मानसी देशपांडे “पार्टनर…” नावातच सारं काही सामावलेलं आहे. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असलेल्या विवाहामुळे दोन कुटुंबं एकत्र येतात. आयुष्याचे सार समजावणाऱ्या व.पु. काळे यांनी पार्टनर किंवा जोडीदार या विषयावर खूप प्रेरक असे लिखाण केले आहे. माणूस म्हटलं की चूक ही आलीच, पण तीच चूक चारचौघात न सांगता, तिथे त्या चुकीचा ऊहापोह न करता जी एकांतात समजावून सांगणारी व्यक्ती म्हणजे पार्टनर… मुळात प्रेमविवाह असो किंवा ठरवून झालेला विवाह असो, त्यामध्ये प्रेम असणे महत्त्वाचं नाही का!! कारण, व.पुं.च्या मते “प्रेम केल्यानेच प्रेम समजतं.” सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याजवळ मनाची श्रीमंती असते तो श्रेष्ठ. कारण, विवाह ही एक मोहरून टाकणारी अनुभूती असते. त्यामुळे प्रत्येक…

