Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 8, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 17 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 13:59; नक्षत्र : रोहिणी 16:51;
    • योग : ध्रुव 09:01, व्याघात 29:37; करण : बव 24:33;
    • सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ 27:48; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ग्रामीण कथालेखक, कथाकथनकार शंकर पाटील

    टीम अवांतर

    ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, चित्रपट कथालेखक आणि आपल्या कथाकथनाने एक काळ गाजवणाऱ्या शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे निसर्ग, शेती, शिवारं, माती, गुरंढोरं आणि या सगळ्यांशी माणसाचं असणारं नातं हे विषय त्यांच्या साहित्यकृतीत मध्यवर्ती होते.

    बी.ए. झाल्यावर बी.टी. करून शंकर पाटल यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला. 1949 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली असली तरी त्यांचा पहिला कथासंग्रह वळीव 1958 मध्ये प्रकाशित झाला. 1959 मध्ये एशिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित ‘टारफुला’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली.

    पुढे 18 कथासंग्रह, 2 कादंबऱ्या, 4 वगनाट्ये, एक ललितसंग्रह आणि पन्नासएक चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद यांचे लेखन असा त्यांचा साहित्यिक प्रवास झाला. वळीव ते ऊनपर्यंत प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला त्या त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याची परितोषिके मिळाली. त्यांच्या कथांचे अनेक भारतीय तसेच पाश्चात्त्य भाषांमध्ये अनुवादही झाले. ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘गणगौळण’, ‘भोळीभाबडी’, ‘चोरीचा मामला’ या चित्रपटांच्या उकृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. त्यांचे ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य प्रचंड गाजले आणि त्याचे दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. याशिवाय ‘गल्ली ते दिल्ली’ आणि ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ ही वगनाट्येही लोकप्रिय झाली होती.

    हेही वाचा – उपवास

    केवळ लेखनातच नव्हे तर पाटील यांच्या कथाकथनातून अनेक पात्रे जिवंत होत, ती ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर तंतोतंत  उभी राहात. कथाकथनात अनेक व्यक्तिरेखांचे आवाज सादर करण्याची किमया त्यांना लीलया जमत असे. केवळ लेखनच नव्ह तर सादरीकरणातून शंकर पाटील यांनी उभ्या महाराष्ट्राला आपल्या कथाकथनाने 60 ते 80 च्या दशकात वेड लावलं होतं. खरंतर 1957 पासून ते पुणे आकाशवाणी केंद्रात कार्यरत होते. त्यामुळे दर रविवारी सकाळी आकाशवाणीवरून त्यांचे कथाकथन प्रसारित होत असे. या कथाकथनाच्या कार्यक्रमाला अवघा महाराष्ट्र कान टवकारून स्तब्ध झालेला असायचा असे म्हणतात.

    याशिवाय ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे त्यांनी संपादन केले. पुढे मराठी पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाल्यावर मराठी भाषा विभागाची विशेष अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. बालभारतीच्या पहिली ते सातवी इयत्तेच्या पुस्तकांचे संपादक म्हणून 19 वर्षे त्यांनी जबाबदारी पार पाडली. पाठ्यपुस्तकांच्या संपादनाखेरीज ‘बोलकी बालभारती’, ‘आदर्श शिक्षकांची चरित्रे’ असे नवोपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. मुलांसाठी असणाऱ्या ‘किशोर’ मासिकाचे संपादकपदही त्यांनी सांभाळले. शालेय शब्दकोशाचे कामही त्यांनी पूर्ण केले. पाठ्यपुस्तक मंडळात असताना, त्यांनी भाषा विषयांचे विद्यासचिव म्हणूनही काम पाहिले. 1985 साली नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 18 ऑक्टोबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष –  हाती घेतलेले कोणतेही काम आज उत्साहाने आणि निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पैसे कमावण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.  तुमच्या शब्दांचा इतरांवर स्पष्ट प्रभाव पडेल, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणे सोपे होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. आरोग्य चांगले राहील. व्यवसायही फायदेशीर ठरेल.

    वृषभ – आज तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोक प्रभावित होतील. ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमची दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. एखादा नवा प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू होतील.

    मिथुन – आज खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खर्चामुळे तुमची चिंता वाढू शकते. मनाविरुद्ध घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल अस्वस्थता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील परिस्थिती संतुलित राहील. या ठिकाणी आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे मोठे फळ मिळण्याची शक्यता आहे. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

    कर्क – उत्पन्नाचे नवीन स्रोत आज निर्माण होऊ शकतात. शिवाय  जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वीच्या कामातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे मनात नवीन उत्साह संचारेल. आज आत्मविश्वासाने भविष्यातील योजनांचा पाठपुरावा कराल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात यशाची चिन्हे दिसत आहेत.

    सिंह – कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळेल. एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकले असाल, तर दिलासा मिळण्याची किंवा यश मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरी, व्यवसाय आणि राजकारण या क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल असेल. तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल. व्यावसायिक जीवनात नवीन यश मिळू शकेल. आरोग्यात सुधारणा होईल.

    कन्या – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. प्रवासाची संधी मिळाली, तर यशाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक प्रयत्नात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नफ्याची चिन्हे आहेत.

    तुळ – आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घाई किंवा निष्काळजीपणामुळे अडचणीत येऊ शकता. वाहन चालवताना किंवा जोखमीची कामे करताना विशेष सावधगिरी बाळगा. लहानसहान गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. व्यवसाय नेहमीपेक्षा चांगला चालेल. संततीच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.

    वृश्चिक – आजचा दिवस नातेसंबंधांसाठी खूप सकारात्मक असेल. नातेसंबंधांमध्ये काही कारणांनी तणाव निर्माण झाले असतील तर आज ते निवळतील, नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. स्वतःच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज भासेल. इतर क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसाय मजबूत असेल.

    हेही वाचा – उमाच्या मनात नवी शंका

    धनु – स्वतःच्या आरोग्याबाबत आज थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मानसिक थकवा किंवा किरकोळ शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. इतरांशी बोलताना संयम बाळगा. अगदी लहानसहान गोष्टींमुळेही गैरसमज निर्माण होऊ शकतात. व्यवसाय आणि कामाची परिस्थिती चांगली राहील. आर्थिक स्थिती संतुलित राहील.

    मकर – आजचा दिवस विद्यार्थी, कलाकार, लेखक आणि चित्रपट, माध्यम तसेच मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. सृजनशील कार्यांमधील यशामुळे तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल.  महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीही काळ अनुकूल असेल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणि शुभ संधी तुमची वाट पाहत असतील.

    कुंभ – आज तुम्हाला कुटुंबाशी निगडीत एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.  जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

    मीन – आज धैर्य आणि आत्मविश्वास यामुळे यशाची नवी उंची गाठाल. बऱ्याच काळापासून ज्या प्रकल्पावर काम करत आहात, त्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे, नवीन योजनाही यशस्वी होऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. मात्र व्यवसायासाठी आजचा दिवस खूप अनुकूल असेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 16…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 523
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 835
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.