दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 02 जुलै 2025, वार : बुधवार
भारतीय सौर : 11 आषाढ शके 1947, तिथि : सप्तमी 11:57, नक्षत्र : उत्तरा 11:06
योग : वरीयान 17:45, करण : विष्टी 24:59
सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, त्या व्यवसायाशी संबंधित अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. पैशाशी संबंधित जुने व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
वृषभ – नोकरीत परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे धीर धरा. व्यावसायिक कामे थोडी मंदगतीने होतील, परंतु परिस्थिती लक्षात घेता संयम राखणे उचित ठरेल. तुमचा पाठिंबा आहे हे मुलांना दाखवून द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
मिथुन – नव्या नोकरीची संधी मिळेल. मनातील गोंधळ दूर होईल, त्यामुळे मन हलके राहील. आर्थिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. खर्च मर्यादित करा आणि अनावश्यक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. विद्यार्थ्यांना जुन्या शंका दूर करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अभ्यासात मन लागेल.
कर्क – दिवसाचे नियोजन करून त्यानुसार कामे वेळेवर पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. व्यवसायाच्या दृष्टीने एखाद्या कंपनीशी भागीदारी होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांवर काम सुरू होईल. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे.
सिंह – वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यालयात एखादे सादरीकरण किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने एखादा नवीन करार मिळू शकतो. राजकीय संबंधांचा देखील फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे यश आनंदाचे वातावरण निर्माण करेल.
कन्या – नोकरीत कामाचा ताण राहील, सहकाऱ्यांशी सलोखा ठेवा. व्यवसायात मनासारखे यश मिळाल्याने पालक आनंदी होतील. उधळपट्टी टाळा, गरजांना प्राधान्य द्या. एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी भाऊ किंवा शिक्षकांची मदत घ्या. कुटुंबात सुसंवाद राखणे महत्वाचे आहे.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
तुळ – दिवस प्रगतीचा असेल. नोकरदार मंडळींना यश मिळेल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तूंसाठी खर्च कराल. तुमच्या सल्ल्याचा मुलांना फायदा होईल. नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.
वृश्चिक – कामे वेळेवर पूर्ण होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी थोडाफार खर्च होईल. शिक्षक असणाऱ्या जातकांचा व्यग्र दिवस असेल. कुटुंबातील परस्पर संबंध दृढ होतील. पाहुण्यांचे आगमन होईल.
धनु – व्यवसायात एखादी नवीन योजना सुरू करता येईल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. एखाद्या आर्थिक समस्येचे निराकरण होऊ शकते. जोडीदारासोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.
मकर – परिस्थिती अत्यंत सकारात्मक असेल. त्यामुळे केलेले काम यशस्वी होईल. मालमत्तेचे व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. महिला जातक घरगुती कामात व्यग्र असतील.
कुंभ – अतिरिक्त जबाबदाऱ्या पूर्ण होतील. समाजात ओळख वाढेल. फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील जातकांसाठी दिवस फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. एखाद्या जुन्या मित्राशी गप्पा होतील.
मीन – कामाच्या ठिकाणी उत्तम समन्वय असेल. विपणन क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैशाशी संबंधित समस्या सोडवता येतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराकडून भावनिक पाठबळ मिळेल.
दिनविशेष
ॲडमिरल जयंत नाडकर्णी
1 डिसेंबर 1987 ते 30 नोव्हेंबर 1990 या काळात भारतीय नौदलाचे सुकाणू एका मराठी माणसाच्या हातात होते, ते म्हणजे ॲडमिरल जयंत नाडकर्णी. सेवेत असताना सर्वाधिक पुरस्कार पटकवण्याचा आगळा-वेगळा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. ॲडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 रोजी झाला. त्यांनी मार्च 1949मध्ये रॉयल इंडियन नेव्हीत प्रवेश केला. पुढे चार दशके भारतीय नौदलाची सेवा करताना ॲडमिरल नाडकर्णी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. आयएनएस तलवार आणि आयएनएस दिल्ली या युद्धनौकांचे ते कमांडिंग ऑफिसर बनले. पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर म्हणून देखील त्यांनी सूत्रे सांभाळली होती. याशिवाय, ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आणि नंतर नौदलाचे उपप्रमुख या पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 1961चा गोवा मुक्तिसंग्राम, 1965 आणि 1971चे भारत-पाकिस्तान युद्ध, 1988मधील मालदीव येथे झालेले बंड मोडून काढण्यात ॲडमिरल नाडकर्णी यांचा सहभाग होता. याशिवाय, नौदलासमोर भविष्यात कोणती आव्हाने असतील याचा विचार करून त्यांनी त्यावेळी मांडलेल्या प्रस्तावांवर आता निर्णय घेण्यात येत असल्याचे दिसते. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक, विशिष्ट सेवा पदकाने नाडकर्णी यांना सन्मानित करण्यात आले होते. निवृत्तीनंतर ते विविध शैक्षणिक संस्थांशी निगडीत होते. 2 जुलै 2018 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – नक्षत्रांच्या पुराणकथा… पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा!