Author: Team Avaantar

दिप्ती चौधरी दरवाजा उघडल्याबरोबर मला समोरच धुवून वाळत घातलेले आमचे मोठे पिंजरे दिसले! मग काय माझी पाचावर धारण बसली… मला वाटले दिदी पुन्हा आम्हाला पिंजऱ्यात घालते की काय? जीवाच्या आकांताने मी प्रतिकार केला आणि दिदीच्या डोक्यावरून उडी मारून पसार झालो! बरं, मी जी धाव घेतली ती सरळ मागच्या अंगणाच्या एका बाजूला जिथून जाळी होती, तिच्या खालून सटकून मी घराला वळसा घालून पुढच्या अंगणात आलो. तिथे काही कुंपण वगैरे नाही… त्यामुळे सरळ समोरच्या मुख्य रस्त्यावर आलो! आता इकडून पळ काढला तर सरळ महामार्गावर पोहोचलो असतो, पण नशिबाने रस्त्यावर पळण्याऐवजी मी घराबाजूच्या झुडपात लपायचे ठरवले. झुडपाच्या मागे भिंतीच्या बाजूला मी आणि समोर…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी येता आठवडा हा संमिश्र राहील. संभाषणात अथवा बोलताना आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या. घरातल्या गोष्टींमध्ये मन उत्तम रमेल. परदेशगमनाचे योग येऊ शकतात. स्त्रियांनी आलेला पैसा राखून ठेवण्याकडे कल ठेवावा. मेष राशीच्या सर्वांनीच उष्णतेचे विकार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वृषभ राशी या आठवड्यात छोट्या प्रवासाचे अनेक योग येऊ शकतात. आपले विचार शब्दांतून प्रभावीपणे व्यक्त करण्याचा उत्तम काळ. मित्र, भाऊ, बहीण यांच्या सुखदायी भेटी होण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. लहान मुलांसाठी अभ्यास आणि शिक्षणाचे आराखडे तयार करण्यासाठी उत्तम काळ ठरू शकतो. मिथुन राशी बोलणे आणि आहार याबाबतीत संयम…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) साधारण 1982-83 साल असावं, तेव्हाची ही घटना… अजूनही आठवली तरी अंगावर भीतीने अंगावर काटा येतो. आम्ही नुकतीच नवीन स्कूटर घेतली होती. जरा लांबची सफर करावी, या उद्देशानं आम्ही उभयतां ठाण्याहून डोंबिवलीला माझ्या आत्येभावाकडे गेलो. सबंध दिवस त्याच्याकडेच मुक्कामाला होतो. संध्याकाळी निघायला जरा उशीरच झाला. तारुण्याचा जोश होता, मस्ती होती. स्कूटर जरा वेगातच होती. साधारण, मुंब्रा-कळवा यांच्यामध्ये असू… भोवताली मिट्ट काळोख… लोकवस्तीही अगदी तुरळकच… स्कूटरच्या हेडलाइटच्या प्रकाशातच मार्गक्रमण सुरू होते. रस्ता पूर्णत: खडबडीत, कोणास ठाऊक कशी पण स्कूटर जोरात हिसका बसून रस्त्यावरून घसरली. आम्ही उभयतां दूरवर फेकले गेलो. मी सावध होते, पण मुका मार लागला होता. तशीच…

Read More

सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन शक्तिपीठे आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. किरीट शक्तिपीठ – लालबाग, पश्चिम बंगाल; शीरोभूषण किरीट (जगन्नाथ पुरी, ओडिशा) शक्ती – विमला / भुवनेश्वरी, भैरव – कोट / संवर्त. कात्यायनी शक्तिपीठ – भुतेश्वर, वृंदावन, मथुरा; केसकलाप. शक्ती – कात्यायनी, भैरव – भूतेश करवीर शक्तिपीठ – कोल्हापूर, महाराष्ट्र. त्रिनेत्र. शक्ती – महिषासूरमर्दिनी, भैरव…

Read More

यश:श्री प्राचीन काळापासून कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही भारताच्या प्राचीन संस्कृतीचे ते अभिन्न अंग आहे. त्याचा विशेष हा आहे की, दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हस्तीदंत, लाकूड, काच आणि विविध धातूंमध्ये केलेल्या कलाकुसरीत बहुतांशी मोराची प्रतिमा बनविली जाते. बंगालमध्ये मयुरपंखी नौकांच्या अनेक कहाण्या आहे. तेजावूर तसेच दक्षिणमधील धातूच्या वस्तू बनविणाऱ्या केंद्रांमध्येही मोराचा वापर केला जातो. तेथे दिव्यामध्ये मोर बसविण्यात येतो. हा पवित्र पक्षी असल्याने मंदिरातील या दिव्यांमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 1985-86 सालातली गोष्ट असावी. मी पाचवी किंवा सहावीत होतो. आम्ही, (आम्ही म्हणजे मी, आई-वडील आणि भाऊ) आसामच्या सहलीला गेलो होतो. आमचे काका सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गुवाहाटीमध्येच स्थायिक झाले होते. आसाममध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे बरीचशी आहेत. एकूणच उत्तर-पूर्व (ईशान्य) भारताला निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे. पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करणार असल्यामुळे आम्ही दोघेही भाऊ खूप उत्साहात होतो. त्याकाळी पुण्याहून गुवाहाटीला थेट रेल्वे नव्हती. त्यामुळे इथून मुंबई, मुंबईहून गुवाहाटी आणि त्याच मार्गे परत असा एकूण प्रवास ठरला होता. आसाममध्ये गेल्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, कामाख्या मंदिर, शिलाँग अशी ठिकाणे बघायचा प्लॅन आधीच ठरला होता. एकूण मिळून आमची…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) माणसाचे आयुष्य एका खळखळत्या झऱ्यासारखे प्रवाह कसे बदलेल ते सांगताच येत नाही. 1960च्या दशकात नासिकसारख्या छोट्या शहरात लहानपण घालवताना अगदी सर्वसामान्य perception नुसार, पोलीसांपासून चार हात दूर रहावे, त्यांची दोस्तीही वाईट तर दुश्मनीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विचार. अभ्यासात बरा असल्याने मुंबईत जाऊन Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात 10 वर्षं ट्रेक्स, स्नो स्किईंगचे दोन कोर्स केले. मुंबई, पुणे, नासिक या त्रिकोणातच खासगी नोकरी तसेच छंद यात मश्गुल असतानाच मुंबईत आक्रित घडले आणि नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ वयाच्या अवघ्या…

Read More

आराधना जोशी 1999 सालचा एक रविवार… रविवार असूनही त्या दिवशी मुंबईत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. अल्फा मराठीसाठी (आताचे झी मराठी) काम करणारे सगळेच रिपोर्टर त्यावेळी फिल्डवर काम करत होते. खरंतर, रविवारच्या दिवशी एवढं काम आणि त्याचं वार्तांकन, तोपर्यंतच्या माझ्या नोकरीत कधीच बघितलं नव्हतं. मी स्वतः त्या दिवशी जवळपास पाच घडामोडींचे रिपोर्टिंग करून साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता ऑफिसला पोहोचले. संध्याकाळच्या सातच्या बातमीपत्रासाठी कोणत्या बातम्या लगेच पाठवायच्या आणि कोणत्या बातम्या रात्री 9 वाजताच्या बातमीपत्रात घ्यायच्या, याबद्दल बुलेटिन प्रोड्युसरशी बोलणं सुरूच होतं; आणि आमच्या पॉलिटिकल बीट कव्हर करणाऱ्या मंदार परबने अचानक मला बोलावून घेतलं. हातात एक निमंत्रणपत्रिका देत “हा एक कार्यक्रम आहे, आता…

Read More

दिप्ती चौधरी सुरवातीस दोन दिवस आम्ही कॅटरीमध्ये घाबरून होतो, पण नंतर सरावलो. डॉ. इरफान सतत आई आणि बाबांच्या संपर्कात होतेच. त्यांनी प्रयत्नपूर्वक आम्हाला त्या वातावरणाची सवय करून दिली. नंतर आम्ही त्यांना लाड पण करू द्यायला लागलो. आमच्या चाटायच्या पाण्याच्या बाटल्यामधून आम्हांला पाणी प्यायला शिकवा, अशी विनंती आईने केली होती. तर, त्यांनी आम्हाला नळावर पाणी प्यायला शिकवले. मला काही ते आवडत नाही, पण दानूला मात्र ते भारी आवडलं! बाटल्या राहिल्या बाजूला आणि हे महाशय हेच शिकून गेले. पुढे अमेरिकेला गेल्यावर त्याने आईला सरळ स्पष्ट केले की, मी आता वाटीतून पाणी पिणार नाही… स्वयंपाघरातील नळावर महाशय रोज सत्याग्रहला बसायचे आणि आईच्या कामाचा…

Read More

मनोज जोशी दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शॉर्ट्स बघत असताना ‘कपिल शर्मा शो’मधील एक सीन दिसला. कपिल शर्माच्या समोर मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय बसल्या होत्या. एका पाठोपाठ एक असे प्रश्न कपिल विचारत होता आणि रीनाच्या आधी मौसमीच ते प्रश्न पटापट टोलावत होती. त्यात त्याने एक प्रश्न केला, असा कोणता हीरो होता की त्याला बघायला सर्वात जास्त गर्दी व्हायची. मौसमीने काका अर्थात राजेश खन्नाचं नाव घेतलं. तर, रीना लगेचच विनोद खन्ना म्हणाली… त्यावरून मला विनोद खन्ना गेला तो दिवस आठवला. 27 एप्रिल 2017… त्या दिवशी, ‘ती’बातमी अखेर खरी ठरली! महिन्याभरापूर्वी म्हणजेच मार्च 2017मध्ये विनोद खन्ना याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या, पण अतिशय किरकोळ…

Read More