दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 06 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 27 जून 2025, वार : शुक्रवार, तिथि : द्वितीया 11:19, नक्षत्र : पुनर्वसू 07:21
योग : व्याघात 21:09, करण : तैतील 22:31
सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
जगन्नाथ रथ यात्रा
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरदार व्यक्तीची काम करण्याची शैली आणि नेतृत्व पाहून प्रत्येकजण प्रभावित होईल. व्यवसायात नवीन भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील. मात्र संपूर्ण दिवस अत्यंत व्यग्र असेल. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तम प्रगती होईल.
वृषभ – कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे बजेट सांभाळणे कठीण होईल. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. एखाद्या अतिथीचा पाहुणचार करावा लागेल.
मिथुन – नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस आहे. छोट्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कामात स्थैर्य राहील. अनावश्यक खर्च टाळा. संततीच्या सहवासाकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, समस्या उद्भवू शकते. विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने नवी दिशा मिळू शकते.
कर्क – कामात अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. त्यामुळे संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर मन एकाग्र करणे कठीण जाईल.
सिंह – पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून बचत करण्याबाबत उत्तम सल्ला मिळेल. दुसऱ्यांना मदत करण्याची सवय एखाद्या संकटात टाकेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग रहा. संवादातून एखादी महत्त्वाची टीप मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.
कन्या – स्वत:चा अभिमान वाटेल अशा गोष्टी घडतील. जोडीदार / भागीदाराचा एखाद्या कामात पाठिंबा मिळेल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी अंतर्मनाचा आवाज ऐका. कर आणि विमाविषयक कामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ!
तुळ – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक दृष्टीने चांगला दिवस असेल. गुंतवणूक योजनेतून धनप्राप्ती होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. अचानक कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा प्लॅन फसू शकतो.
वृश्चिक – गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मात्र, त्यासाठी योग्य सल्ला घ्या. घरी सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. कामाच्या ठिकाणी प्रभाव पाडाल. त्यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. जे स्वत:ला मदत करतात त्यांना देवही मदत करतो, याची प्रचिती येईल. आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल.
धनु – घरातील तणावामुळे चिडचिड कराल. या तणावांमुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून योग्य उपचारांनी त्यावर मात करा. नकारात्मक विचार मनात आणू नका. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, पण त्याचा वरिष्ठांवर परिणाम होणार नाही. मित्र-मैत्रिणींसोबतचा संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल.
मकर – दिवस आनंदात जाईल. मात्र त्यासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. नातेवाईकांकडून कर्ज घेतले असेल तर, कुठल्याही परिस्थितीत ते परत करावे लागू शकते. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तरी त्यात रस दाखवू नका. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.
कुंभ – आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. त्यामुळे उत्साहात असाल. मात्र, खूप आनंदी असणे कधी कधी नव्या समस्यांना जन्म देतात. उत्तम प्रकारे बचत करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आयुष्यातील सर्वात आवडत्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. कामामुळे वरिष्ठ प्रभावित होतील.
मीन – मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी खास प्रयत्न करा. आर्थिक आघाडीवर सुधारणा होईल. काही व्यक्ती जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देतील, परंतु काम होईल याची अपेक्षा ठेवू नका. मेहनत केली तर, यश निश्चित मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल.
हेही वाचा – नातवंडांचे वजन करणारे आजोबा!
दिनविशेष
फिल्ड मार्शल जनरल माणेकशॉ
स्वतंत्र भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून ओळख असणाऱ्या जनरल सॅम माणेकशॉ यांचा आज स्मृतीदिन. पंजाबमधील अमृतसर येथे 3 एप्रिल 1914 रोजी सॅम यांचा जन्म झाला. डॉक्टर असलेल्या आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध सॅम 1932मध्ये तत्कालीन ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धातील त्यांची कामगिरी नजरेत भरणारी होती. दुसरे महायुद्ध, 1947चे भारत-पाकिस्तान युद्ध, 1962चे भारत-चीन तर 1965 तसेच 1971चे भारत-पाकिस्तान युद्ध अशा सगळ्याच युद्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. 1969 ते 1973 या काळात भारताचे लष्करप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माणेकशॉ यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच शौर्याचा गौरव म्हणून 1 जानेवारी 1973 रोजी त्यांची फिल्ड मार्शल या पदावर नियुक्ती झाली. 1968मध्ये पद्मभूषण तर 1972मध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 27 जून 2008 रोजी न्यूमोनियामुळे त्यांचे निधन झाले. 2023मध्ये त्यांच्या आयुष्यावर आधारित सॅम बहादूर हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.