Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
    अवांतर

    …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 10, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप, क्राइम पेट्रोल, हर्षा गुप्ते, हर्षा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…

    सोशल माडिया एकमेकांना जोडणारा असला तरी, बरीच लोक ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ (WhatsApp group) या प्रकाराला कंटाळले असतील. नाही का? मी तर जवळ जवळ 50-55 ग्रुपमध्ये गोवले गेलेय… तशी मी सगळ्या ग्रुपवर active नसते. बरं, मी सहजासहजी काही ग्रुप सोडूही शकत नाही. तिथे मात्र मी silent mode वर असते.

    काही ग्रुप हे काही लोकांचे पर्सनल फॅमिली ग्रुप असतात. ‘आम्ही या मॅडम ना ओळखतो…’ असे दाखवायला  मला ही लोक त्यांच्या पर्सनल फॅमिली ग्रुपमध्ये सहभागी करतात. आता त्यातले काही लोक मला ओळखतात. ते तसे खूश असतात. पण एकदा एकाने मला त्याच्या फॅमिली ग्रुपमध्ये ॲड केलं. तिथली लोक मला ओळखत नव्हते. ज्याने ॲड केलं त्याने माझ्याशी ग्रुप गप्पा मारायला सुरुवात केली…

    हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!

    “सध्या काय सुरू आहे मॅडम?”

    आणि मी अगदी सहज बोलले की, “’क्राइम’ सुरू आहे.”

    हे वाचून अचंबित होऊन एका बाईने विचारलं, “काय, क्राइम?”

    म्हटलं, “हो, माझं ब्रेड आणि बटर आहे ते. त्यामुळे करावंच लागतं.”

    हा मेसेज वाचून ती तर जाम भडकली अन् म्हणाली, “चांगल्या घरची दिसतेस. शिक्षण पण व्यवस्थित झालं असेलच… मग तू चांगली कामं का करत नाहीत? क्राइम करून कसली घरं चालवते? आणि अशा वाईट बाईला आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये ॲड करून ठेवलंय! आत्ताच्या आत्ता काढून टाका या गुन्हेगार बाईला!”

    हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!

    तिने थेट ॲडमिनला आदेश दिला… मी तर हे सगळं एन्जॉय करत होते. पण त्या बिचाऱ्या मुलाला अगदी कानकोंडलं झालं होतं… कारण ती बाई काही ऐकायलाच तयार नव्हती. तो बिचारा हतबल झाला. त्याच्याकडे काही पर्यायच नव्हता… शेवटी जवळपास 50 वेळा माफी मागून त्याने मला ग्रुपमधून रीमूव्ह केलं… आणि माझी सुटका झाली.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    By Team AvaantarJune 21, 2026

    सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं……

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.