Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अजित गोगटे पत्रकाराने व्यावसायिक नीतिमूल्यांचे कठोरतेने पालन न करण्याची अनेक करणे असू शकतात. पत्रकारिता हे क्षेत्रच असे आहे की, ज्यात मूल्यांशी तडजोड करण्याच्या अनिवार मोहाचे क्षण वारंवार येतात. निस्सीम आत्मनिष्ठा आणि अतूट आत्मप्रामाणिकता या जोरावरच अशा मोहांवर मात केली जाऊ शकते. कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी निरनिराळी असल्याने, कितीही मनात असले तरी, प्रत्येकाला अशी आदर्शवत पत्रकारिता करणे शक्य होत नाही. पत्रकारांना मोहात टाकून वश करण्यातच ज्यांचा निहित स्वार्थ असतो, असे विविध समाजघटक हे काम नानाप्रकारे करत असतात. पत्रकारांना सरकारी कोट्यातून घरे देणे, हा असाच एक मोहाचा राजमार्ग आहे. मुळात पत्रकारांना आणि विशेषतः नोकरदार पत्रकारांना सरकारने घरे का द्यावीत, या प्रश्नाचे…
मनोज जोशी दोनच दिवसांपूर्वी अर्धांगिनी आराधनाबरोबर सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. तिनं नेहमीप्रमाणे सुरुवातीला धान्य आणि स्वयंपाकघरातील इतर सामग्री घेण्याकडे मोर्चा वळवला. मी पाठोपाठ ट्रॉली घेऊन होतोच… एक-एक वस्तू ट्रॉलीत पडत होत्या… ही खरेदी झाल्यानंतर आम्ही पॅक्ड फूडच्या सेक्शनमध्ये गेलो. अर्थात, मलाच जास्त खादडीची सवय असल्याने फटाफट एकापाठोपाठ एक पॅकेट्स ट्रॉलीत घेत चाललो होतो. त्यानंतर सेक्शन आला तो सरबतांचा! त्या सेक्शनमध्ये एवढे फ्लेवर्स आणि विविध आकाराच्या आकर्षक बाटल्या होत्या की, सर्वच घेण्याचा मोह झाला. पण काही निवडक फ्लेवरची सरबतं घेऊन बिलिंग काऊंटरवर गेलो. वास्तविक, चहा आणि सरबत हा माझा फेव्हरिट विषय म्हणा, विक पॉइंट म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा…. पण घरात…
अनिता बाळकृष्ण वैरागडे माझ्या मागील लेखात प्राणायामचे प्रकार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे बघितले होते. आता या लेखामध्ये आसन, विशेषत: पोटावर तसेच पाठीवर झोपून करायची आसने पाहणार आहोत. ही आसने शरीराला विश्रांती देतात आणि आपल्या अंतर्गत अवयवांना सशक्त बनवतात. भुजंगासन पोटावर झोपून दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवावे. नंतर दीर्घ श्वास घेऊन छाती वर उचलावी लागते. काही क्षण थांबून श्वास सोडत छाती पुन्हा जमिनीवर टेकवायची असते. याचे फायदे – पाठीचा कणा मजबूत होतो. लवचिकता वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होतात. धनुरासन नावावरूनच लक्षात येते की, हे धनुष्याच्या आकाराशी संबंधित हे आसन आहे. पोटावर झोपायचे. पाय मागून वर उचलल्यावर छाती वर उचलून…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ।।49।। आतां भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥50॥ ना तरी शब्दब्रह्माब्धि । माथिलेया व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि | नवनीत हें ॥51॥ मग…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जुलै 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 08 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:41; नक्षत्र : हस्त 21:51 योग : सिद्ध 27:39; करण : कौलव 13:39 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रीयाळ षष्ठी कल्की जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतीने काम सुरू करावे लागेल. काही मेष जातकांसाठी आजचा दिवस अस्वस्थेचा असू शकतो, यामागचे नेमके…
चंद्रशेखर माधव भिडे काका म्हणजे माझ्या वहिनीचे वडील. आमच्या दोघांच्या वयामध्ये अंदाजे 30 ते 33 वर्षांचा तरी फरक असावा. कसं कोणास ठाऊक, पण सुरुवातीपासूनच माझी अन् त्यांची मैत्री जमली. मैत्रीच म्हणायला हवं. कारण तसं बघायला गेलं तर सांगण्यासारखं असं नातं आमच्यामध्ये नव्हतं. कधीही काही कार्यक्रमानिमित्त किंवा इतर वेळप्रसंगी भेटले की, भरपूर गप्पा मारत असत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप होतं आणि माझ्याकडे घेण्यासारखं! माणूस खूप बुद्धिमान आणि उच्चशिक्षित होता. यापलीकडे म्हणजे, आयुष्यात कमावलेला अनुभव. त्यामुळे एकूणच ते जेव्हा बोलायचे तेव्हा ऐकायला एकदम मजा यायची. खूप शिकायला मिळायचं. सुमारे दोन-तीन वर्षांनंतर अचानक एक दिवस माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यात मेंदूला इजा झाल्यामुळे सुमारे…
सीए रसिका महाबळ प्राप्तिकर (Income Tax) भरणे हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य असून त्यात योग्य नियोजन केल्यास कायदेशीररीत्या कर सवलत घेता येते. भारत सरकारने करदात्यांना काही विशिष्ट खर्च आणि गुंतवणूक यावर वजावट (Deduction) देण्याची तरतूद केली आहे, जी जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये वजावट आणि सूट यांच्या आधारे कर आकारणी केली जाते. या प्रणालीत विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे, जसे की जीवन विमा हप्ता, भविष्य निर्वाह निधी (PPF), शिक्षण कर्ज व्याज, आरोग्य विमा हप्ता इत्यादी. आपण जुनी कर प्रणाली निवडल्यास कोणकोणत्या सवलती उपलब्ध आहेत, त्या कोणत्या कलमांअंतर्गत येतात आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी कोणते नियम आहेत याची सविस्तर माहिती…
शैलजा भा. गोखले सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीच्या जेवणाचा बेतही एकदम खास असतो. यात भाजणीचे वडे, मटकीची उसळ, मूगडाळ खिचडी किंवा साधं वरण भात आणि नंतर मसालेभात, गाजराची कोशिंबीर, दही, हिरवी चटणी असा सर्वसाधारण मेन्यू असतो. त्यापैकी भाजणीच्या वड्यांची पाककृती आपण बघणार आहोत. साहित्य तांदूळ – 1 किलो (जाडा, रेशनचा तांदूळही चालेल) ज्वारी – पाव किलो अख्खे काळे उडीद – पाव किलो अख्खे चणे – पाव किलो गहू -…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळलें । मिरवे विश्व ॥39॥ कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।40।। ना तरी नगरांतरीं वासिजे । तरी नागराचि होईजे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जुलै 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 07 श्रावण शके 1947; तिथि : पंचमी 24:45; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 19:26 योग : शिव 27:03; करण : बव 12:00 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नागपंचमी मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनात भावनांचा खूप जास्त प्रभाव पडू देऊ नका. दिलेली कामगिरी पूर्ण समर्पणाने पार पाडण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या…

