Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 12:45; नक्षत्र : अश्विनी 13:57 योग : ध्रुव 17:04; करण : कौलव 23:21 सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पंचमी श्राद्ध भरणी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित…
दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 5 मिरजच्या मीरासाहेब दर्ग्याजवळ बाबांच्या रुपाने एक देव भेटला याचा आनंद झाला. देव मंदिरात नाही देव माणसात आहे… प्रत्येकाने माणसात देव शोधला पाहिजे. एकमेकांचा आत्मा जाणणे, हा पुण्याच मार्ग आहे. अन्नदान हे फार श्रेष्ठ दान आहे. हल्लीतर प्रत्येक तीर्थस्थळाच्या ठिकाणी महाप्रसाद भाविकांना दिला जातो, हे फार मोठे पुण्याईचे काम आहे. या प्रसादासाठी बरेच भाविक प्रसादासाठी मदत करतात. काही ठिकाणी प्रसादासाठी धान्य कोठून येते, हे कळतही नाही. माझ्या मते नरसिंह वाडी येथे गेली पाच वर्षं एक व्यक्ती प्रसादाचे जेवण देत आहे, ती व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. अशी दानधर्म करणारी माणसे भरपूर आहेत. दिवस…
सुनील शिरवाडकर आमच्या गल्लीत एक कुटुंब रहात असे, त्यांची ही कहाणी! कदाचित प्रातिनिधिक…!! अलीकडे बहुतांश ठिकाणी दिसणारी… तर या कुटुंबाचा चांगला भरभक्कम वाडा होता. आईवडील आणि चार मुलं… वडील याज्ञिक होते. त्यांचा वाडा म्हणजे काय? सागवानी लाकडात बांधलेला… ओसरी….चौक… पडवी… पडवीत टांगलेला झोपाळा… त्याच्या पितळी कड्या… याज्ञिकी करणारे ते काका, त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे. त्यांचा रुबाब काही औरच! त्यांचाच काय, सगळ्या कुटुंबाचाच रुबाब होता. त्यांचेकडे साजरे होणारे सण, त्यानिमित्ताने बाहेर निघणारी चांदीची भांडी… सोनं-नाणं… सर्वच रुबाब होता. तीन पिढ्यांच्या कहाणीतली ही पहिली पिढी… त्यांना चार मुलं. त्यातील एक माझ्याच वयाचा. त्याचं लग्न झालं आणि तीन-चार वर्षांत तो घराबाहेर पडला. त्याची…
माधवी जोशी माहुलकर भातावरचे पिठले हा एक भन्नाट स्वादिष्ट पदार्थ आहे. ‘वन पॉट मिल’ या संकल्पनेत हा पदार्थ चपखल बसतो. कमीत कमी वेळेत पोटभर आणि चविष्ट पदार्थ काय करता येईल, याचे उत्तर शोधतानाच अशा ‘वन पॅाट मिल’ असलेल्या बिर्याणी, गोळाभात, वडाभात, खिचडी, दाल खिचडी इत्यादी पदार्थांचा शोध लागला असावा. ‘भातावरचे पिठले’ हा देखील त्यापैकीच एक. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ कसा तयार करायचा ते! साहित्य तांदूळ – 1 वाटी बेसन – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 2-3 आलं – 1 इंच लसूण – 4 ते 5 पाकळ्या कोथिंबीरी – 1 वाटी कांदा – 1 (मध्यम आकाराचा) तिखट –…
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखांमध्ये विविध प्रकारची योगासने पाहिली होती. आता बघूया सूर्यनमस्कार कसे करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते. सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा आणि उपासनेचा प्रकार आहे. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून शरीरात सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. श्वास घेण्याची क्रिया तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. सूर्यनमस्कारमध्ये बारा आसने आहेत. चला तर मग त्या बारा आसनांची नावे आणि त्यांचे फायदे बघूया. प्रत्येक आसन करताना श्वासाची गती लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रणामासन प्रणाम आसन म्हणजेच प्रार्थनेची पोझ. छातीसमोर दोन्ही हात जोडून उभे राहायचे. श्वासाची क्रिया…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोभिsजायते ॥62॥ क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥63॥ जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगीं प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥322॥ संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥323॥ कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 19 भाद्रपद शके 1947; तिथि : तृतीया 15:38; नक्षत्र : रेवती 16:03 योग : वृद्धी 20:31; करण : बव 26:11 सूर्य : सिंह; चंद्र : मीन 16:03; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34) तृतीया श्राद्ध चतुर्थी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ यांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र,कामाच्या ताणामुळे…
डॉ. अस्मिता हवालदार ‘परतवारी’ पुस्तकाबद्दल मी खूप जणांकडून ऐकलं होतं. जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं तेव्हा भारावून गेले होते. पुस्तक वाचायचा सुद्धा योग यावा लागतो. सुधीर महाबळ यांच्या मुलाखती, भाषणं पण ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात उमटला, ‘यांना कसं जमलं असेल? आणि मला कधी जमेल का?’ घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी ही वैभव जोशींची कविता इतकी पटली! म्हणजे माझ्यासारखे बरेच आहेत. वारीला जायची खूप इच्छा आहे, पण ते घडत नाही. तुकोबांनी लिहून ठेवले आहे, आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा… मीही त्यातलीच एक आवा! वारी आणि मराठी माणूस यांचं नातं शब्दपलीकडचं आहे. कुलदैवताच्या दर्शनाला…
सतीश बर्वे गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी कृत्रिम विसर्जन तलावावर रिमझिम पावसात एक आजी-आजोबा दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या सोबत आणखी कोणी नव्हते! तिथला एक कार्यकर्ता ते बघून चटकन पुढे झाला, आजोबांच्या हातात असलेल्या पाटावरच्या गणपतीला बाजूलाच असलेल्या टेबलावर ठेवण्यासाठी. आजींनी त्या मुलाला थांबवले आणि त्या म्हणाल्या, “अरे, त्यांना एकट्याला करून दे… सगळं हौसेने करायला आवडत त्यांना.” आजोबांनी हातातल्या बाप्पाला अलगदपणे टेबलावर ठेवले आणि ते आजींना म्हणाले, “आरतीचे ताम्हण तयार कर आणि झांजा काढ.” आजींनी पिशवीतून ताम्हण आणि थोडंसं तूप घालून आणलेलं निरांजन, उदबत्ती असं सगळं बाहेर काढलं. निरांजन लावून ताम्हण आजोबांच्या हातात दिलं. आजोबांनी आरती म्हणायला सुरुवात केली आणि आजींनी झांज वाजवायला.…
सायली कान्हेरे बाहेर पाऊस कोसळत असताना, काहीतरी चमचमीत खावेसे वाटते. अशावेळी कॉर्न पॅटीस आणि सोबत पुदिन्याची चटणी याचा आनंद वेगळाच असतो. एकदा करून पाहा, सगळ्यांना आवडेलही! कॉर्न पॅटीस साहित्य कॉर्न – 2 वाट्या सिमला मिरची – 1 (लहान) कांदा – 1 (लहान) उकडलेले बटाटे – 2 लसूण – 4-5 पाकळ्या आले – 2 इंच लवंगी मिरच्या – 3 चीझ क्यूब – 4 (किसलेले) बेसन – अर्धी वाटी तांदळाचे पीठ – अर्धी वाटी तेल – तळण्यासाठी पुरवठा संख्या – साधारण 15 पॅटिस होतात तयारीला लागणारा वेळ – कॉर्न उकडून घेण्यासाठी 10 मिनिटे भाज्या चिरायला 10 मिनिटे आलं, लसूण, मिरच्या यांची भरड…

