Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 11, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 12:45; नक्षत्र : अश्विनी 13:57
    • योग : ध्रुव 17:04; करण : कौलव 23:21
    • सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    पंचमी श्राद्ध

    भरणी श्राद्ध

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित जातकांना त्यांच्या अपेक्षेनुसार यश मिळू शकते. नोकरदार जातकांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल, मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

    वृषभ – व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही दिवस अनुकूल राहणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम बघायला मिळतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल.

    मिथुन – आज एखाद्या मौल्यवान वस्तू किंवा दागिना यांचा लाभ होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी जास्त कामामुळे व्यग्र रहाल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे कौटुंबिक कामे हातावेगळी कराल. वाहन चालवताना मात्र काळजी घ्यावी लागेल.

    कर्क – या राशीच्या जातकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक मोठी रक्कम मिळू शकते, त्यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत असेल. व्यवसाय योजना वेगाने पुढे जातील आणि समाजातील आदर वाढेल. मात्र घाईघाईने किंवा विचार न करता कोणताही निर्णय घेण्याचे टाळावे लागेल.

    सिंह – कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल दिसू शकतात, जे तुमच्या बाजूने असतील. मात्र यामुळे विरोधकांची संख्या वाढू शकते. अर्थात, तुमच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळाल. गरजवंत व्यक्तीला मदत देखील करू शकता. त्याच कौटुंबिक बाबींच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.

    हेही वाचा – तीन पिढ्यांची कहाणी…

    कन्या – दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. काही महत्त्वाच्या कामांवर पैसे खर्च करावे लागू शकतात. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्याविरुद्ध योजना आखू शकतात, परंतु तुम्ही हुशारीने परिस्थिती सहजपणे हाताळाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

    तुळ – शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल, तर आज काहीतरी विशेष साध्य करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे मन आनंदी राहील. समाजात विशेष आदर मिळेल. कामाच्या बाबतीत जास्त मेहनत आरोग्यावर परिणाम करू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास केल्यास त्याचे अनुकूल परिणाम मिळतील.

    वृश्चिक – आर्थिक बाबतीत दिवस सकारात्मक आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. कोणतेही महत्त्वाचे काम बराच काळ अडकले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी काही प्रिय व्यक्तींची भेटू होऊ शकते.

    धनु – सांसारिक सुखांच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा पैसे अडकू शकतात. कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबींपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता.

    मकर – व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे मानसिकदृष्ट्या शांतता मिळेल. व्यवसाय बदल करण्याची योजना देखील आखता येईल. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा वाहन दुरुस्तीचा खर्च वाढू शकतो.

    कुंभ – मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत आवश्यक कागदपत्रे नीट वाचा आणि काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शिवाय जास्त कामामुळे मान मोडून काम पूर्ण करावे लागेल. कौटुंबिक बाबतीत दिवस सामान्य राहणार आहे.

    हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!

    मीन – व्यवसायाच्या निमित्ताने एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते, यातून मनाजोगे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत, प्रगतीच्या मार्गावर प्रवास सुरू आहे. संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखाल ज्यामुळे काही काळ तरी तुम्ही रिलॅक्स व्हाल. विद्यार्थ्यांची मानसिक तणावातून सुटका होऊ शकते.


    दिनविशेष

    आधुनिक मराठी कवी अनिल

    टीम अवांतर

    कवी ‘अनिल’ या टोपण नावाने काव्यलेखन करणारे आधुनिक कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर येथे झाला. बीए,एल्एल् बी झालेल्या कवी अनिल यांचा 1932 साली फुलवात हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात 1920 ते 1931 या कालखंडातील त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कवितांमध्ये प्रेमजीवनातील उत्कट अनुभूतींचा गूढ आणि प्रतीकात्मक आविष्कार बघायला मिळतो. त्यानंतर प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ति आणि निर्वासित चिनी मुलास  ही त्यांची खंडकाव्ये मुक्तच्छंदातच रचलेली आहेत. याशिवाय, ‘सांगाती’ हा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मुक्तछंद हा अनिलांच्या पुरस्काराचा, प्रयोगशीलतेच्या आणि जिव्हाळ्याचा विषय होता. याशिवाय दशपदी म्हणजे 10 चरणांची कविता हा प्रकार कवी अनिल‌ यांनी सुरू केला.‌ 1966मधील विदर्भ साहित्य संमेलनाचे तसेच 1958 मधील मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1964पासून ते साहित्य अकादमीचे सभासद होते. या संस्थेने त्यांच्या भग्नमूर्ति या खंडकाव्याची अन्य भारतीय भाषांतील अनुवादासाठी निवड केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सभासद होते.‌ प्रसिद्ध मराठी लेखिका आणि टीकाकार कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी होत्या. 8 मे 1982 रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    By ॲड. अमोल दोरवटAugust 8, 2026

    बरेच जण फक्त लग्नापासूनचे भाव पाहतात, पण खरा नियम असा आहे – “कोणत्याही विषयाचे फलित…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 388
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 524
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 837
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.