Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कॉफीशॉप
    ललित

    कॉफीशॉप

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यAugust 7, 2026Updated:August 10, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, डॉ विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक विवेक वैद्य, त्याची माणुसकी, ती आणि तिची प्रेमकथा, त्याचा तिच्याबद्दलचा स्नेह, कॉफी शॉपमध्ये तिचे भेटणे, तिचा व्यवसाय,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तो नेहमीसारखाच कॉफी शॉपमध्ये बसलेला. त्याच कोपऱ्यातल्या जागी. तीच संध्याकाळची वेळ. त्याच्यासामोर ती पुन्हा येते. यावेळी चेहरा झाकलेला नसतो. गॉगलही लावलेला नसतो. मेकअप ही साधासाच. लिपस्टिक नाही. ती मोकळेपणाने हसते.

    “सर, इथे बसू शकते?”

    तो दोन मिनिट कन्फ्यूज होतो… मग ओळख पटल्यावर ओळखीचे स्मित देतो.

    “बसा ना.”

    ‘नक्कीच काही कामासाठी आली असेल. मागच्या वेळी आपण बोललो होतो ना! नंतर विचारू सावकाश…’ त्याच्या मनात विचार येतात.

    “कॉफी?”

    “अर्थातच,”  ती सहजतेने म्हणते.

    तो वेटरला ऑर्डर देतो.

    “काय काम काढले?” तो विचारतो.

    “काहीच नाही. सहज भेटायला आले.”

    “सहज?” त्याला आश्चर्य वाटते.

    “हो, आज पूर्ण मोकळी आहे. रात्रीही बुकिंग नाही. मग म्हटले तुम्हाला भेटावे.”

    “छानच की.”

    “कॉफीसोबत काही खाणार?”

    “नको, काहीच नको. फक्त कॉफी.”

    “Ok. मला आश्चर्य वाटते, तुला मला का भेटावसं वाटते?”

    “कोण जाणे… पण तुमच्यासोबत अर्धा तास बसले तरी बरं वाटते.”

    “पण मी कोणी तत्वचिंतक नाही किंवा तुझ्यावर खूप पैसेही उधळणाराही नाही. मग?”

    “पैशाचा प्रश्नच येत नाही… आणि मी काही intellectual बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी येत नाही. पण कोण जाणे तुम्हाला भेटून एक समाधान मिळते.”

    “तुला जर आज रात्री बुकिंग नसेल, तर आज रात्री माझ्या घरी येशील? खूप रात्री मी एकट्या काढल्या. तेवढीच तुझी सोबत होईल. निश्चिंत होऊन गप्पा मारू. तुला पर्सनल प्रश्न विचारणार नाही.”

    हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

    “मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर फ्लॅटमध्ये बिल्डिंगमध्ये राहात असाल तर, तुमची बदनामी होईल. तुम्ही एका धंदा करणाऱ्या मुलीला घेऊन फ्लॅटमध्ये रात्रभर रहाल, तर तुमच्या चारित्र्याला डाग लागेल. चालेल तुम्हाला?”

    “मी इतरांची फिकीर करत नाही.”

    “पण मी तुमची फिकीर करते. तुम्हाला जर XX हवा असेल तर एखादे हॉटेल…”

    ती वाक्य पूर्ण करू शकत नाही, कारण तो तिच्याकडे रागाने पाहतो.

    “सॉरी सर!”

    “ठीक आहे. आपण थोड्या वेळाने बाहेर पडू. एखाद्या हॉटेलमध्ये ड्रिंक आणि जेवण घेऊ. तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असेल. मग आमच्या बिल्डिंगमध्ये सामसूम होईल. चालेल?”

    “सर तुम्ही रोज बाहेर जेवतात?”

    “नाही. एक मावशी येऊन स्वयंपाक बनवून जातात. पण आज त्या आल्या नाहीत.”

    “मग स्वयंपाकाचे सामान असेल ना घरी?”

    “आहे ना.”

    “मग मी बनवते ना स्वयंपाक? बाहेर कशाला खायचे?”

    “तू?”

    “हो. मला सगळे छान बनवता येतं… आता बरेच दिवसात बनवले नाही. पण एकदा हाताला पीठ लागले की, पुढचे पटापट जमेल…”

    “अगं पण…”

    “जाताना एखादी भाजी घेऊ. थोडे टमाटे, कोथिंबीर घेऊ. कांदे, बटाटे घरी असतीलच ना?”

    “अं… हो…” तो अजून गोंधळलेलाच.

    “निघूया मग… भाजीबाजारात जाऊ. घर फार दूर तर नाही ना?”

    “नाही.”

    ती उठते, तसा त्याचा नाईलाज होतो. त्याचा अजूनही विश्वास बसलेला नाही.

    ती दोघे बाहेर पडतात, तशी ती त्याला म्हणते,

    “माझ्यासोबत राहा पण थोडे दूरच. आपण दोघे सोबत आहोत, हे लोकांना समजायला नको.”

    तो मान डोलावतो.

    ती उत्साहाने निघते. सुरुवातीला एक कापडी पिशवी घेते, मग दोन-तीन भाज्या अगदी निवडून घेते. भाजीवाल्याशी किमतीबाबत घासाघीस करते. तो तिचं हे नवीन रूप थक्क होऊन पाहत असतो. ते रिक्षात बसतात, तेव्हा ती ओढणीने चेहरा झाकून घेते. घराच्या थोडे आधीच त्याला सांगून रिक्षा थांबवायला लावते. त्याच्या हातात पिशव्या देऊन सांगते,

    “तुम्ही पुढे जा. मी मागून येते. पत्ता सांगा.”

    “बी विंग, सेव्हनथ फ्लोअर… 721”

    “Ok”

    तो घरी जातो. भाज्या ठेवतो. घरातला पसारा जमेल तसा पटापट आवरतो. ती बऱ्याच वेळ येत नाही, तेव्हा ती परस्पर निघून तर गेली नाही ना? अशी त्याला शंका येते; पण वीस मिनिटांनी ती येते. ती येताच वॉशरूमला जाऊन हातपाय धुऊन फ्रेश होते. भाज्या बाहेर काढत असताना तो तिला म्हणतो,

    “मिसेसचा गाऊन आहे, देऊ तुला?”

    तो पटकन आत जाऊन एक चांगला गाऊन काढून आणतो.

    ती बेडरूममध्ये जाऊन बदलते आणि ती बाहेर येताच तो पाहताच राहतो. एखादी सुंदर सुशील गृहिणी असावी, तशी ती दिसते. ती भराभर भाजी धुऊन चिरते. त्याच्याकडून तांदूळ, डाळ काढून घेते आणि कूकर लावते. एकीकडे पोळ्यांची कणीक भिजवते. तो मदत करत असतो. तासाभरात तिचा सगळं स्वयंपाक होतो.

    तो स्वतःच डायनिंग टेबलवर दोन ताटं घेऊन बसतो. ती भाजी पोळी वाढते.. स्वतःही घेते. पाहिला घास घेताच त्याच्या तोंडून बाहेर पडते… “अप्रतिम.”

    “खरेच छान झाला का? मी खूप दिवसांनी केला.”

    “अगं, तू तर सुगरण आहेस.”

    ती समाधानाने हसते. पोटभर जेवल्यावर तो उठतो आणि तिला म्हणतो, “भांडी मावशी घासतील. तू फक्त सिंकमध्ये ठेव.”

    तो बेडरूममध्ये येतो. आवरून ती पण येते. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणतो,

    “किती दिवसांनी घराला घरपण आले.”

    “मलाही खूप छान वाटले आणि थोडी धाकधूक होती, जमेल की नाही… पण जमला स्वयंपाक. आमच्या घरी मीच करायची स्वयंपाक. आई आजारी असायची.”

    “काय होते आईला?”

    “दमा”

    “तुला माझ्याबरोबर एकदम घरी येण्याची भीती नाही वाटली. माणूस कसा आहे, काय आहे? त्रास देणार… विक्षिप्त किंवा विकृत…”

    “इतकी वर्षे धंद्यात आहे. माणसे ओळखण्यात चूक होणार नाही माझी.”

    “इतकी छान आहे, शुद्ध बोलते, स्वयंपाक उत्तम करते. आपल्यामुळे दुसऱ्याची बदनामी होऊ नये इतकी काळजी घेते. इतके निर्मळ मन आहे तुझे… तरी या धंद्यात कशी आली?”

    “आली… काही माझ्याकडून चुका झाल्या. काही नशिबाने दगा दिला.”

    “तरीही?”

    “जाऊ द्या सर. त्या गोष्टींकडे मी नेगेटिव्हली बघत नाही. कधी कधी तुमच्यासारखे चांगले कस्टमर मिळतात. आता जे आहे ते स्वीकारायचे. उगाच रडगाणे गात बसायचे नाही.”

    तो तिला प्रेमाने जवळ घेतो. तीही त्याला बिलगते. तो हळूवारपणे तिचे चुंबन घेतो.

    “…..”

    “आता सांग… माझ्या स्पर्शात वासना आहे का?”

    “Sorry सर. कधीतरी चूक होते. अनावधानाने मेंदू त्याच सूचना देतो.”

    “Ok. बघ… माझा अजून घटस्फोट झालेला नाही. पण तू मला फार आवडली. राहशील माझ्याबरोबर? सुखात ठेवीन. तुला जर वाटत असेल तर, ॲग्रिमेंट करून दर महिन्याला तुला रक्कम पण देईन.”

    “नको. केप्ट म्हणून ठेवायला तर, अनेक धनिक माझ्या मागे लागलेत. पण मला ते बंधन नकोच. तुमच्याबाबतीत तर बिलकुल नको. तुम्ही घटस्फोट झाल्यावर, दुसरे लग्न करा. असे काही केले, तर बदनामी होईल. दुसरे लग्नही होणार नाही. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना सुखी आयुष्य मिळायला हवे.”

    “…आणि तुझ्यासारख्या चांगल्या स्त्रीला नको?”

    “माझी गोष्ट वेगळी आहे… सोडा तो विषय. जेवण जास्त झालंय आणि काम केल्याने थकवाही आलाय. झोपूया?”

    “ये.”

    ती त्याच्या मिठीत आली आणि पाचच मिनिटात शांत झोपी गेली. तो हळूच तिच्या मिठीतून दूर झाला… आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत राहिला. केव्हातरी त्याचा डोळा लागला.

    “सर… सर… तिच्या हाकेने त्याला जाग आली. त्याने घड्याळ बघितले. पाच वाजले होते. ती तिचे कपडे घालून उभी होती… अंघोळ झालेली.

    “मी निघते.”

    “इतक्या लवकर? जा सावकाश सात-साडेसातला!”

    “नको. दिवसा लोक पाहतील, तर तुमच्यावर संशय घेतील. अंधारातच निघते.”

    “थांब मी तुला टॅक्सी किंवा रिक्षा मिळवून देतो.”

    “नको. कशाला त्रास घेता?”

    “त्रास कसला?  दहा मिनिटे थांब. मी फ्रेश होऊन येतो.”

    खरोखरच तो दहा मिनिटांत तयार होऊन येतो. येताना त्याच्या हातात एक छोटेसे पॅक तिच्या हातात ठेवत म्हणतो,

    “हे माझ्याकडून छोटेसे गिफ्ट.”

    “सर…” तिचा आवाज दुखावलेला.

    “शेवटी तुम्हीही माझी रात्रीची किंमतच केली.”

    “आधी गिफ्ट उघडून बघ. नंतर बोल…” तो शांतपणे म्हणतो.

    ती उघडते. आत एक छोटी सुंदर श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती. लंगडा बाळकृष्ण. तिचे हात थरथरतात.

    “सर नको, माझे काम असे. देवापुढे मी?…”

    “तू स्वभावाने किती छान आहे. अंतःकरण निर्मळ आहे. असा विचार करू नको. कधीतरी तुझाही उद्धार होईल. त्याने सोळाहजार स्त्रियांचा केला… तुझाही करेल.”

    हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!

    ती मूर्तीला कपाळावर लावते आणि पर्समध्ये वेगळ्या कप्प्यात ठेवते… त्याला हलकेच मिठी मारते.

    “Take care. कधीही वाटले तर ये. कॉफीशॉप… आता घरही माहिती झालंय.”

    “घरी नाही… पण कॉफीशॉपला भेटू.”

    दोघे रस्त्यावर येतात. तिने पुन्हा चेहरा झाकलेला. थंडीचे कारण आहेच. एक वयस्कर रिक्षावाला दिसतो. तो हात देतो.

    “काका, माझ्या मिसेसला जरा स्टँडला सोडाल?”

    ती त्याच्याकडे पाहतच राहते.

    “हो…”

    “सांभाळून न्या काका.”

    “फिकीर करू नका साहेब. अगदी व्यवस्थित नेतो.”

    “पोहचल्यावर फोन कर…” तो सहज म्हणतो.

    ती मान डोलावते. फोन करायला नंबर कुठे आहे आपल्याकडे. पण रिक्षावाल्याला खरे वाटावे म्हणून बोलतोय तो. रिक्षा निघते. ती डोळ्यात आलेले अश्रू पुसते. रिक्षावाल्या काकाला आरशात दिसते.

    “बेटी… नवऱ्यावर फार प्रेम दिसते तुझे?”

    “हो काका.”

    ती हुंदका आवरते. रिक्षाने एव्हाना वेग पकडलेला असतो…

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026 ललित

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026 ललित

    मैत्रीण

    September 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    By डॉ. अस्मिता हवालदारSeptember 6, 2026

    ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन स्त्रीची कहाणी आहे. बेट्टी महमूदी…

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 901
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.