Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥345॥ देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥346॥ म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥347॥ इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥67॥ ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 21 भाद्रपद शके 1947; तिथि : पंचमी 09:58; नक्षत्र : भरणी 11:58 योग : व्याघात 13:43; करण : गरज 20:39 सूर्य : सिंह; चंद्र : मेष 17:30; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:44 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 षष्ठी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणची परिस्थिती उत्तम असेल. यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायासाठी जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळू शकेल,…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय! नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सर्वांनी साजरा केला. मी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी माहेरी जायला निघाले होते… विरार स्टेशनपाशी आले… एका दुकानात कडक बुंदीचा मोठा लाडू दिसला. चेहऱ्यावर हसू आलं… मी तो लाडू बाप्पासाठी विकत घेतला अन् फ्लॅशबॅकमध्येच गेले… एका मराठी नाटकाच्या तालमी सुरू होत्या. खूप मोठे नामवंत दिग्दर्शक होते. सरांच्या परवानगीने त्याचं नाव मी इथे सांगतेय… तर ते माझे लाडके सर सतीश पुळेकर! ही गंमत त्यांच्या लहानपणीची आहे… शेजारच्या दुकानात मोठा बुंदीचा विकायला ठेवला होता. लाडू तोही फुटबॉल एवढा मोठा! लहान मुलांना अशा गोष्टी पाहून त्याचं अप्रूप वाटतेच नाही…
वेद बर्वे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा जल्लोष, उत्साह सरल्यानंतर लगेचच सुरू होतो ‘पितृपक्ष’ किंवा ‘पितृपंधरवडा’ अर्थात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठीचा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशिष्ट काळ. भारतीय संस्कृतीत पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विशेष काळ मानला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावास्येपर्यंत सोळा दिवसांचा हा कालावधी ‘श्राद्धपक्ष’ म्हणून ओळखला जातो. धर्मशास्त्रानुसार या काळात आपल्या पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांकडून केले गेलेले श्राद्ध, तर्पण, पिंडदान स्वीकारून त्यांना आशीर्वाद देतात. मनुस्मृती (3.203) मध्ये म्हटले आहे – “यत्किंचिदपि दत्तं स्यादननामश्रुतेन च। तत्तत्पितृगणाः प्रीता भवन्त्येव न संशयः॥” याचा अर्थ असा की, श्रद्धेने केलेले अगदी थोडे दानसुद्धा…
कामिनी व्यवहारे ओला वाटाणा अर्थात मटारचे अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे मुलांना आवडतात. आजकाल बाजारात फ्रोझन मटार उपलब्ध असल्याने बाजारातून मटार आणून सोलायचीही गरज पडत नाही. फ्रीझरमधून तो काही काळ बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर आपल्या रेसिपीसाठी वापरायचा… याच मटारचे आज आपण पॅटीस कसे करायचे ते पाहू. साहित्य उकडलेले बटाटे – 5 ते 6 ताजा कोवळा मटार – 2 वाट्या किसलेले चीज – 1 वाटी खवलेला ओला नारळ – 1 वाटी चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी किसलेले आले – 1 टेबलस्पून हिरवी मिरची पेस्ट कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून लिंबाचा रस – 1 टेबलस्पून मीठ – चवीनुसार साखर – चवीनुसार फोडणीसाठी तेल…
ॲड. कृष्णा पाटील भाग – 2 बापाने दादूच्या बायको, मुलीला घराबाहेर काढले. गावातच दादूच्या एका मित्राच्या घरी रिंकू आणि आई राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धूरात वावरणारी मुलगी… गावी आलं की इथ ठेवू की तिथं ठेवू, अशी करणारी विधवा आत्या… मुंगळ्यासारखे चिकटणारे काका आणि आजोबा… अँसिडच्या धूरात घरच्यांसाठी बापाने उभी हयात घालवली. मिळवला तेवढा पैसा घरी दिला. पण करोडो रुपये ज्यांच्यासाठी खर्च केले त्यांनीच पाठ फिरवली! रिंकूला खूप वाईट वाटे… डोळे पाझरू लागत. बाप होता तोपर्यंत घरच्यांच रूप वेगळं होतं. माणसं इतकी नीच असू शकतात? जनावराच्या काळजाची असतात? रिंकूच डोकं भणभणायचं. पण इलाज नव्हता. रिंकू तसेच सहन करीत होती. तिला राहून…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥331॥ पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥332॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥333॥ तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥ तरी विषयांतुही कांही । आपणपेंवाचुनि नाहीं । मग विषय कवण कायी ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 12:45; नक्षत्र : अश्विनी 13:57 योग : ध्रुव 17:04; करण : कौलव 23:21 सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पंचमी श्राद्ध भरणी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित…
दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 5 मिरजच्या मीरासाहेब दर्ग्याजवळ बाबांच्या रुपाने एक देव भेटला याचा आनंद झाला. देव मंदिरात नाही देव माणसात आहे… प्रत्येकाने माणसात देव शोधला पाहिजे. एकमेकांचा आत्मा जाणणे, हा पुण्याच मार्ग आहे. अन्नदान हे फार श्रेष्ठ दान आहे. हल्लीतर प्रत्येक तीर्थस्थळाच्या ठिकाणी महाप्रसाद भाविकांना दिला जातो, हे फार मोठे पुण्याईचे काम आहे. या प्रसादासाठी बरेच भाविक प्रसादासाठी मदत करतात. काही ठिकाणी प्रसादासाठी धान्य कोठून येते, हे कळतही नाही. माझ्या मते नरसिंह वाडी येथे गेली पाच वर्षं एक व्यक्ती प्रसादाचे जेवण देत आहे, ती व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. अशी दानधर्म करणारी माणसे भरपूर आहेत. दिवस…
सुनील शिरवाडकर आमच्या गल्लीत एक कुटुंब रहात असे, त्यांची ही कहाणी! कदाचित प्रातिनिधिक…!! अलीकडे बहुतांश ठिकाणी दिसणारी… तर या कुटुंबाचा चांगला भरभक्कम वाडा होता. आईवडील आणि चार मुलं… वडील याज्ञिक होते. त्यांचा वाडा म्हणजे काय? सागवानी लाकडात बांधलेला… ओसरी….चौक… पडवी… पडवीत टांगलेला झोपाळा… त्याच्या पितळी कड्या… याज्ञिकी करणारे ते काका, त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे. त्यांचा रुबाब काही औरच! त्यांचाच काय, सगळ्या कुटुंबाचाच रुबाब होता. त्यांचेकडे साजरे होणारे सण, त्यानिमित्ताने बाहेर निघणारी चांदीची भांडी… सोनं-नाणं… सर्वच रुबाब होता. तीन पिढ्यांच्या कहाणीतली ही पहिली पिढी… त्यांना चार मुलं. त्यातील एक माझ्याच वयाचा. त्याचं लग्न झालं आणि तीन-चार वर्षांत तो घराबाहेर पडला. त्याची…

