Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 7, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥505॥ सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥506॥ मनाचां महाद्वारीं । प्रत्याहाराचां ठाणांतरीं । जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥507॥ आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्यसंपुटीं । सुये चित्त ॥508॥ समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानेंसी । चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ॥509॥ अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो । हा आथि तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥510॥ जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥511॥

    इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥8॥

    आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी । पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥512॥ वमिलेया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना । आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥513॥ विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे । व्याघ्रविवरां न विचवे । वस्ती जेवीं ॥514॥ धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥515॥ अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ॥516॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे

    अर्थ

    ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्‍या स्त्रीला, तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो; त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो ॥505॥ चित्ताला संकोच होण्याकरिता देहसुद्धा झिजतो व इंद्रियांची समजूत घालून, त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो ॥506॥ या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्‍याच्या जागेत, जो यम व दम यांस उभे जागे ठेवतो ॥507॥ गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राच्या ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूरचक्राच्या ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्धचक्राच्या ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची, गस्त घालतो आणि इडा पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. ॥508॥ समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधि लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. ॥509॥ अर्जुना,  अंत:करणनिग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा (अंत:करणनिग्रह) आहे, तेथेच ज्ञानाचा विजय आहे. ॥510॥ ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे, असे समज. ॥511॥

    इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माच्या विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यु, म्हातारपण, रोग, दु:ख व दोष यांचे अनुदर्शन ॥8॥

    आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो, ॥512॥ ओकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही, अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरिता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही ॥513॥ जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही. ॥514॥ रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, ॥515॥ अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. ॥516॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    August 6, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे

    August 5, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    By डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 6, 2026

    संत एकनाथ महाराजांचे ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले’ हे भारूड अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक ठेवा आहे. नाथांना…

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    August 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे

    August 5, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 522
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 245
    • मैत्रीण 24
    • ललित 832
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.