Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
अजित गोगटे विश्लेषण भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी 14 मे 2025 रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना पदाची शपथ दिली. केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. गवई यांचे सुपुत्र असलेल्या भूषण गवई यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, 15 मे 2025 रोजी महाराष्ट्राशी संबंधित एका प्रकरणाचा निकाल दिला. सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण केल्यानंतर काही तासांतच न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भाजपाचे विद्यमान खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी महसूल आणि वनमंत्री नारायण राणे यांच्यावर मेहेरनजर करणारा निकाल दिला. गेली 150 वर्षे…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मी अगदी 1960च्या दशकापासून मुंबईत फिरतो आहे. त्याकाळी मुंबईत गर्दी फार कमी होती. दर रविवारी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी लांब दांड्याच्या ब्रशनी रस्ते धुवायचे. 1975 ते 1978 या काळात कॉलेजला असताना मुंबईचे वेगळे रूप पाहिले. 1988 ते 2015 या कालावधीत मुंबईत विविध पोलीस ठाण्यांत आणि क्राइम ब्रँच, अंमलीपदार्थ विरोधी कक्षातही काम केले आणि मुंबई नेहमीच fascinating वाटली. हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला! मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे या 603.4 किमी क्षेत्रफळात, एक नाही तर अनेक मुंबई वसलेल्या आहेत. एक नोकरदारांची मुंबई, एक बिझनेसमेनची मुंबई, एक गँगस्टरची मुंबई, एक कोट्यधीशांची मुंबई, एक…
आराधना जोशी नुकताच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर मी एक फोटो शेअर केला होता. मी, माझी लेक, आई आणि आजी अशा चार पिढ्या त्या फोटोत दिसतात. अनेकांनी त्या फोटोला लाइक केले. त्यानिमित्ताने माझी शिरा आजीची (आईची आई) आठवण शेअर करते. विजया कृष्णाजी महाबळ म्हणजे माझी शिराआजी 17 मे 2017 रोजी अनंतात विलीन झाली आणि नऊ दशकांचा एक प्रदीर्घ प्रवास संपला. अवघ्या चार दिवसांवर तिचा वाढदिवस आला होता. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे, आजी आणि आई यांचा वाढदिवस एकाच दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिच्या नातीचा म्हणजे माझा वाढदिवस. त्यावरून ती नेहमी मला म्हणायची, ‘जरा काही तास आधी जन्माला यायचं की!’…
दिप्ती चौधरी …तर मंडळी आम्ही अमेरिकेत मस्त रुळलो आहोत, असे वाटत असतानाच मोठ्ठा प्रश्न आम्ही आमच्या घरच्यांपुढे उभा केला! एक दिवस माझे आणि दनूचे जोरदार भांडण झाले, त्यात त्याला मी पुरता आडवा केला. तो जाऊन फायर प्लेसच्या वर चिमणीत जाऊन लपला. पण काही तासांनी बाहेर आला आणि सारे ठीक झाले. तेव्हा आमचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवडा बाहेर होते आणि दिदी तिच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये. कदाचित, यामुळे पिदूचे डोके सटकले असेल, असे वाटून आईने सोडून दिले. पण पुढच्याच रविवारी आमच्या नवीन शेजाऱ्यांच्या मुली अंगणात खेळत होत्या. गावभवानी डेजी नेहमीप्रमाणे गाव उंडारून परतताना त्यांच्याबरोबर खेळायची. नवीन असल्याने ही नक्की कोणाची, हा शोध…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा हा कार्यक्षेत्राशी निगडित विचारांनी सुरू होईल. जसा आठवडा पुढे सरकेल तशा काही चांगल्या घटना कानावर पडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील तसेच धनलाभ होण्याचे देखील उत्तम योग आहे. घरात तणाव निर्माण झाल्यास परिस्थिती कशी निवळेल, यावर स्त्रियांनी जास्त लक्ष केंद्रित करावे. वृषभ वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्याच्या प्रारंभी काहीतरी नवीन शिकावे, अशी इच्छा उत्पन्न झाली तर, त्यावर अंमल करणे खूप फायद्याचे ठरेल. मनातील चिंतेचा आपल्या संभाषणावर काही परिणाम तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये घरातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाकडे अत्यंत बारकाईने पाहणे आणि त्यावर विचार…
प्रमोद मनोहर जोशी मधुगंधित करिसी सखये तू गं वेणीवरती फूल माळता धुंद होऊनी गीत अनामिक ओठी मम ये तुझीयाकरिता II धृ II जरी मोगरा उरात सलतो रुळलेला तव वेणीवरती हेच जाण गं हेवा नच हा माझी तुजवर अक्षय प्रीती गंध प्रीतीचा येई बहरूनी शुभ्र मोगरा केशी हसता धुंद होऊनी गीत अनामिक ओठी मम ये तुझीयाकरिता II 1 II वसे मोगरा तव वेणीवर जीवच माझा तेथे गुंते धवल फुल अन काळे कुंतल मज समजेना नाते कोणते फुल गुंतले तुझीया केशी तुझ्या नि माझ्या प्रीतीकरिता धुंद होऊनी गीत अनामिक ओठी मम ये तुझीयाकरिता II 2 II कचपाशाची जुई गमे मज सखी तुझी…
उमा काळे आयुष्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळतं… काही प्रसंगातून, काही अनुभवातून शिकायला मिळतं… तर, काही वेळा काही कारण नसतानाही आयुष्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्याला आपण नशीब म्हणतो आणि विषय सोडून देतो… खरंच, इतकं सोपं आहे का हे? मला नेहमी प्रश्न पडतो हा! हे सगळं आपल्या वाट्याला येतं, त्यामध्ये आपलेच लोक असतात. आपलं सुख सोडून ज्यांच्या सुखासाठी अधिक झटतो, तेच सर्वात आधी आपला विश्वासघात करतात. त्याचा परिणाम असा होतो की, बाहेरचे लोक या गोष्टींचा गैरफायदा घ्यायलाही मागे सरत नाही… त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आधी आपलं भविष्य सुरक्षित करा, मग खुशाल दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा… या कलियुगात प्रामाणिकपणा तसेच नि:स्वार्थी, निस्सीम…
सुप्रिया महाबळ अडचणीच्या वेळी कोण कधी धावून येईल, हे सांगता येत नाही. कधी कधी ओळख नसतानाही अचानक कोणाचा तरी मदतीचा हात पुढे येतो. काहीवेळेस अल्पशा ओळखीवरही समोरची व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. जणूकाही त्यासाठीच ती नवी ओळख निर्माण झाली असावी! प्रत्येकवेळी आपल्यालाच कोणी भेटलं पाहिजे, असं नाही. या भूमिकेत अदलाबदल होऊ शकतो. कधीतरी अडचणीच्या प्रसंगी आपणही दुसऱ्यांचा आधार बनू शकतो. एकदा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो. आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे, प्रवास घडताना वेगवेगळे अनुभव गाठीशी येतातच, शिवाय, त्यातून आपल्याला शहाणपण येतं. आमच्या या सहलीतही एक मजेशीर, आगळावेगळा अनुभव आला. दक्षिण भारताची सहल आटोपून परतीच्या प्रवासात होतो. मराठवाड्यातील उमरगा नामक…
अर्चना कुलकर्णी ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. खूप पाऊस पडत होता… दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती.. मी माझ्या कार्यालयात दुपारचा चहा घेत घेत, टेबलावरची पत्रे पाहत होते. त्याच वेळी टेलिफोन खणखणला. रिसिव्हर उचलून मी बोलू लागले, “हॅलो…!” “नमस्कार मॅडम…! मी, भाटे. समीर भाटेचा डॅडी बोलतोय. मॅडम, अकरावीचे क्लासेस सुटले का?” “हो, केव्हाच सुटले. का हो, काय झालं?” “समीर अजून आला नाही घरी म्हणून…!” “मित्राकडे गेला असेल. येईल लवकरच. काळजी नका करू. तो घरी आल्यावर मला कळवा मात्र.” मिस्टर भाटेंना धीर देऊन मी रिसिव्हर खाली ठेवला. समीर भाटे…! मी आठवू लागले, आणि आठवले. त्याचे असे झाले, साधारण जुलैचा दुसरा आठवडा होता तो. अकरावीच्या…
चंद्रशेखर माधव सुमारे 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी एमसीएम झालो ना त्या वेळची. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, प्रभात रोडला. तिथे माझा एका मित्र फॅकल्टी म्हणून नोकरीला होता. त्याच सुमारास मी पास-आऊट झालेलो असल्यामुळे आणि एकूणच सी लँग्वेज तसेच फॉक्स प्रोमध्ये माझं प्रभुत्व असल्यामुळे, मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवण्यात आलं. हळूहळू मी तिथं रुळलो. तिथे नितीन नावाचा एक मॅनेजर होता. तोच ती इन्स्टिट्यूट पूर्णपणे सांभाळायचा. सांगताना मात्र इन्स्टिट्यूट माझी आहे, असं सांगायचा. इन्स्टिट्यूटचे तीन डायरेक्टर होते. त्यातले दोन अमेरिकेला असायचे, एक डायरेक्टर होता पुण्यातच! पण तो मनुष्य कधी फारसं लक्ष घालायचा नाही, म्हणजे अक्षरशः महिना-महिना इन्स्टिट्यूटमध्ये यायचा सुद्धा नाही.…

